• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे ६२

यशवंतराव समाजातील सर्व थरांतील मंडळींबरोबर समरस होत. पत्रकार, व्यावसायिकांशी व प्रसार माध्यमांशी ज्यांचे संबंध होते अशा मंडळींचेही त्यांनी प्रेम संपादन केले होते. लोकशाहीतील या चौथ्या आधारस्तंभांबद्दल त्यांना नेहमीच सहानुभूतीपूर्वक आदर होता.२३ सप्टेंबर १९६४ रोजी दिल्ली येथे हिंदी पत्रकार परिषदेसमोर मराठी वृत्तपत्रांचे स्वातंत्र्यलढ्यातील कार्य या विषयावर त्यांनी भाषण केले या भाषणामध्ये वृत्तपत्रांचा जन्म व ऐतिहासिक महत्त्व विशद केले. 'दर्पण' 'ज्ञानप्रकाश', 'केसरी', 'सुधारक', 'संदेश', 'बहिष्कृत भारत', 'समता' यांसारख्या वृत्तपत्रांनी राष्ट्रीय स्वातंत्र्य व समाजसुधारणा करण्यासाठी केलेल्या कार्याचा उल्लेख केला. शिवा त्या त्या प्रमुख संपादकांची विचारसरणी व त्यांनी केलेली महत्त्वाची कामगिरी स्पष्ट केली. त्यांनी समाजाच्या विचारधनात उत्तम रीतीने घातलेली भर याचा यशवंतरावांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. या संबंधी ते म्हणतात, "सुबुद्ध मराठी समाजाच्या वैचारिक घडणीचे कार्य या काळात वृत्तपत्रांनी केले. या काळात अनेक वाद निर्माण झाले. पण त्यामुळे वैचारिक सहिष्णुता वाढली. ही सहिष्णुता व राजकीय जागरुकता लोकशाही रुजविण्यासाठी आवश्यक असते. ते कार्य मराठी पत्रांनी केले. वृत्तपत्रांना आणखीही एक दृष्टीने महाराष्ट्रात महत्तव आहे. त्यांनी ज्ञानाच्या खिडक्या उघडल्या. त्यातून पुरोगामी विचार समाजापुढे आले. वैचारिक, आर्थिक, सामाजिक विचारांची मूलभूत चर्चा त्यांनी केली." वृतपत्रे ही लोकशिक्षणाचे कार्य करतात. समाज जागृती करतात. लोकांना राष्ट्रउत्थापनासाठी कार्यप्रवम करतात असे वृत्तपत्रांचे महत्त्व यशवंतरावांनी विशद केले.

यशवंतरावांनी सरकारी प्रसिद्धी व संपर्क अधिका-यांसमोरही प्रचार आणि माहितीचे महत्त्व सांगितले. त्यावेळी यशवंतराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. प्रसिद्धी सहाय्यक परिषदेच्या उद्घाटनाच्या वेळी प्रसिद्धी ही कला आणि शास्त्र आहे असे सांगून आपली माहिती सत्यावर आधारलेली असावी, आपल्याकडे नि:संदिग्ध मन व स्वच्छ विचार असले पाहिजेत, लोकांना समजून घेतले पाहिजे. प्रसिद्धी हे दळणवळणाचे उत्तम साधन आहे. समाजाची बांधणी करण्यास त्याचा उपयोग होतो. राष्ट्रकार्यात सहभागी होण्यास उपयुक्त अशी माहिती व कल्पना समाजापर्यंत गेल्या पाहिजेत. प्रसिद्धी अधिका-यांचे वर्तमानपत्रांशी व वृत्तसंस्थेशी संबंधाबाबत ते बोलतात, "वृत्तसंस्थेशी संबंध ठेवताना आपण ही गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की आपण ज्यांच्या हातात शब्दसामर्थ्याची सत्ता आहे अशा चाणाक्ष लोकांशी काम करीत आहोत; आणि जगात शब्दांसारखी सत्ता कशातही नाही. शब्द हे कदाचित अॅटम बॉम्बपेक्षाही अधिक प्रभावी असतील,  शब्द कोणत्याही गोष्टींची उलथापालथ करू शकतात. शब्दांनी क्रांत्या निर्माण केल्या आहेत आणि कदाचित अॅटम बॉम्बची उत्पत्तीसुद्धा शब्दांतूनच झाली असेल; मी तुम्हाला शब्दांचे महत्त्व सांगत बसत नाही कारण तुम्ही शब्दसृष्टीचे राजे आहेत ते गृहीत आहे; परंतु ज्यावेळी तुम्ही वृत्तसंस्थेशी संबंध ठेवाल त्यावेळी एक गोष्ट विसरू नका की ज्यांचे शब्दरचनेवर प्रभुत्व आहे व ज्यांना शब्दांची कसरत करता येत अशाशी तुम्ही आपले काम करीत आहात, म्हणून तुम्हाला फार सावधगिरी बाळगली पाहिजे. ज्यावेळी त्यांच्याकडे जाल त्यावेळी मोठ्या कलात्मक रीतीने तुम्ही तुमचे काम पाहिजे." असा सल्ला ते प्रसिद्धी प्रमुखांना देतात. यशवंतरावांचे हे बोलणे सतत ऐकत राहावे असेच आहे. भाषेला ते उगीच नटवत नाहीत. एखाद्या वाहत्या झुळझुळ झ-याप्रमाणे आपले स्वच्छ व प्रवाही विचार ते सांगतात. सार्वजनिक जीवनामध्ये त्यांनी अनेक पत्रकारांशी प्रेमाने संबंध ठेवले. अनेत पत्रकारांच्या टीकेला त्यांना सामोरे जावे लागले. पण त्या टीकेने विचलित न होता त्यापासून बोध घेऊन ते आपल्यात सुधारणा करत असत. त्यांच्याशी वादविवाद न करता त्यांच्याशी सलोख्याने संबंध प्रस्थापित करत. असाच समंजसपणाचा सल्ला त्यांनी प्रसिद्धी प्रमुखांना दिला आहे.

यशवंतराव हे जेवढे विचारशील व भावनाप्रधान व्यक्तिमत्त्व होते तितकेच विज्ञाननिष्ठ होते. विज्ञान म्हणजे नुसते ज्ञान नव्हे तर एका विशिष्ट पद्धतीने करून घेतलेले ज्ञान आहे. निरीक्षणाने, निरनिराळे व वारंवार प्रयोग करून एखाद्या विषयाचा सुसंगत अभ्यास करून, सर्व त-हेच्या कसोट्या लावून, जे ज्ञान तर्कशुद्धपणे मांडले जाते त्यास विज्ञान असे म्हणता येईल. थोडक्यात आपल्या भोवतालचे विश्व जाणून घेण्याचा आणि त्याला अंकित करण्याचा प्रयत्न म्हणजे विज्ञान.  विज्ञान हे आधुनिक काळातील संजीवनी विद्या आहे. आणि अशाच संजीवनीची भारताला गरज आहे.