• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

महाराष्ट्रातील दुष्काळ - १०४

येथील विचार शासनासमोर ठेवावे

'दुष्काळ आणि पाणी' हा परिसंवाद येथे सुरू झाला आहे.  जी काही चर्चा या ठिकाणी झाली आहे, त्यामुळे चर्चेलाही एक चांगला दर्जा मिळालेला आहे; विशिष्ट उंची लाभलेली आहे.  सगळ्यांनी राजकीय पक्षांच्या संदर्भातील आपले मतभेद बाजूला ठेवून हे व्यासपीठ उभारण्यासाठी ज्या कळकळीने प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल मी प्रतिष्ठानच्यावतीने आपणाला अंतःकरणापासून धन्यवाद देऊ इच्छितो.

येथे प्रश्न मांडले गेले, मतेही मांडली गेली आहेत, नवीन कल्पनाही मांडल्या गेल्या, आणि काही नवीन दिशाही स्पष्ट केल्या गेल्या आहेत.  चर्चा झाल्यावर हे सोडून द्यायचे की नाही हा ही प्रश्न आहे.  विचारांना वाव मिळावा, चालना मिळावी ही निश्चितपणाने त्यामागची दिशा आहे.  पण इथेच थांबूनही चालणार नाही.  या सगळ्या चर्चेमधून काही चांगल्या सूचना आल्या आहेत, त्या सर्व जे कोणी राज्यकर्ते असतील त्यांच्यापर्यंत पाठविण्याचे कामसुद्धा प्रतिष्ठानच्या वतीने करावे लागेल.  म्हणूनच या ठिकाणी सर्व पक्षांच्या लोकांना आपण निमंत्रित केले आहे व त्यांचा वैचारिक सहभाग घेतला गेला आहे.

या सूचना एकत्रित करून राज्यकर्त्यासमोर ठेवू.  राज्यकर्त्यांनी ह्या सूचना ज्या थरावर ज्या क्षेत्रात उपयोगी पडत असतील त्या ठिकाणी त्यांचा पुरस्कार करावा, अशी अपेक्षा आहे.

आपण आज महाराष्ट्रातील आर्थिक प्रश्नांवर चर्चा करणार आहोत.  अण्णासाहेबांनी सुरुवातीला यावर आपले विचार उत्तम रीतीने मांडले.  जगाच्या पार्श्वभूमीवर आपण कुठे आहोत, याचे उत्तम दिशादर्शन त्यांनी केले.  येथे अनेकांनी विचार मांडले की आर्थिक परिवर्तन करत असताना सामाजिक परिवर्तनाचा आग्रहीविचारही केला पाहिजे.  राज्य म्हणून आपण जेव्हा सर्व प्रदेशाला नजरेसमोर ठेवतो, तेव्हा त्यात विकासाचे प्रश्न उद्योगधंदा, शेतीचा विकास, शैक्षणिक क्षेत्र आणि आरोग्य विषयक सेवा देण्याच्या संदर्भात प्रश्न असतात.  आपल्या सगळ्यांची दृष्टी चौफेर असली पाहिजे, याबद्दल कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही.  या ठिकाणी सहज बोलत असताना एकाने सांगितले की, कुठल्यातरी परिसरातले लोक कष्ट करीत नाहीत, त्यातून हे ध्वनित केले की आम्ही काहीतरी करून दाखवले आहे.  ज्यांनी केले त्यांचे जरूर कौतुक केले पाहिजे.  पण ज्या परिसरात काही होत नाही, त्या पाठीमागची सामाजिक व आर्थिक कारणेसुद्धा दुर्लक्षित करून चालणार नाहीत.

जावळीच्या खोर्‍यातला माणूस

या शिबिराला येण्यापूर्वी एक दिवसभर श्री. बेल्लारे गुरुजी व आमदार पाटणकर यांच्याबरोबर जावळीच्या खोर्‍यामध्ये गेलो होतो.  तेथे प्रचंड धरण पाहिले.  २००० मेगॅवॅटपेक्षा जास्त विजेचा पुरवठा त्यामधून होतो.  त्या विद्युतशक्तीने महाराष्ट्राच्या औद्योगिक क्रांतीमध्ये मोठ्या प्रकारची कामगिरी केली आहे आणि म्हणून मला याचा अभिमान आहे.  पण ते धरण ज्या परिसरात बांधले आहे तो मात्र विक्रमसिंग पाटलांचा मतदार संघ आहे.  तेथील प्रत्येक खेड्यापाड्यातल्या माणसाची विदारक अवस्था आहे.  सगळी कुटुंबे, माणसे उध्वस्त झाली आहेत.  राज्यात संपत्तीचे धूर इतरत्र निघाले पण त्या संपत्ती निर्माण करण्यापायी त्या परिसरातले सर्वांचे सर्वस्व गेले आहे.  माणूस काही उठलेला नाही.  तिथे पाणी आहे.  त्याला संपन्न शेती करण्याची इच्छा आहे, पण त्याच्यात ताकद नाही.  हे पाणी इतक्या फुटावर उंच नेण्यासाठी त्याने प्रयत्‍न करायचे म्हटले तरीसुद्धा त्याच्यासमोर आर्थिक साधनाचा पर्याय नाही.  त्याला बाहेर पडायला रस्ते नाहीत.  तो सार्‍या जगापासून दूर राहिलेला आहे.  त्याला कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाहीत.  अशा त्या परिसरातील वस्तीला जोडधंदे करण्यासाठी ज्या सुविधा पाहिजेत त्या आपण दिल्या पाहिजेत.  त्या जेव्हा दिलेल्या असतात तेव्हा विकास क्रियेतला अनपेक्षित एकत्रित परिणाम पाहायला मिळतो.  मी ह्याबाबत चौकशी केली.  मला काही अधिकार्‍यांच्याकडून आकडेवारी व नोंदी मिळाल्या.  त्यातून असे दिसले की या परिसरातील दरडोई वार्षिक उत्पन्न ते ४९५ रु. आहे.  महाराष्ट्राचे दरडोई वार्षिक उत्पन्न रु. ३५०० या ठिकाणी सांगितले गेले.  परंतु त्या विशिष्ट परिसरात मात्र दरडोई उत्पन्न हे रु. ४९५ ते ५०० म्हणजे दारिद्रय रेषेच्याही खाली आहे.  आपण असे म्हणणार आहोत काय ही, प्रगती करण्यासाठी ते उत्सुक नाहीत,  ते आळैशी आहेत आणि ते काही करू शकत नाहीत ?  अशाप्रकारचे मत आपण व्यक्त करणार आहोत काय ?  जावळीतल्या माणसालाही विकास, उद्योगधंदे ह्या गोष्टींच्या संदर्भात उभारी घेण्याची मनापासून इच्छा आहे.  पण त्याच्यात यत्तिंफ्चितही ताकद राहिलेली नाही.  त्यांचे कंबरडे पार मोडलेले आहे.  आणि इथेच राज्य सरकारने किंवा मध्यवर्ती सरकारने व नेतृत्व करणार्‍या मंडळींनी जाणीवपूर्वक आपल्या मदतीचा ओघ ह्या माणसाच्या पाठीशी उभा केला नाही तर तो काही समुद्धीच्या रस्त्यावर चालू शकणार नाही व अशाचप्रकारे संपणार आहेत, उध्वस्त होणार आहे.  अशी अवस्था आपल्याला अनेक ठिकाणी पहायला मिळते.  आणि तीच अवस्था आज राज्यातल्या इतर अविकसित भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आहे.