• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

विरंगुळा - ४४

२ मे

कावसजी जहांगीर हॉलमधे रेशनिंगचा दहावा वाढदिवस माझ्या अध्यक्षतेखाली साजरा झाला. समारंभाची खूपच तयारी केली होती. रेशनिंग व कंट्रोल यांचा गेल्या दहा वर्षांचा इतिहास दिग्दर्शित करणारी एक नाटिका दाखविण्यात आली. समारोपाचे भाषण करताना मी 'रेशनिंगने' एका कठीण काळात बजावलेली कामगिरी गौरविली. ज्यांनी ज्यांनी ही कठीण कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी श्रम केले आणि बुद्धिचातुर्य दाखविले त्यांनाही धन्यवाद दिले. परंतु शेवटी "But I cannot wish Rationing a long or prosperous life'' असे म्हटले तेव्हा त्यातील विनोद आणि सत्य दोन्ही, जमलेल्या सर्वांनी खिलाडू वृत्तीने हशा व टाळ्यांच्या गजरात स्वीकारले.

संध्याकाळी सी. एस. डी. चे संमेलन झाले. यातील 'फिश्पाँड' मध्ये 'ए बुक ऑन ह्यूमॅनिटी' म्हणून भगवतगीतेची एक प्रत मला दिली. बेकारीची टांगती तलवार डोक्यावर असताना पुरवठा खात्याच्या मंत्र्याला ''माणुसकीची'' आठवण करून देण्यापेक्षा त्यांनी तरी दुसरे काय करावे?
------------------------------------------------------------

४ मे १९५३

पंडितजींचे कराडला भाषण झाले होते. प्रत्यक्ष सभेत अगदी पंडितजींच्या जवळ बसलो असतानाही ओळीने चार-पाच वाक्येही धड ऐकली नव्हती. अस्वस्थ मन असले म्हणजे कसे होते हा एक अनुभव आहे. मुंबईत श्री. मोटवानी यांचेकडे पंडितजींच्या भाषणाचे मुद्रित (रेकॉर्ड) ऐकावे म्हणून गेलो. श्री. तपासे हेही आले होते. मुद्रित ऐकून एक अपुरी गोष्ट पुरी केल्याचे समाधान मिळाले. श्री. मोटवानींनी हे मुद्रित सुरक्षित ठेवले असून प्रसंगी कराडला पाठविण्याचे कबूल केले.

८ मे १९५३

आज ता. ८ मे. दुपारी मुंबई सोडली. सायंकाळी ७ वाजता फलटण येथे पोहोचलो. घरी जाऊन लगेच वाड्यावर गेलो. जमिनीचे कबजेपट्टीवर सही करून ते काम पुरे केले. रात्री वाड्यावर जेवण केले. श्री. बेडके यांचेकडेही नंतर जेवण घ्यावे लागले. रात्री तेथून निघालो आणि एक वाजता कराडला पोहोचलो.
------------------------------------------------------------

९ मे १९५३

कराडात सकाळी प्रभात टॉकीजमध्ये चि. शामराव पवारचा विवाह यथासांग पार पडला. ९॥ वाजता वऱ्हाड थिएटरमधे आले आणि १०। वाजता विवाह झाला. संध्याकाळी ४ वाजता वऱ्हाड निघून गेले. अत्यंत साधेपणाने कसलीही दगदग न होता एक मोठी जबाबदारी पार पडली.
------------------------------------------------------------