• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

ऋणानुबंध (33)

- आणि आपल्या लेकीची आठवण काढून कुलसुमदादी आसू ढाळताना मी प्रथम पाहिले.

तिच्या नातवांच्या संगतीने मी त्या घरी जाऊ लागलो. पण कुलसुमदादी आणि मी यांच्यात एक नवाच आजी-नातवाचा जिव्हाळा निर्माण झाला होता. सकाळी शेळीचे दूध काढून झाले, की त्यातले थोडे दूध माझ्यासाठी घेऊन येणार. आठवड्यातून कधी बकरीच्या मटणाचे जेवण केले, तर सकाळी न्याहारीसाठी मला हळूच बोलावून घेणार आणि मीही जाणार. मी तिथे अधूनमधून न्याहारी करतो, हे माझ्या मामांना आवडत नसे, पण माझी आजी त्यांची समजूत घाली.

वर्षामागून वर्षे, उन्हाळ्याच्या सुट्टीतील हे नाते वाढत राहिले. पण कुलसुमदादी आता थकत चालली होती. सुट्टीतील, आजोळच्या घरी पोहोचलो, की माझा पहिला कार्यक्रम ठरलेला, आजीच्या पाया पडावे - ते थेट पाठीमागच्या कुसवाच्या भिंतीवर चढून एकदा तिथून आसमंत पाहून घ्यावे. निवडुंगाच्या फण्यांच्या पलीकडील काळ्याभोर जमिनीतील हिरवेगार तंबाखूचे पीक व त्याच्या पलीकडे असलेली मुलाण्याची विहीर दिसली, की कसले तरी समाधान व्हायचे. भिंतीवरूनच खाली पाठीमागच्या अंगणात उडी घ्यायची नि तीरासारखे धावत घरासमोरील कुलसुमदादीच्या घरी चक्कर टाकायची.

ती चुलीपुढे काही तरी करीत बसलेली असावयाची. ती उठून जवळ येई. तोंडावरून हात फिरवी नि माझ्या आईची विचारपूस करण्यासाठी म्हणे,
'बेटा येसू, इटाअक्का अच्छी है?'
- आणि मी म्हणे,
'छान !'
असे हे देवाघरचे नाते.

- आणि एकदा फार कडक उन्हाळा पडला. आमच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपत आल्या, तरी वळवाच्या सुद्धा पावसाने तोंड दाखविले नव्हते. रात्रीच्या वेळी आम्ही सर्व घरची मंडळी पुढच्या छोट्याशा अंगणात वा-याच्या तोंडी झोपत असू. वैशाखाच्या अमावास्येच्या रात्री मध्यरात्रीच्या सुमारास आरडाओरडा सुरू झाला, म्हणून दचकून मी जागा झालो नि पाहतो, तो मध्यान्हाच्या वेळी प्रकाश असतो, तसा प्रकाश होता. आमच्या घरासमोरच्या त्या मोठ्या वाड्यातील कडब्याच्या गंजींना आग लागली होती वा कोणी तरी लावली होती. कोणी विझविण्यास येऊ नये, म्हणून की, काय, अधूनमधून दगडही पडत होते. एक-दोन आमच्या अंगणातही आले. संरक्षणासाठी आम्ही सगळे घरात शिरलो. माझ्या थकलेल्या आजीचा जीव बेचैन झाला होता कुलसुमदादीसाठी. ती म्हणत होती,
'अरे, ही आग कुलसुमचं घर खाऊन टाकील. बाहेर जाऊन कुणी पाहा.'