• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे ७७

समृद्ध समाजाच्या निर्मितीचे स्वप्न

यशवंतरावांनी आपल्या भाषणातून समाज जीवनामध्ये परिवर्तन घडवून एकसंध समृद्ध समाज निर्माण करावा अशी रास्त अपेक्षा व्यक्त केली आहे. याचबरोबर समाजघटकांनी एकमेकांकडे संशयाने पाहणे सोडून दिले पाहिजे. विषमतेवर आधारलेल्या, विषमता निर्माण करणा-या किंवा विषमता मान्य करणा-या कोणत्याही समाजव्यवस्थेला यशवंतरावांनी नि:संदिग्धपणे विरोध दर्शविला आहे. सूज्ञ, सुविचारी प्रत्येक व्यक्तीने शाश्वत हिताचा विचार करावा असे यशवंतरावांच्या निर्मितिशील मनाचे जरी विचार असले तरी तिच्यातून सामाजिक जाणीवही प्रभावीपणे प्रकट झाली आहे. हे काम ज्ञानेश्वरांपासून रामदासांपर्यंत सर्व मराठी संतांनी आपल्या साहित्य निर्मितीच्या माध्यमातून केले. तेच कार्य म्हणजे समाजशिक्षण, प्रबोधन आणि सांस्कृतिक उन्नयन करण्याचे काम त्यांच्या अनेक भाषणांनी केले आहे. उलट समाजमीमांसा, धर्मचिकित्सा करण्याच्या नावाखाली उच्चवर्णीयांवर अर्वाच्य भाषेत टीका करून भाबड्या श्रोत्यांकडून टाळ्या मिळविण्यासाठी प्रक्षोभक बोलणे त्यांनी टाळले. समाजजीवनात द्वेषाग्री भडकवणारे वक्तव्य त्यांनी केले नाही. द्वेषाग्रीच्या ज्वाळातून परिवर्तन होईल यावर त्यांचा विश्वास नव्हता. म्हणून बहुजन समाजाला, दलित समाजाला, तरुणांना, राजकीय नेत्यांना, सामाजिक कार्यकर्त्यांना द्वेषाने भडकवणारे, बहकवणारे आणि क्षणभराचे भ्रान्त समाधान देणारे असे भाषण त्यांनी कधी केले नाही. उलट तसे केल्याने कोणत्याही समाजघटकाचे अंतिम हित साधणारे नाही याची त्यांना परिपूर्ण जाणीव होती.  त्यांच्या काळात मराठी-अमराठी, ब्राह्मण-ब्राह्मणेतर,  महार-महारेतर किंवा अन्य जातीयवाद जे निर्माण झाले ते त्यांनी तेवढ्याच संयमशील वृत्तीने हाताळले ते म्हणतात, "मी नेहमी सांगत आलो आहे की, 'मराठा' हा शब्द जातिवाचक नाही. आचार्य अत्र्यांनी आपल्या वर्तमानपत्राला 'मराठा' हे नाव दिले ते काय तो शब्द जातिवाचक आहे म्हणून दिले? 'मराठा' शब्दामागे महाराष्ट्राच्या एकजिनसी जीवाची भावना आहे. 'मराठा' शब्दाचा हा अर्थ आम्हाला अभिप्रेत आहे." ग. त्र्यं. माडखोलकरांनी आपल्या लेखात महाराष्ट्र राज्य हे 'मराठा राज्य' होणार की 'मराठी राज्य' होणार ? या विचारलेल्या प्रश्नाला यशवंतरावांनी तेवढ्याच मार्मिकतेने उत्तर दिले आहे. मराठा या शब्दाला जातिवाचक अर्थ, आपण का चिकटवतो असा सवाल करून 'महाराष्ट्रातला तो मराठा' अशी साधी सुबोध व्याख्या ते कतात, यावरून त्यांची जाती संदर्भातील भूमिका किती व्यापक होती हे स्पष्ट होते. मराठी समाजजीवन महाराष्ट्रीयत्व अथवा भारतीयत्वाचेच अंग असल्याचे ते सांगतात. म्हणून संशयाचे वातावरण निर्माण होत कामा नये; समाजात 'भंगलेले मन' निर्माण झाले तर गुणांची पूजा 'मेरिट'चे महत्त्व आणि संशयाचे वातावरण दूर केल्याने भंगलेले मन सांधता येईल असा विश्वास व्यक्त करतात. उच्च शीलाची व चारित्र्याची माणसं निर्माण व्हावीत. तेच या देशाचे खरे भांडवल आहे. गुणी बुद्धिवान व कर्तृत्ववान माणसांचे भरघोस पीक महाराष्ट्रात निर्माण झाले पाहिजे. शिक्षणाने माणसांचे जीवन संपन्न बनले पाहिजे. उमेदीने, धैर्याने आणि ईर्षेने आपल्या सगळ्या प्रश्नांना आपणच तोंड दिले पाहिजे. पूजा ही नेहमी चांगल्या गोष्टीची, सत्याची व न्यायाची होत असते. अन्यायाचा व द्वेषाचा विज कधीच होत नसतो. म्हणून आपण एक कर्तृत्वना समाज निर्माण केला पाहिजे. हा समाज जातीयवादी विचारांपासून बाजूला काढला पाहिजे. तशी माणसे निर्माण करता आली पाहिजेत. माणसे जन्मत: मोठी नसतात. मोठे प्रश्न सोडविताना गुण दाखविण्याची पुष्कळांना जी संधी मिळते त्यातून माणसे मोठी होतात.

प्रत्येक माणसाने मिळालेल्या संधीचा योग्य फायदा घेऊन आपल्या कामाचा, कार्याचा ठसा जनमानसात उमटविला पाहिजे. विधायक कार्यकर्तृत्वाने अशा संधीचे सोने केले पाहिजे. असा विश्वास ते व्यक्त करतात.

पैसा तिजोरीत नसून ढगात आहे

महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे गरिबीची आहे. या गरीब समाजाला समजावून देऊन त्यांना कार्यप्रवण केले पाहिजे गोर-गरिबांचे हाल होणार नाहीत, या दृष्टीने सदैव विचार करावा लागेल. या देशात थोड्याच माणसांनी श्रीमंत असून चालणार नाही. त्यासाठी सर्वांमध्ये आर्थिक क्षमता निर्माण झाली पाहिजे व ती व्यक्ती सर्वार्थाने शक्तिमान व्हावी. आपले पोट भरण्याकरिता समाजातील कोणत्याही व्यक्तीला दुस-यापुढे पदर पसरावा लागू नये. उद्याचा सशक्त समाज निर्माण करावयाचा असेल तर अनंतर साधनांनी युक्त असलेल्या या देशामध्ये आम्ही गरीब आहोत असे कोणीही सांगात कामा नये.