• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

ऋणानुबंध (85)

जीवन पराकोटीचे समर्पित असेल, तर ते कधीच जीर्ण होत नाही. चंद्र कधी जुना होत नाही, सूर्याला म्हातारपण येत नाही, दर्या कधी संकोचत नाही. यांतील प्रत्येकाच्या जीवनात पराकोटीचे समर्पण आहे. पण अनंत युगे लोटली, तरी विनाश त्यांच्याजवळ पोहोचलेला नाही. काळाने त्यांना घेरलेले नाही. त्यांचा कधी कायापालट नाही, स्थित्यंतर नाही. ते नि:श्वसन अखंड आहे.

शास्त्रज्ञ म्हणतात,
'सूर्याभोवती ग्रहमाला फिरते.'
अध्यात्मी सांगतात,
'सूर्य जगाचा आत्मा आहे.'

नियती म्हणते,
'पंचमहाभूते माझे दास आहेत.'

दृश्य व अदृश्य जगत निर्माण करण्यात नियतीचा लीलात्मक आनंद आहे, असेही कोणी म्हणतात. मला वाटते, जग हे कलात्मक आनंदाकरिता निर्माण केलेली शक्ती आहे. या कलेत स्फूर्ती आहे, माणुसकी आहे. केवळ वैज्ञानिक हिशेब म्हणजे जग नव्हे. कला आणि पावित्र्य यांचा हा एक सुरेख संगम आहे.

मातीच्या आणि मातेच्या सान्निध्यात मला या सर्वांचा साक्षात्कार घडतो, तिच्या अंत:करणाच्या अवकाशात मी स्थिरावतो, प्रशान्त मनोभूमीवर पहुडतो, आत्मतेजाने तेजाळून निघतो, प्रेमामृताने ओलाचिंब होतो आणि श्वासात श्वास मिसळून जातो.

कन्याकुमारीच्या प्रशान्त परिसरात, कृष्णामाईच्या सान्निध्यात, गंगा-यमुनेच्या सहवासात, हिमालयाच्या कुशीत माझी अशी भावसमाधी लागते.

रशियात 'व्होल्गा'च्या तीरावरील मातीत पाय ठेवताच अंगातून अशीच एक शिरशिरी चमकून गेली. त्या तीर्थावर येणा-या प्रत्येक सहृदयाला असेच होत असले पाहिजे. तेथील ती माती, ती माता आणि तो पुत्र - त्यांचे मी दर्शन घेतले आणि माझ्या भावना उचंबळल्या. मला त्यातून जगन्मातेचे दर्शन घडले. तिथे येणारा प्रत्येकजण म्हणतो, 'ही माझी माता आहे'; आणि प्रत्येक व्यक्ती म्हणते, 'हा माझा पुत्र आहे, सखा आहे, बंधू आहे - तो माझा आहे.'  'व्होल्गा'च्या तीरावरील व्होल्गागार्ड हे जगातील एक जागृत तीर्थ आहे. रशियातील यच्चयावत मानवता येथे साकार झालेली आहे. दुस-या महायुद्धात व्होल्गाच्या तीरावर अभूतपूर्व रणधुमाळी झाली.