• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे ९२

'स्वातंत्र्याचा पहिला दिवस' या नावाचा एक सुरेख व वेधक असा लेख 'ऋणानुबंध' या पुस्तकात आहे. या लेखात स्वातंत्र्याबद्दलचे विचार व स्वातंत्र्याच्या पहिल्या दिवसाच्या आठवणी यशवंतरावांनी सांगितल्या आहेत. ते या लेखाची सुरुवात अशी करतात, "स्वातंत्र्य! जी कालपर्यंत एक अमूर्त कल्पना होती, ती आज मूर्त स्वरुपात येत होती. जे काल एक स्वप्न होते, ते आज सत्य ठरणार होते. जो कालपर्यंत एक संकल्प होता तो आज सिद्ध होणार होता. कालपर्यंत गुलाम असलेला एक देश आज स्वतंत्र होणार होता ! पारतंत्र्याचा काळोख संपून स्वातंत्र्याची मंगल प्रभात आज उगवणार होती. अननुभूत आनंदाचा तो एक दिवस, कृतार्थ भावनेचा तो एक दिवस, आज अनेक वर्षानंतरही माझ्या डोळ्यांसमोर आजा आहे. अनेक वर्षे झाली. कालगणनेचे चक्र चालू आहे. अव्याहत चालू आहे, त्याची नोंदच आहे ती. ती चुकेल कशी? पण त्या दिवसाची आठवण झाली की मनाचे हरिण केव्हाच त्या पवित्र दिवसापाशी जाऊन पोचते."

यशवंतरावांच्या अंत:करणातील स्वातंत्र्याच्या पहिल्या दिवसाची आठवण ते सांगतात. ती आठवण झाली की अजून मन भरून येते. हृदय भरून येते. देह पुलकित होतो एकूण एक संकल्प सिद्ध झाल्याची भावना यशवंतरावांच्या मनात निर्माण होते. या स्वातंत्र्याच्या पहिल्या दिवसाचे त्यांनी केलेले लक्षणीय आहे. शिवाय तो दिवस म्हणजे त्यांच्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण होता. यशवंतरावांनी स्वातंत्र्याच्या सोहळ्याचे वर्णन अत्यंत मोहक असेच केले. ते वर्णन वाचताना साक्षात तो प्रसंग एखाद्या तैलचित्राप्रमाणे डोळ्यांसमोर उभा राहतो. यशवंतराव म्हणतात, "लोकांचे जथेच्या जेथे आनंदोत्सवात भाग घेण्यासाठी निघाले होते. रोषणाई झाली होती. स्वातंत्र्याचे वारे संचारले होते. एक गुलाम देश स्वतंत्र झाला होता. आजच्या पिढीला या आनंदाची कल्पना सांगूनही येणार नाही. एका प्रकारच्या बेहोशीतच मी घरी पोचल." स्वातंत्र्याचे वारे संचारले होते. अशा अवस्थेत औत्स्युक्य, उत्साह, समाधान, भावनांचे अमृतमय रसायन यांचा उल्लेख ते करतात. शिवाय झेंडावंदनाच्या वेळची धुंदी, हर्ष मात्र आज अनेक वर्षे झाली तरी डोक्यात घर करून बसल्याचे ते सांगतात.

'संयुक्त महाराष्ट्राचे साध्य

'माझी भूमिका' 'मंगल कलश' 'संयुक्त महाराष्ट्राचे साध्य' या लेखांतून संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणि त्याची फलश्रुती यासंबंधीचे यशवंतरावांचे मनोगत आहे. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी मराठी माणसांनी दिलेला लढा, महाराष्ट्र निर्मितीचा मंगल सोहळा व त्यावेळी घडलेल्या इतिहासाचे पुनर्दर्शन करून देणारे हे लेख आहेत.

यशवंतरावांचा 'भारताची सद्यस्थिती' हा अतिशय चिंतनगर्भ लेख आहे. राजकारणातील व समाजकारणातील लोकांना विचार करावयास लावणारा आहे ते म्हणतात, "विमानातून जाताना दिसणार नद्या, पर्वतांचे रूप मोहक असते, पण प्रत्यक्ष त्या नद्या पर्वतासमोर आपण उभे राहतो, तेव्हा दुर्लंघ्य वाटू लागतात. वाटते की, ती मोहकता हा एक भास होता. आपले तसेच झाले आहे." कारण भारतातील जी स्वातंत्र्यापूर्वीची स्वप्ने होती ती पूर्ण झाली नाहीत. स्वातंत्र्यानंतर भारताचे बदलते स्वरूप यशवंतरावांनी उघड्या डोळ्यानी पाहिले आहे. सत्ता, सत्ताधारी, संस्कृती, बदलत्या संस्कृतीचे बदलते स्वरुप : हे त्यांनी डोळसपणे पाहिले आहे. त्यामुळे हा लेख म्हणजे यशवंतरावांच्या भारताबाबतच्या भूमिकेचा, समाजमनाचा आरसा आहे. या आरशात समाजाचे, देशाचे, लोकशाहीचे आणि स्वतंत्र भारताचे स्वरुप दाखवून दिले आहे. तत्कालीन राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर परखड असे भाष्य केले आहे. यशवंतरावांनी 'वर्ग संघर्ष आणि जाति संघर्ष' नागपूरच्या 'तरुण भारत' मध्ये १९७७ च्या दिवाळी अंकात लेख लिहिला. हा लेखात जातियवाद समूळ नाहीसा व्हावा. दलित समाजाविषयीची उपेक्षा थांवली पाहिजे आणि चांगुलपणाची भावना प्रत्येक माणसांच्या मनात निर्माण झाली पाहिजे. शोषकांचा अत्याचार थांबला पाहिजे. दीन-दलितांच्या मन-भावना समजावून घेऊन त्यांच्याशी समन्वय साधला पाहिजे. म्हणजे असंतोष आणि संघर्ष होणार नाही. 'माणूस' म्हणून त्याच्याकडे पाहिले पाहिजे.