अशाप्रकारे एकूण उपलब्ध असलेल्या १७६.७९ दशलक्ष हेक्टर मीटर पाण्यापैकी फक्त ७० दशलक्ष हेक्टर मीटर वापरात येऊ शकते. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात नद्यात सर्वात कमी पाणी दिसून येते.
वरील माहितीवरून खालील निष्कर्ष निघतात :-
१) उत्तरेकडील भागात देशाच्या एकूण जल संपत्तीपैकी ७२ टक्के पाणी उपलब्ध आहे.
२) उत्तरेकडील भागातील उपलब्ध पाण्यापैकी वापरणे शक्य असलेले पाणी ३५ टक्केच आहे. बाकीचे समुद्राला वाहून जाते.
३) दक्षिणेकडील नद्यांत उपलब्ध पाण्यापैकी (७६)टक्के पाणी वापरात येऊ शकते.
४) महानदी व पश्चिम किनार्याकडील भूभागात बर्याच अंशी पाणी शिल्लक आहे.
देशाचा ७० टक्के ते ८० टक्के कमी पाण्याचा भाग सोडल्यास बाकीचा २० टक्के ते ३० टक्के भाग जो बहुतांशी उत्तेकडील ब्रह्मपुत्रा व गंगा नदीच्या खोर्यात मोडतो. विपुल पाण्याने व्यापलेला असून या भागात भूगर्भपाणी सावणख्ज्ञमता देखील भरपूर आहे. या भागात उपलब्ध असलेले सर्व पाणी पूर्णपणे वापरणे केव्हाही शक्य नाही.
अशाप्रकारे या देशात जेथे विपुल प्रमाणात जमीन उपलब्ध असून ज्या जमिनीस पाण्याची आवश्यकता आहे तेथे पाण्याची उपलब्धता नाही. परंतु ज्या भागात उत्तम प्रतीची व भूगर्भातील पाण्याची साठवण करण्याच्या दृष्टीने अत्यंत उत्तम जमीन आहे, अशा ठिकाणी मुबलक पाणी तर उपलब्ध आहेच, परंतु हे पाणी पूर्णपणे वापरता येऊ शकत नाही व ६५ टक्के पाणी समुद्राला वाहून जाण्याची परिस्थिती आहे.
भारतातील उपलब्ध पाण्याचा हिशेब :
भारतात पावसामुळे परवडणारे पाणी आणि भूपृष्ठावर व भूगर्भातून उपलब्ध होणारे पाणी व त्याचा वापर खालीलप्रमाणे :
१) पावसामुळे मिळणारे एकूण पाणी अंदाजे (४००) दशलक्ष हेक्टर मीटर.
२) भूपृष्ठावरील नद्याद्वारे मिळणारे पाणी (१७६) दशलक्ष हेक्टर मीटर.
३) पैकी वापरू शकणारे पाणी (७०) दशलक्ष हेक्टर मीटर.
४) यातून होऊ शकणारे सिंचन (७३) दशलक्ष हेक्टर मीटर.
५) भूगर्भातील उपलब्ध पाणी (५७) दशलक्ष हेक्टर मीटर.
६) पैकी वापरण्यायोग्य पाणी (२६) दशलक्ष हेक्टर मीटर.
७) यातून होऊ शकणारे सिंचन (४०) दशलक्ष हेक्टर मीटर.
अशाप्रकारे आपल्या देशात ४०० दशलक्ष हेक्टर मीटर पावसाच्या पाण्यापैकी सर्वसाधारण ९६ दशलक्ष हेक्टर मीटर पाणी वापरून ११३ दशलक्ष हेक्टर मीटर क्षेत्र (पारंपारिक पद्धतीने) ओलिताखाली येणे शक्य आहे.
आतापर्यंत झालेले प्रगती :
या अनुषंगाने आतापर्यंत झालेली प्रगतीखालील प्रमाणे आहे.
तक्ता नं २५ (तक्ता पाहण्यासाठी येथे क्लिक करा)