एक आठवड्याला ५४० लिटर पाणी, मोसंबी, संत्रे किंवा तत्सम पिकाला दिले तर १५ x १५ च्या झाडांला १३ शे ते १४ शे ते साडे चौदाशे लिटरपर्यंत पाणी लागते. हे मोजमाप करून झालेले आहे. याचा अर्थ असा की गरजेपेक्षा सव्वा दोन ते अडीचपट पाणी आपण अकारण देतो. तेवढे पाणी वाचवले आणि ते ड्रिप (ठिबक सिंचन) पद्धतीने वापरले तर त्यातून १० एकर शेत पिकाला वापरता येते. हेच पाणी ड्रिप ठिबक सिंचन पद्धतीने वारपले तर २० ते २५ एकरापर्यंत फलोद्यान करू शकता. त्यातील १० एकर मुख्यतः संत्री, मोसंबी आणि उरलेल्या जागेत बोर, जांभूळ, सीताफळ अशा फळशेतीला ते पुरे पडू शकते. ठिबक पद्धतीने १० वर्षापर्यंत निर्धोकपणे पाणी द्यावे. झाड उभे राहिल्यानंतर पाणी वाया जाणार नाही अशा पद्धतीचे नियोजन करावे. या पद्धतीनं केलेली फळशेती हीच शेतकर्याला जिवंत ठेवील असे माझे भाकीत आहे.
ड्रिप पद्धतीने सुंदर व मुबलक फळशेती
प्रत्येक झाड जगू इच्छित असते. पाने झडलेले लिंबाचे झाडसुद्धा परत हिरवे होऊ शकते हा निसर्गाचा क्रम आहे. पळसाच्या झाडाला पाने फुटतात हा ही निसर्गाचा क्रम आहे. झाड जिवंत रहाणार हे महत्त्वाचे नाही. परंतु महत्त्वाची गोष्ट आहे ती ठिबक पद्धतीने घडणारे परिवर्तन. मोसंबीच्या मळ्यामध्ये किंवा सीताफळांच्या मळ्यांमध्ये पाणी दिल्यामुळे एका बगीच्याचे मोल एक लाख रुपये होतील, परंतु ड्रिपच्या पाण्यामुळे त्या मालाचा जी क्वालिटी, तिचे वजन आणि फळांचा व झाडांचा देखणेपणा अमर्याद वाढतो. संपूर्ण जयपूर, दिल्ली आणि नैनी ठिकाणी जातींचे फळ परदेशामध्ये आणि दुबईमध्ये जर गेले तर त्याची वाढीव किंमत ४०-५० टक्के प्रत्यक्षात (म्हणजे दीड पट) मिळालेली आहे. नित्य नियमित वेळेशीर पाणी ड्रिपवर दिल्यामुळे त्या त्या मालाचा (क्वालिटी) दर्जा वाढतो. दर्जेदार माल निर्माण करणारे म्हणून एका वर्षातच शेतकरी बाजारात आपले स्थान व वजन पक्के करू शकते. त्यासाठी खर्च झालेली किंमतही भरून निघू शकते. विहिरीचे पाणी त्या वीजेच्या २'' -२.५'' च्या डिलिव्हरी पाइपाने जर उपसले तर विहीर हबकून जाते. लवकर नष्ट होते. आणि दीड तासांचे पाणी अर्ध्या पाऊण तासात संपुष्टात येते. परंतु हेच दीड तासांचे पाणी ४ तास टिकून त्या विहिरीतला साठा ठिबकपद्धतीने वापरल्यास कायम राहातो असा अनुभव मला आलेला आहे. हा शेवटचा मुद्दा मांडतांना पुन्हा एक गोष्ट मी सांगितो. येथे 'बाय-बॉल' पद्धतीची माहिती सांगितली गेली. ठिबक (ड्रिप) थेंबाथेंबाने पाणी देणे ही जशी एक पद्धत आहे तशीच दुसरी एक पद्धत आहे. बाय-बॉल.
१८'' सूर्यफूल बायबॉलमुळे
कुठेही चढउतार असेल डोंगर उतार असेल तेथे शती तुम्ही करू शकत नाही. अशा ठिकाणी फलोद्यान किंवा इतर शेतीसाठी सारख्या प्रमाणात पाणी देणे डिलिव्हरी करणे अशा पद्धतीची अद्ययावत योजना आहे. तिच्यात संपूर्ण शास्त्रीय बायबॉल आहे. मी जेथे एक बिधा ओलीत करू शकत होतो तर तेथे त्याच बायबॉल मधून दिलेल्या पाण्यामुळे तीन बिधे ओलित करू शकलो. आणि हे ओलीत विशेषतः उन्हाळ्यामुळे ओलीत हे जास्त महत्त्वाचे आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये मी सूर्फफुलांचे पीक बायबॉल पाण्यामधून वाढवले तर मला साधारणपणे ३ ते ३॥ ते ४ क्विंटलऐवजी ते ६ ते ६॥ क्विंटलपर्यंत सूर्यफूल पीक मिळते. दीड फुटाच्या डायमीटरचे सूर्यफूल मी वसंतराव नाईकांच्या पुतळ्याला अर्पण केले होते. उरलेला शेती प्रयोगाचा श्री. शिंदेसाहेबांनी आणि बाकीच्यांनी येऊन पाहिलेला आहे. त्याच्यानंतर सप्टेंबर-ऑक्टोबर-नोव्हेंबर या ९० दिवसांमध्ये हे सूर्यफूल उभे केले. ह्या पिकाचा उतारा बाय-बॉल वर घेतला म्हणून तो उतारा दीडपट आला. जमिनीच्या मुळापर्यंत पाणी पोहोचू शकत असल्यामुळे त्याची वाढ जास्त होते. हा महत्त्वाचा भाग आहे. पाणी बचत ही बाबही महत्त्वाची आहे.