• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

विदेश दर्शन - १०

आनंद दुसऱ्याला सांगितला तर वाढतो आणि दु:ख सांगितलं तर कमी होतं असा विचार केला आणि साहेबांच्या विश्वासू परिवारातले, पुणे शहरातील ऍडव्होकेट ग. नी. जोगळेकर यांना फोन केला. शब्द रेटत कशीबशी हकिगत सांगितली. ते म्हणाले, 'मला ते माहीत आहे.'

मी फोन बंद केला. 'त्यांना माहीत आहे' या विषयी तर्क करीत बसण्याशिवाय गत्यंतर नव्हते. याला सांग, त्याला सांग यात काही दिवस गेले. पण मनाची उलघाल थांबेना. यशवंतरावांनी अकृत्रिम प्रेमाने, आपुलकीने, विश्वासाने जे दिले ते इथेच थांबता कामा नये असे सतत मनात येत राहिले.

यशवंतरावांचं हे सर्व लेखन पत्ररूप आहे. त्यांनी हे लेखनमाध्यम स्वीकारलं त्याला विशिष्ट कारण आहे. त्यांनी साऱ्या जगाचा प्रवास केला पण तो एकाकी. वेणूताईंची प्रकृती दुर्बल. हजारो मैलांचा धावपळीचा प्रवास त्यांना झेपणारा नव्हता. त्या नित्य दिल्लीत, स्वगृही. यशवंतरावांना याची खंत असावयाची. ही खंत त्यांनी पत्रांतून नमूद केली आहे. एकाकीपणाची ही खंत त्यांच्या या लेखनाची प्रेरणा ठरली असावी.

संरक्षण-मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर विदेश-दौऱ्यासाठी १९६३ साली त्यांनी भारताची हद्द प्रथम ओलांडली. १९७० ते १९७७ या कालखंडात अर्थमंत्रि, विदेशमंत्रि म्हणून त्यांचे पृथ्वीपर्यटन झाले.

हा क्रम १९७७ च्या जानेवारीनंतर थांबला. कारण त्यानंतर येथे लोकसभेची निवडणुक जाहीर झाली. त्या निवडणुकीने केंद्रातील काँग्रेसची सत्ता संपुष्टात आणली. परदेशवारीचे आता कारण उरले नाही. सर्वच थांबले. पत्रलेखनही थांबले.

जागतिक प्रवासात असतांना जे अनुभवलं ते त्यांनी लिहिलं. विशिष्ट हेतूनं लिहिलं. रोम येथून १९ जानेवारी १९७७ ला त्यांनी प्रवासातलं जे अखेरचं पत्र लिहिलं. त्यांत ते नमूद करतात की, ''महत्त्वाच्या जागी काम करीत असलेल्या लोकांच्या विचारांची हे लिहितांना उजळणी होते आणि नोंदही राहते एवढाच हे सर्व लिहिण्याचा उद्देश आहे.''

असे असले तरी अर्थमंत्री, विदेशमंत्री म्हणून त्यांनी स्वतंत्र भारताचे, विकसनशील भारताचे प्रवक्ते म्हणून जो तेजस्वी इतिहास घडविला त्याचे दर्शन या लेखनात घडते. आपल्या भूमिकेचे स्पष्टीकरण नमूद करून ठेवणे हा या लेखनाचा प्रधान हेतू असला पाहिजे.