• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे- ५६

मराठीचा अभिमान

साहित्यिकांच्या मेळाव्यात यशवंतराव सारे राजकारण विसरत आणि मनमोकळेपणाने आपले विचार मांडत. यशवंतराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना मराठी भाषेला राज्यभाषेचा दर्जा मिळाला.  त्यांच्या काळात भाषा संचलनालयाची निर्मिती करण्यात आली. सरकारी यंत्रणेत मराठी भाषेचा माध्यम म्हणून उपयोग करण्यासाठी त्वरीत उपाय योजण्यात आले. शासकीय कार्यालयातील कारभार मराठी भाषेतून चालविण्याचा निर्णय घेतला. सर्व तालुका कचे-यातला कारभार, पत्रव्यवहार मराठी भाषेतून करावा असा निर्णय घेण्यात आला. मराठी भाषेला राज्यभाषेचा दर्जा मिळाल्यानंतर तिच्या जबाबदा-या वाढणार आहेत, या जबाबदा-या स्वीकारण्याची तयारी साहित्यिकांनी दाखवावी असे आवाहन ते करतात, "राज्यभाषेचा दर्जा जेव्हा भाषेला प्राप्त होतो तेव्हा लोकजीवन समृद्ध करण्याचे एक महत्त्वाचे साधन म्हणून आपण ज्या भाषेकडे पाहात असतो. आपण जाणताच की वेगवेगळ्या साहित्य प्रकारांनी लोकजीवन समृद्ध होत असते." म्हणून लोकजीवन समृद्ध करण्यासाठी या भाषेत विविध प्रकारची वाङ्मयनिर्मिती व्हावी. श्रेष्ठ साहित्याची निर्मिती झाल्यावरच ज्ञानाच्या सर्व क्षेत्रांतील विचारसंपदा जेव्हा मराठी भाषेमध्ये येईल तेव्हाच मराठी भाषा ही विचारप्रवाही होईल. ही जबाबदारी लेखकांनी व साहित्यिकांनी पेलावी असे त्यांना वाटते. "ज्ञानाच्या आणि विज्ञानाच्या क्षेत्रातील मूलभूत संशोधन हाती घेण्याचा प्रयत्न ज्या भाषेत होतो तीच भाषा ज्ञानाची भाषा होऊ शकते." मराठी भाषेचा सर्व मराठी भाषिकांना जरूर अभिमान आहे. पण ज्ञानाच्या आणि विज्ञानाच्या क्षेत्रात मूलभूत संशोधन झाल्याशिवाय मराठी भाषा ज्ञानाची भाषा होऊच शकत नाही. तेव्हा अशा प्रकारचे साहित्य निर्माण करण्याची रास्त अपेक्षा ते साहित्यिकांकडून करतात. साहित्याची किंवा साहित्यिकांची अंतिम प्रेरणा मानवी मूल्यांची जाणीव करून देणारी असली पाहिजे. निरनिराळ्या भाषेतील अक्षर वाङ्मय मराठी भाषेत आले पाहिजे.  थोडक्यात जगातील अद्ययावत ज्ञान मातृभाषेत साठवून लोकांची सांस्कृतिक अभिवृद्धी व्हावी असे यशवंतरावांना वाटते. साहित्यातून मानवी मूल्यांचे दर्शन घडते. मानवी मूल्यांचा प्रत्यय हीच वाङ्मयाची कसोटी असावी व त्यातून मानवी गुणांची वाढ व्हावी असे ते स्पष्ट करतात. साहित्य व संस्कृती यांचा मानवी जीवनाशी असलेला अनुबंध यशवंतराव येथे स्पष्ट करतात. सत्य,  प्रेम, जिव्हाळा, माणुसकी, भूतदया इ. मानवी मूल्ये मराठी साहित्यातून विकसित व्हावीत अशी अपेक्षा बुलढाणा जिल्ह्यातील सावरगाव येथे विदर्भ साहित्यसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी व्यक्त केली होती.

साहित्यिकांकडून अपेक्षा

साहित्याविषयी आवड असलेले यशवंतराव नेहमी साहित्य चळवळीमध्ये रमून जात. साहित्य संमेलन हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील एक मोठा सोहळा आहे. अशा सोहळ्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून लोक सहभागी होतात. हैद्राबाद येथील मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनपर भाषणात ते असे विचार मांडतात, "साहित्य हे सुद्धा एका अर्थाने जीवनाची समीक्षा आहे. साहित्य निर्मिती करावी, पण खरे म्हणजे जीवनावरचा लोभ सोडू नये. जीवनावरचे प्रेम कायम ठेवावे." जीवन आणि साहित्या यांचा संबंध कसा असावा याबाबतचे मत येथे यशवंतराव व्यक्त करतात. साहित्यिकांनी महाराष्ट्रातील किंवा भारतातील विविधतेचा शोध घेऊन त्यातील एकतेचा, महाराष्ट्रीयत्वाचा किंवा भारतीयत्वाचा शोध घेऊन तो लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. मराठी संस्कृतीतील साम्यस्थळे शोधून त्यांची वाढ करण्यासाठी साहित्यिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. त्याचबरोबर आतापर्यंत जे इतिहासाला अनभिज्ञ होते त्याचा शोध लावला पाहिजे. आतापर्यंत जी माणसे समाजापासून दूर राहिली, ज्यांचे जीवन साहित्याचा विषय झाले नाही अशा सर्वच उपेक्षित, दुर्लक्षित, आदिवासी, वनवासी आणि दलितांच्या प्रश्नाकडे ते लक्ष द्यायला सांगतात. त्यांचे जीवन साहित्याचा विषय होऊन साहित्यात त्याचे चित्रण झाले पाहिजे. यातूनच लोकजीवन आणि साहित्य समृद्ध होईल असा त्यांना विश्वास वाटतो. यशवंतराव सांगतात, "भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी हे जे विविधत्व आहे त्याच्याशी आपण संपर्क जोडला पाहिजे, आणि त्याच्यातून अनुस्यूत असलेल्या एक भारतीयत्वाचा आपण अनुभव घेतला पाहिजे. हा अनुभव घेण्याचा आपण कदाचित प्रयत्न करीत असाल, परंतु हा अनुभव आमच्या साहित्याद्वारे लोकांपर्यंत जाऊन पोहोचला पाहिजे." हे काम साहित्यिकांनी करावे असे त्यांना अपेक्षित आहे. कारण साहित्य हे एक सामर्थ्य आहे.