• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे- ४५

साहित्य कृतीच्या अंत:स्वरुपाचा वेध घेताना यशंतरावांना इतर कला व्यवहारापेक्षा जीवन व्यवहाराचे वेगळेपण जाणवत राहिले. स्थूलमानाने त्यांची भूमिका ही जीवनवादी होती. साहित्यात समाजाचे प्रतिबिंब दिसते. साहित्यातून जीवनदर्शन घडते अशी विधाने त्यांच्या समीक्षेत वारंवार येतात. ललित वाङ्मयातून जीवनदर्शन होते असे ते सांगतात. असे जरी त्यांनी स्पष्ट केले असले तरी त्यांचे लेखन स्फुट स्वरुपाचे असल्यामुळे ते त्यांच्या वाङ्मय विषयक भूमिकेतील अनेक दुवे निसटले आहेत हे मान्य करूनही त्यांनी मराठी समीक्षेत मोलाची भर घातली आहे. १९५५-६० नंतरच्या मराठी वाङ्मयाच्या कालखंडात एक मोठा प्रभाव पाडणारे यशवंतराव चव्हाण हे एक राजकीय व्यक्तिमत्व होते. मराठी समीक्षेला एक नवे वळण देण्याचा प्रयत्न करणारा समीक्षक, नवनव्या वाङ्मयीन प्रवाहाचे स्वच्छ मनाने स्वागत करणारा आणि नवलेखकांना प्रेरणा व प्रोत्साहन देणारा एक उत्तम रसिक अशा विविध रुपांतून त्यांचा प्रभाव त्या काळात व नंतरही पडलेला आहे.

रसिक मराठी भाषिक, साहित्यप्रेमी मर्मज्ञ व समतोल भाष्यकार हा वाङ्मयीन प्रगतीचा घटक आहे असे मानणा-या यशवंतरावांनी सतत वाङ्मयाच्या विकासाचाच विचार केला आहे. साहित्य आणि समाज याचा त्यांनी विचार मांडला. साहित्य हेच मुळी जीवन आहे. साहित्याची अंतिम प्रेरा मानवी मूल्यांची जाणीव करून देणारी असावी. मानवी मूल्यांचा प्रत्यय हीच वाङ्मयाची कसोटी असे ते मानतात. साहित्य आणि समाज, साहित्य आणि भाषा, साहित्य आणि अनुभव, साहित्य आणि इतर मानवी व्यवहार यांचे तारतम्याने आकलन करून त्यांनी विचार मांडले आहेत.

जनसामान्यांच्या वाङ्मयीन अभिरुचीला अनिष्ट वळण लागू नये म्हणून टीकेचा अंकुश यशवंतरावांना महत्त्वाचा वाटतो. म्हणून समीक्षेत दोष दिग्दर्शन निर्भीडपणे यावे. तद्वतच गुणदर्शनही घडवावे. त्याचबरोबर कोणत्याही कलाकृतीचे आत्मिक सौंदर्य समीक्षकाने शोधले पाहिजे. यशवंतरावांच्या साहित्यविचारात साहित्यकृतीतील आशयाच्या संपन्नतेला महत्त्व आहे. जीवनातील सत्याचा शोध, चिरंतन जीवनमूल्याधिष्ठित विचार, कलाकृतीतील आशयाची संपन्नता वाढवित असतो. साहित्याची संस्कारक्षमता लक्षात घेऊन त्यांनी आपला साहित्यविचार मांडल्यामुळे ते वाचकाच्या अभिरुची संवर्धनाच्या बाबतीत अधिक दक्ष दिसतात.

यशवंतराव चव्हाण यांनी विविध ग्रंथांना प्रस्तावना लिहिल्या त्यांच्या जवळपास १७६ प्रस्तावना आजअखेर उपलब्ध झाल्या आहेत. त्यांनी बहुतांशी सर्वच लेखनप्रकाराला कमी अधिक प्रमाणात प्रस्तावना लिहिल्या आहेत. कादंबरी, कथा, संपादने, चरित्रे, काव्यसंग्रह, आत्मचरित्र, स्मरणिका, विशेषांक आदींना कधी आस्थेने प्रस्तावना लिहिल्या आहेत तर कधी 'दोन शब्द', 'चार शब्द' अशा स्वरुपाचे लेखन केले आहे. या लेखनाचे आशयाच्या, अर्थघनतेच्या दृष्टीने अर्थातच वेगले महत्त्व आहे. प्रस्तावना किंवा पाश्वर्भूमी म्हणून जे लेखन त्यांनी केले आहे ते संधोधन, दिग्दर्शन अशा स्वरुपाचे आहे. या प्रस्तावनेमधून यशंतरावांची साहित्यिक आणि अभिजात रसिकता प्रकट होते. तसेच त्यांचे भावस्पर्शी संवेदनशील मन आणि मार्मिक समीक्षा व आस्वादक वृत्ती पाहावयास मिळते.

यशवंतराव हे लोकनेते होते. नेता हा नीतीमान असावा लागतो. तसा असलाच पाहिजे हा आदर्श प्रत्यक्षात आचरणाने, महाराष्ट्रासमोर, देशासमोर, जगासमोर त्यांनी ठेवला. आधी ते एक गंभीर वृत्तीचे राजकारणी होते. नंतर नामवंत वक्ते, लेखक, पुढारी या नात्याने यशवंतरावांकडे अनेक होतकरू लेखक, संपादक, प्रस्तावनेसाठी येऊ लागले. आणि त्यांच्या विनंतीनुसार यशवंतरावांनी प्रस्तावना लिहिल्या असे दिसते. यशवंतरावांचे व्यक्तिमत्त्व त्या काळी एवढे प्रभावी होते की त्यामुळे त्यांच्याकडे प्रस्तावनेसाठी वळणारे लेखक त्यांच्या आशीर्वादपर चार शब्दांसाठी सुद्धा उत्सुक असावेत. त्यांच्या प्रस्तावनांमुळे लेखकांना स्वत:च्या लेखनाचा गौरव झाल्यासारखे वाटत असे. यशवंतरावांसारख्या अष्टपैलू व्यक्तीची शाबासकीची थाप आपल्या लेखनाच्या पाठीशी असावी या इच्छेनेच काही नवोदित लेखक यशवंतरावांसारख्या आपल्या आवडीच्या व्यक्तीकडे धाव घेतात. साहित्य प्रांतातील या रिवाजांची परिणती म्हणूनच यशवंतरावांच्या प्रस्तावना लेखनास प्रारंभ झाला असावा.