• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

महाराष्ट्रातील दुष्काळ - ७५

११.  जलसिंचन प्रकल्पाला पर्याय नाही

म. द. देशमुख आणि गो. वि. अभंगे
सचिव (निवृत्त), पाटबंधारे विभाग;
मुख्य अभियंता, औरंगाबाद
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

देशाचा आर्थिक व सामाजिक विकास पाण्यावरच मुख्यत्वे अवलंबून म्हणून जलसिंचन प्रकल्पांचा विचार महत्त्चाचा आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मानवाच्या आयुष्यात वार्‍यानंतर पाण्याला महत्त्व आहे आणि या दोन्ही गोष्टी निसर्गाने विपुल प्रमाणात दिलेल्या असून जगात केव्हाही त्यांची कमतरता भासणार नाही.

कुठल्याही देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासात पाण्याला फार महत्त्वाचे स्थान आहे.  पृथ्वीवर २३ समुद्ररूपाने जल असून १३ भूमी आहे.  तथापि पृथ्वीवर ३ टक्के क्षेत्र पाण्याने व्यापले आहे आणि बर्फाच्या ढिगाने (glacier) ११ टक्के क्षेत्र व्यापले आहे.  पृथ्वीवर असलेले संपूर्ण बर्फाचे ढीग जर का वितळले गेले तर समुद्राची पातळी सुमारे ६४ मीटरनी वाढेल असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.    

जगात वेगवेगळ्या रुपांनी उपलब्ध असलेल्या पाण्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी पुढीलप्रमाणे काढला आहे :

तक्ता नं २३ (पाण्याचा अंदाजाचा तक्ता पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

खालील आकडेवारीवरून दिसून येईल की, बर्फाच्या ढिगाच्या रुपाने (glacier) उपलब्ध असलेले विपुल पाणी मनुष्य प्राण्यास वापरणे कदापि शक्य नाही.  आज आपण जे पाणी वापरतो ते जगातील एकूणन पाण्याच्या ०.३ टक्के असून या पाण्याला मानवाच्या आयुष्यात व आर्थिक व्यवस्थेत अत्यंत महत्त्व आहे.

शास्त्रज्ञांच्या मते पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या भूपृष्ठावरील आणि भूगर्भातील पाण्याचा परंपरागत मार्गाने पूर्णपणे वापर केल्यास हे पाणी २००० सालापर्यंतच्या अपेक्षित पाणी वापरापेक्षा १० ते १५ टक्के नी जास्त होईल.  अशाप्रकारे सोप्या व सहजगत्या वापरले जाणारे पाणी संपल्यानंतर भविष्यकाळात इतर अपरंपरागत मार्गानेदेखील पाणी उपलब्ध करण्यास भरपूर वाव असून पाण्याची केव्हाही कमतरता भासणार नाही.

मात्र याचबरोबर मानवाकडून पाणी वापर आणि त्याची जपणूक (conservation) करण्यात अनेक घोडचुका होत असलेल्या दिसून येत आहे.  त्यात मोठ्या प्रमाणात सरोवरे आणि नद्यांचे प्रदूषण तसेच मोठ्या प्रमाणात जंगल तोडून निसर्गाचा समतोल बिघडवणे इत्यादी महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश आहे.  पृथ्वीवर जरी पाणी विपुल असले, वरून संपणारे असले आणि त्यात दरवर्षी पुनर्भरती (replenishment) होत असली तरी त्याच्या वापरावरील होत असलेले दुर्लक्ष, या विपुल प्रमाणात असलेल्या पाण्याचा निश्चित नाश करणारे आहे.  अशा प्रकारे मनुष्य प्राण्यास पाण्याच्या कमतरतेपासून केवहावी भिण्याचे कारण नसले तरी पाण्याचे प्रशास्त्रीय नियोजन व व्यवस्थापन तसेच पाण्याचा योग्य वापर व जपणूक (conservation) न झाल्यास मात्र आपत्ती कोसळल्याशिवाय राहाणार नाही.  म्हणून विपुल अवस्थेत असलेल्या पाण्याचे योग्य नियोजन व जपणूक होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.