• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

विदेश दर्शन - १००

त्याचा काही परिणामही झाला. त्या धोरणाने अनेक नवी माणसे महाराष्ट्रात उभी करण्याचा मी प्रयत्न केला.

जे आपणासाठी कोणी केले नाही. ते आपण इतरांसाठी करावे आणि सत्तेच्या केंद्रस्थानी असताना ते केले तर अधिक फलदायी होते, म्हणून अधिक मित्रभावाने, हळुवारपणे पण विचारांच्या दिशा कायम ठेवून माणसे मी वागविली आणि वाढविलीही.

हे सर्व ठीक आहे. पण आज मी जेव्हा राजकारणातले चित्र पाहतो तेव्हा माझे मन अस्वस्थ होते. खरोखरीच आपण काही नव्या कामाचा पाया घातला होता का? खरी जिव्हाळयाची माणसे आवती-भोवती होती का? काही काही माणसांचे नमुने पाहिले म्हणजे आर्श्चयही वाटते-खरे म्हणजे दु:ख होते.

झाले हे पुरे नाही का? हा असाच खेळ पुढे किती दिवस, कुणासाठी आणि काय म्हणून चालू ठेवावयाचा असा प्रश्न माझ्यापुढे आहे.

मी काही राजकारणसंन्यास घेण्याचा विचार करीत नाही. विचार येतो निवडणुकांचा आणि सत्तास्थानांचा. आज सत्तास्थानावर राहण्याची अनेकांची धडपड चालू आहे. जे आहेत ते तेथेच कसे राहता येईल यासाठी साधनसुचितेचा कसलाही विचार न करता अगदी क्रूरपणे कारस्थाने करताहेत.

असल्या कारस्थानांत अप्रत्यक्षपणे सामील न होता, किंवा त्या कारस्थानाचे बळी होण्यापूर्वीच, योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन बाजूला झाले तर बरे नाही का? असा प्रश्न मनात घोळतो आहे.

याचा निर्णय कसा घ्यावयाचा, त्या निर्णयासाठी कसोटया कोणत्या लावावयाच्या? फक्त आपल्या स्वत:च्या भावनांचा (subjective) विचार करून निर्णय घ्यावयाचा का? तर उत्तर 'होय' असे येते.

श्रीमतीजी अजून महत्त्वाच्या कामात सल्ला मसलत घेतात. पण सत्तेच्या केंद्रवर्तुळाच्या बाहेर ठेवण्याचा समजेल असा प्रयत्न करतात, असा अनुभव आहे. मग मन धुमसत राहते. असे अवमानित राहण्याने ज्यांचा मी प्रतिनिधी आहे असे मानतो, त्यांचाही अवमान तर नाही ना होत, अशी बोचणी असते.

मी माझी समजूत घालतो की, नाही, असा वैयक्तिक भावनांचा विचार करून निर्णय घ्यावयाचे नसतात. राष्ट्रीय कार्य करीत असताना स्वत:ला विसरले पाहिजे - भविष्याकडे लक्ष ठेवले पाहिजे. रागाने मोडता येते, जोडता येत नाही. तडजोडीने वागले पाहिजे असा विचार करून मग काम चालू राहते.

पण खऱ्या अर्थाने काम चालू आहे का? की एका व्यक्तीचा अहंकार सुखविण्यासाठी हे सर्व चालू आहे?

काँग्रेस पक्ष हे मी माझे सर्व जीवन मानले. ती काँग्रेस कुठे आहे? काँग्रेसमध्ये लोकशाही राहिली आहे का? सत्ता मिळवून ती ताब्यात ठेवण्याचे यंत्र म्हणून आज काँग्रेस वापरली जात आहे.

आजची शासन-यंत्रणा अत्यंत आधुनिक तंत्रे वापरून अधिक एककेंद्रित होत आहे. प्रसंग पडला तर ही यंत्रणा जीवघेणा निष्ठुरपणा दाखविण्यासही मागे पुढे पाहणार नाही असे आधुनिक सत्तेचे सर्व जगातच स्वरूप दिसत आहे. आपला देशही याला अपवाद नाही. आणि या पध्दतीत माझे मन रमत नाहीच पण तिच्याविरुध्द मनात विष आहे.