• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

महाराष्ट्रातील दुष्काळ - ४५

कोणत्याही राज्याच्या पाण्याच्या वापरात शक्यतो काही बदल न करता इ. सन २००० नंतर परत या निवाड्याच्या पुनर्विलोकनाची तरतूद या निवाड्यात केलेली आहे.  त्यामुळे कृष्णेच्या खोर्‍यातील महाराष्ट्राच्या वाट्याला आलेल्या पाण्याचा इ.सन २००० पर्यंत वापर व्हावा या दृष्टीने या खोर्‍यातील सर्व प्रकल्प पूर्ण करण्याची आवश्यकता आहे.  २६३ हजार दशलक्ष घरफूट क्षमतेचे प्रकल्प पूर्ण झाले असून ३०६ हजार दशलक्ष घरफूट क्षमतेच्या प्रकल्पाचे काम चालू आहे.  तसेच २५ हजार दशलक्ष घनफूट क्षमतेच्या प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून अद्याप अंदाजपत्रकी तरतूद केलेली नाही.

गोदावरी खोरे :

गोदावरी खोर्‍याबाबत संबंधित राज्यात आपापसात उप-खोर्‍यातील पाणी वापराबाबत अनेक आंतरराज्य करार झाले होते.  लवादाने आपल्या निवाड्यात या करारांचा अंतर्भाव केला आहे.  लवादाने गोदावरी खोर्‍याची १२ उपखोर्‍यांत विभागणी केली होती.  त्यापैकी १० खोरी पूर्णपणे किंवा अंशतः महाराष्ट्रात येतात.  या उपखोर्‍यांतील काही ठराविक धरणापर्यंतचे पाणी पूर्णपणे वापरास महाराष्ट्राला मुभा दिली आहे.  राहिलेल्या उपखोर्‍यांत पाण्याचा किती वापर करावा हे लवादात निर्देशित केले आहे.  अशा प्रकारे गोदावरीच्या खोर्‍यातील १९८९ हजार दशलक्ष घरफूट पाणी महाराष्ट्राला वापरता येते.
तक्ता नं १७ (तक्ता पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

नर्मदा खोरे :

लवादाने नर्मना खोर्‍यातील १०.८९ हजार घनफूट पाणी महाराष्ट्राच्या वाट्याला दिले आहे.

निरनिराळ्या खोर्‍यांतील ७५ टक्के निश्वासार्हतेनुसार उपलब्ध पाणी व लवादाच्या निवाड्यानुसार अथवा भौगोलिक स्थितीनुसार शक्य असलेला पाण्याचा वापर पुढील तक्त्यात दिला आहे.

एकूण उपलब्ध असलेल्या २६१५ हजार दशलक्ष घनफूट जलसाधन संपत्तीपैकी १२० हजार दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर हा कोयना व टाटा तलावाद्वारे पाणी पश्चिमेकडे वळवून जल विद्युत निर्मितीसाठी केला जातो.  अंतिमतः २००० हजार दशलक्ष घनफूट पाणी सिंचनासाठी वापरले जाईल.  पूर्ण झालेल्या व प्रगती पथावर असलेल्या प्रकल्पांद्वारे आतापर्यंत अंदाजे १३९५ हजार दशलक्ष घनफुट इतक्या पाणी वापराची निश्चिती झाली आहे.

निरनिराळ्या खोर्‍यातील जलसंपत्ती वापरासंबंधी तपशील
तक्ता नं १८ (तक्ता पाहण्यासाठी येथे क्लिक
करा)

टीप :  पान ६७ वरील तक्त्याच्या बाबतीत
(सर्व आकडे पूर्णांकात घेतले आहेत)
(महानदीचे २३८ चौरस कि.मी. चे खोरे वगळलेले आहे.)
*लवादाच्या निवाड्यानुसार.
** गुजरातेतील तापी नदीवरील उकाई प्रकल्प मंजूर करताना वरीलबाजूचे २६२.४ हजार दशलक्ष घनफूट पाणी हे महाराष्ट्र व मध्यप्रदेश यांच्यासाठी राखीव ठेवले आहे.  दोन्ही राज्यातील जानेवारी १९८६ च्या करारानुसार महाराष्ट्र राज्याचा वाटा हा १९१.४ हजार दशलक्ष घनफूट आहे. (*) बृहद् योजनेप्रमाणे (Master Plan)