• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

विरंगुळा - ७१

तेजपूर (आसाम)
११ नोव्हेंबर १९६३

प्रिय सौ. वेणूबाईस,

हा दौरा पूर्ण होईतो दररोज एक पत्र लिहिण्याचा माझा मानस आहे. कसे काय जमते पाहूया. दररोज इतकी ठिकाणे पाहून होतात, इतकी वेगवेगळी माणसे भेटतात की त्या सर्वांची एक जंत्री ठेवतो म्हटलं तरी ते अशक्यच. या पत्रांच्या रूपाने त्यांची निदान अस्पष्टशी का होईना परंतु स्मृती राहील ती सुद्धा काही कमी नाही.

आज नेफाच्या पूर्वेकडील विभाग लोहित (फ्रांटियर डिव्हीजन) यामध्ये काही तास काढले. या नेफा विभागाचे महत्त्वाचे चार विभाग आहेत. एक - कॅमेंग, दुसरा - सुबानसिटी, तीन - सियांग आणि चार - लोहित. या चारही विभागांची नावे त्याच नावाच्या महत्त्वाच्या नद्या या विभागातून वाहतात त्यावरून त्यांना पडलेली आहेत. मी माझ्या चार दिवसांच्या प्रवासात यापैकी कॅमेंग आणि लोहित या दोन विभागास मी स्पर्श करणार आहे. त्यापैकी लोहित विभागास आज भेट दिली. कॅमेंग मध्ये उद्या प्रवेश करीन.
 
लोहित विभागाचे कारभार केंद्र तेजू या नावाचे छोटेखानी गाव आहे. या गावाचे नाव व स्थान मी नकाशात एकसारखे पहात होतो. त्यावरून का कोण जाणे हे डोंगराळी मुलखातील एक स्थान अशी माझी समजूत झाली होती. आज प्रत्यक्ष गाव पाहून ती माझी गैरसमजूत होती हे स्पष्ट झाले हे बरे झाले. सामान्यपणे मैदानी प्रदेशावरच या गावाची बैठक आहे. हा ब्रह्मपुत्रेच्या आणि लोहित नदीच्या काठचा सखल प्रदेश आहे. वनश्रीनी नटलेला, पाण्याच्या प्रवाहांनी वेढलेला प्रदेश आहे. विमानातून प्रवास करताना सबंध प्रदेश डोळ्याखालून जातो. त्याचे वैभव मनावर ठसते. भारीच आकर्षक मुलूख!
एका छोटेखानी नदीच्या काठावर असलेल्या तात्पुरत्या विमान तळावर 'कॅरिवू' जातीच्या वाहतुकीच्या विमानातून आम्ही उतरलो. हे ठिकाण तेजूपासून आठ मैलांवर असावे. तेथे स्थानिक वन्यजातीच्या स्त्रिया आणि पुरुष यांनी मोठ्या प्रेमाने स्वागत केले. ते आपली शस्त्रे आणि वाद्ये सांगाती घेऊन थाटामाटाने आले होते. स्वागतासाठी इतरही अधिकारी विशेषत: तेथील पोलिटिकल ऑफिसर श्री. डुगल व त्यांच्या पत्नी सौ. डुगल हजर होत्या.

तेजूच्या वाटेवर नवीन होणारा विमानतळ आहे. त्याची जागा आणि सुरू असलेली प्रगती पाहिली. तेजू येथील पी. डी. कडे घरी चहा घेतला आणि जाहीर सभेच्या ठिकाणी आलो.