• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

महाराष्ट्रातील दुष्काळ - ३२

कारखान्यात तयार होणार्‍या मालापैकी निर्यात होणार्‍या मालाचे वार्षिक प्रमाण : १९६५ ते १९७३ वाढीचे प्रमाण

तक्ता नं ५ (तक्ता पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

गेल्या तीन दशकांत सरासरी वार्षिक विकासाची गती ही ३.७ टक्क्यांपेक्षा अधिक नव्हती.  या विकासाचा गतीला डॉ. राजकृष्ण यांनी हिंदु अर्थव्यवस्थेची विकासाची गती म्हणून उल्लेख केलेला आहे. गेल्या तीस वर्षातील लोकसंख्येच्या विकासामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यावरून मोठ्या संख्येने लोकांना शेतीशी संबंधित केल्याशिवाय गत्यंतर राहिलेले नाही.

परिशिष्ट - एच

शेतीशी संबंधित आणि पूरक असे उद्योग पंजाबात मोठ्या प्रमाणात स्थापन केले पाहिजेत आणि अशा उद्योगांचे प्रमाण इतके विस्तृत असले पाहिजे की, शेतीवरील लोकसंख्येचा बोजा बराच कमी होऊ शकेल अशी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे.  पंजाबमधील अडतीस टक्के शेतमालक हे दोन हेक्टरपेक्षा कमी असलेले जमीनधारक आहेत.  त्याशिवाय आणखी अडतीस टक्के शेतकर्‍यांना दोन ते पाच हेक्टर जमीन आहे.  हे दोन किंवा पाच हेक्टरचे जमीनधारक देखील कुटुंबातील सर्वांना बाराही महिने काम देऊ शकत नाहीत किंवा योग्य शिक्षण आणि आरोग्याची काळजी घेण्याइतके कुटुंबाचे राहाणीमान असू शकत नाही.  यापैकी बर्‍याचशा शेतांचे रूपांतर फळबाग व शेती अथवा डेरी अथवा शेती अशा शेतात केले तरी खेडेगावातील हल्लीच्या सर्व शेतमजुरांना या शेतीत सामावून घेणे अथवा काम देणे शक्य होणार नाही.  जसजसा काळ जाईल तसतशी ग्रामीण भागातील बेकारांची संख्या वाढत जाईल.

ग्रामीण भागात आता शिक्षणाचा बराच विस्तार झाल्यामुळे तर ग्रामीण भागात काही नवीन समस्याही निर्माण होत आहेत.  अशा या ग्रामीण भागातील सुशिक्षित मुलांना शेती धंद्याचे आकर्षण वाटेनासे झाले आहे.  ते जेव्हा शहरी विभागात जातात तेथे त्यांना त्यांच्या प्रतिष्ठेच्या कल्पनेप्रमाणे कामधंदा मिळू शकत नाही आणि शहरातील बेकार तरूणांत भर पडते.  शहरी विभागात कमालीच्या नैराश्याने पछाडलेले जीवन ते जगत असतात.  त्यांच्यापैकी जे खेड्यातच राहतात ते दहशतवाद्यांच्या वैचारिक प्रभावाखाली येतात आणि समाजविरोधी कारवायांत भाग घेऊ लागतात.  शेती हा फक्त दिवसातील थोडा वेळ काम करण्याचा धंदा बनवून (part-time profession) या प्रश्नाचे उत्तर शोधले पाहिजे.  पशुसंवर्धन, फळबाग व पिके असे स्वरूप शेतीला पाहिजे.

या पद्धतीने जवळपासच्या फॅक्टरीत काम करणारे, लहान लहान शेतावर फक्त सकाळ-संध्याकाळ राबणारे, सुटीच्या दिवशी कुटुंबातील प्रौढ आणि बाहेर कामावर न जाणार्‍या महिला ह्यांना काम मिळे शकेल.  बिनशेती विभागातील उत्पन्नातून शेतीत भांडवल वाढत्या प्रमाणात गुंतविले जाईल; ह्या पद्धतीचा रोजगार जपानमध्ये उपलब्ध होऊ शकला आहे.  म्हणूनच जपानमधील शेतकरी कुटुंबाचे पंचाहत्तर टक्के उत्पन्न त्यांना बिनशेती विभागातूनच मिळत असते.  यामुळे शेतीच्या यांत्रिकीकरणात वाढ होईल.  परिणामी, शेतीची उत्पादनक्षमता वाढेल आणि एकून उत्पादनपद्धतीचे चित्रच बदलून जाईल.  ग्रामीण भागातील कामगारांची गतिमानताही (Mobility) वाढीस लागेल आणि एकून अर्थव्यवस्थेवर याचे अनुकूल परिणाम होतील.

- डॉ. एस. स. जाहेल

पंजाबच्या शेती उत्पादनाचे भवितव्य

परिशिष्ट - आय

जगातील गरीब आणि श्रीमंत देश शेतीत काम करण्याची टक्केवारी

तक्ता नं ६ (तक्ता पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

(The Economist, 30 January-05Feb. 1988)