• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

महाराष्ट्रातील दुष्काळ - १२४

आज श्री. कोल्हेसाहेबांनी आणि उगले साहेबांनी कोकणांत पडणार्‍या पावसाबद्दल उल्लेख केला होता की, त्यांच्यामते सबंध हिंदुस्थानातला १४ टक्के पाऊस हा सह्याद्रीच्या पश्चिमेला पडतो.  आणि ह्या संबंधी १४ टक्के पाणी १५ ते ३० टक्के पाणी अरबी समुद्राला जाऊन मिळते.  ह्याचा वापराचा कोणताही विचार आजपर्यंत झालेला नाही. मघाशी कोल्हे साहेबांनी सांगितले की, बरचसे पावसाचे पाणी पडल्यानंतर वाहून जाते.  त्याचा वापरही आपण करत नाही !  त्याचप्रमाणे भूगर्भात जे पाणी आहे.  ज्या भूगर्भातील पाण्याचा महाराष्ट्रापुरता जरी विचार केला तरीही त्यातील १५ भागसुद्धा पाणी वापर करत नाही.  या सगळ्यांचा विचार केल्यावर दोन-चार महत्त्वाच्या गोष्टी प्रामुख्याने विचारात घ्यायला पाहिजेत.  एक, पाणी वाटपाची व्यवस्था. दुष्काळावर मात करणारी पाणी वाटप यंत्रणा महाराष्ट्राच्या शासनाने किंवा जनतेने स्वयंस्फूर्तीने उभी केली पाहिजे.  एवढेच नाही तरी पाणी वाटप प्रश्नावर सातत्याने जागृती व व्यवस्थापनात सुधारणेचे प्रयत्‍न केले पाहिजेत.  हे नाही केले तर दुष्काळाची तीव्रता आणखीच आपल्याला वाढलेली दिसते.  या संदर्भात एक छोटेसे उदाहरण देतो.  परवा रिडर्सडयजेस्ट मध्ये असे वाचायला मिळाले की, चिली नावाच्या दक्षिण अमेरिकेतील देशांमध्ये १७८६ सालापासून पाऊस पडलेला नाही.  पावसाची मुळीही नोंद नाही.  आपण जर वैज्ञानिक दृष्टीने व पद्धतीने पाण्याविषयी काही हेतूपुरस्सपर प्रयत्‍न केले नाहीत, तर काही काळानंतर महाराष्ट्रातील बर्‍याच ठिकाणी वर्षानुवर्ष नोंद नाही असे वर्तमान वाचावयास मिळेल.  हे जर थांबवायचे असेल तर ज्या ठिकाणी हमखास पाऊस पडतो.  विशेषतः कोकणांचा भाग, सह्याद्रीच्या पश्चिमेला, शक्य होईल त्या त्या ठिकाणी धरणे बांधली पाहिजेत.  ज्या ठिकाणी पाऊस पडत नाहीत अशा ठिकाणी पाणी देण्याची व्यवस्था करणे असेच असावे.  ही गोष्ट खर्चाची जरुर आहे.  परंतु दुष्काळ निवारण्यासाठी आज जनता जेवढी कष्ट भोगते आणि शासन जेवढा खर्च करते ह्यातही यातना आहेतच, ह्याचा विचार केला तर कदाचित दुष्काळ निवारणासाठी करावा लागणारा खर्च फार खर्चाची गोष्ट आहे असे वाटणार नाही.

भारताच्या उत्तरेला मध्य आशियामध्ये मृत समुद्र म्हणून आहे.  त्याच्यामध्ये अशाप्रकारचे पाणी आहे की ते प्याल्यावर आपल्याला एकही जिवंत प्राणी पहायला मिळत नाही.  अशा मृत समुद्राचे पाणी एकत्र करून आठफूट व्यासाच्या पाईपने पाणी दोन दोनशे ते तीन तीनशे मैल नेऊन, त्यांनी त्या ठिकाणी पाणी पुरवठा केलेला आहे.  आज अशाप्रकारे पाणीही शुद्ध करून शेती उत्पादन कार्यात वारले जाते.  आज आपल्याला या पद्धतीने विचार करावा लागणार आहे.  आपल्याला याच्यातून मार्ग सापडणार आहे.  अशक्य वाटणारी गोष्ट, उद्या शक्य होणार आहे.  कृत्रिम पाऊस पाडणे याचे तंत्र सुद्धा आपल्याला अवगत करून घ्यावे लागेल.  आज महाराष्ट्रामध्ये असे बोलले जाते की कृत्रिम पावसाने पाहिजे तिथे पाहिजे तेव्हा आपण कृत्रिम पाऊस पाडू शकू.  कृत्रिम पाऊस ही जगात सर्वात स्वस्त पद्धत होण्याची शक्यता आहे.

मला थोडक्यात माझे विचार मांडायला संधी दिली त्याबद्दल मी प्रतिष्ठानला धन्यवाद देतो.