• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे- ४९

यशवंतरावांनी या लेखकांना लिहिलेल्या प्रस्तावनेत त्यांची कल्पकता आणि चिकित्सक बुद्धी पाहावयास मिळते. त्यात त्यांची साहित्यविषयक रुची प्रत्ययास येते. त्यांची साहित्यिक अभिरुची अधिक विशाल आणि वास्तवदर्शी होती याचीही प्रचिती येते. या प्रस्तावनेत प्रत्यक्ष अनुभवांचा आलेख आहे. प्रत्यक्ष जगणे, जगत असताना त्यासंबंधी उमटलेल्या प्रतिक्रिया आणि यासंबंधी जीवनाच्या तटस्थ बिंदूवरून पाहत असताना मना निर्माण होणारी चिंतन वलये त्यांच्या प्रस्तावनेत अधिक आहेत. त्यांच्या या प्रस्तावनेतून बदलत्या साहित्यिक अभिरुचीचे अनेक नमुने पाहावयास मिळतात. नव्या मान्यवर लेखकांचा, संपादकांचा, ग्रंथांचा आस्वादक आणि विश्लेषक परिचय या प्रस्तावनेतून व्हावा. त्यातून वाचकांना साहित्यिक बहुश्रुतता लाभावी इतकाच त्यांचा हेतू दिसतो.

यशवंतरावांच्या प्रस्तावनापर लेखनात स्वागताचा आणि प्रोत्साहनाचा व तन्मयतेने घेतलेल्या रसास्वादाचा मोठा भाग असावा हे साहजिकच आहे. किंबहुना त्यांच्या प्रस्तावना लेखनाचा तो प्राथमिक हेतू असावा. असे म्हणणे गैर ठरणार नाही. 'राजर्षी शाहू गौरव ग्रंथ', संपादक आमदार पी. बी. साळुंखे यांच्या या ग्रंथांबद्दल लिहितात, "गौरवग्रंथांच्या संपादनाने एक प्रातिनिधिक स्वरुपाचे जीवन परीक्षण मराठी वाचकांच्या हाती पडत आहे. ही अतिशय आनंदाची व अभिनंदनीय अशी घटना आहे." राजा मंगळवेढेकर लिखित 'भूमिपुत्र' श्री. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या चरित्र ग्रंथाला प्रस्तावनेत या ग्रंथाचे असे स्वागत करतात... " आज असंख्य नवीन कार्यकर्ते महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात धडपडणा-या मुलाप्रमाणे काम करीत आहे. त्यांना मार्गदर्शक होईल असे हे चरित्र त्यांच्या हाती पडण्याची गरज होती. चरित्रलेखकाने हा ग्रंथ या दृष्टीने लोकांच्या हाती दिला आहे... लेखकाने कष्टपूर्वक माहिती मिळवून ती शैलीदार पद्धतीने मांडली आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद." किवा "श्री. वसंतराव पोतदार यांच्या 'हैद्राबाद स्वातंत्र्य संग्राम" पुस्तकास प्रस्तावना लिहिण्यास मला आनंद वाटतो. मी उत्सुकतेने व काळजीपूर्वक हे पुस्तक वाचून पाहिले. परिक्षमपूर्वक अशा त-हेची इतिहासाला उपयुक्त ठरणारी साधने या ग्रंथांच्या रुपाने श्री. पोतदार यांनी मराठी भाषिकांच्या हाती दिल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. हैद्राबाद स्वातंत्र्य संग्रामाचा हा विलक्षण इतिहास मराठी वाचकांच्या हाती पडतो आहे. याला मला आनंद वाटतो. वाचक व इतिहासाचे अभ्यासक यांचे स्वागतच करतील अशी मला आशा आहे." यशवंतराव कोणतीही प्रस्तावना लिहित असताना त्या विषयाचा मूलभूत विचार मांडतात. मीना जोशी यांच्या इंदिरा गांधीवरील कादंबरीला लिहिलेली प्रस्तावना अशीच लक्षणीय आहे. " श्रीमती इंदिरा गांधी यांच्या बाबतीत 'संघर्ष' हा शब्दच औचित्यपूर्ण आहे. या एका शब्दात त्यांच्या सर्व जीवनाचे सार आले आहे." किंवा 'अमृतपुत्र' या भा. द. खेर यांच्या शास्त्रीजींच्या जीवनावरील चरित्रात्मक कादंबरीच्या प्रस्तावनेमध्ये लिहितात. "शास्त्रीचंया 'वामन' अवतारातील कार्य असंच चिरंजीव ठरलं आहे. अठरा महिन्यांच्या कारकीर्दीची अठरा अध्यायी गीता देशातील पन्नास पंचावन्न कोटी मुखांनी एकमुखानं गावी अशी आहे." महर्षी विठ्ठल रामजी शिंदे उर्फ अण्णासाहेब शिंदे यांच्या पुनर्मुद्रित आत्मचरित्र 'माझ्या आठवणी व अनुभव'च्या प्रस्तावनेत त्यांच्या कार्याचे महत्त्व असे सांगतात, "त्यांच्या सार्वजनिक आयुष्याचा परिपोष त्यांच्याच भाषेत सांगावयाचा झाल्यास विश्वधर्मापासून सुरुवात होऊन समाजसुधारणा, समाजसेवा व राष्ट्रोद्धार अशा टप्प्यांनी झाली. " अशा स्वरुपाचे लेखन हे त्यांचे समाजचिंतनगर्भ व विशुद्ध लेखन आहे असे नि:संकोचपणे नमूद करता येईल. त्यांच्या अशा काही शब्दयोजनेतील लय आणि सूचकता, अचूकपणाने काही विधानांना मार्मिकता प्राप्त होते. त्यामुळे यशवंतरावांच्या प्रस्तावनेमध्ये तिचा म्हणून एक 'घाट' आढळतो. हा घाट आशय आणि रचना या दोन्हींचा आहे. यशवंतराव चव्हाणांनी 'कर्मवीर भाऊराव पाटील' १९७० या अनुवादित वि.स. वाळिबे यांच्या चरित्र ग्रंथाची शिफारस करताना " हे चरित्र म्हणजे कर्मवीरांना वाहिलेली खरीखुरी श्रद्धांजली आहे. कर्मवीरांनी आपले सारे जीवन गरीब आणि मागास लोकांच्या सेवेसाठी आणि उद्धारासाठी व्यतीत केले. अशा या दूरदृष्टीच्या व्यक्तीला तिच्या कृतज्ञ संस्थेने, निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आणि महाराष्ट्रातील जनतेने या चरित्राच्या रुपाने आपी मानवंदना दिलेली आहे." असे उद्गार काढले आहेत. यशवंतरावांच्य प्रस्तावना लेखनाचा त्यांच्या वाचनाशी व अध्यापनाशी फार जवळचा संबंध आहे. मराठी पुस्तकांचे वाचन अतिशय गांभीर्याने ते करीत होते. म्हणूनच वाङ्मयासंबंधी अनेक प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाले. त्यांची उत्तरे शोधल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे म्हणूनच या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी व विचार प्रकटनासाठी त्यांनी प्रस्तावना लेखन केले. वाचलेल्या आपल्या आस्वाद प्रक्रियेला शब्दबद्ध करणे, आस्वादातील भावनिक अंग टिकविणे आणि वक्तृत्वाच्या साह्याने विचार मांडणे या त्यांच्या प्रस्तावना लेखन पद्धतीमुळे त्यांच्या प्रस्तावनांना आस्वादकता प्राप्त होते. त्याचप्रमाणे वैचारिक मीमांसाही यात येते.