• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

विरंगुळा - १०१

संरक्षणमंत्री म्हणून यशवंतराव दिल्लीला गेल्यानंतरही आठ-दहा वर्षे महाराष्ट्रातली घडी विस्कटली नव्हती. तथापी नंतर काही सत्ताकांक्षी व्यक्तींनी यशवंतरावांच्या मार्गदर्शनाला दुय्यम स्थान देऊन दिल्लीत श्रेष्ठांशी संधान बांधण्याचे कारस्थान रचले. दिल्लीतील ज्येष्ठ सत्ताधाऱ्यांना हे हवेच होते. संपूर्ण राज्याचा एकमुखी पाठिंबा प्राप्त झालेले यशवंतराव हे त्याकाळात दिल्लीतील एकमेव केंद्रीय नेते होते. त्यांचे हे पाठबळ खच्ची करण्याची संधी महाराष्ट्रातील सत्ताकांक्षी व्यक्तींमुळे दिल्लीला मिळाली. दिल्लीतून सत्तेची आणि संपत्तीची लालूच सुरू होताच महाराष्ट्रात काँग्रेस अंतर्गत गटबाजी उफाळून आली. त्याला कोणी जातीयतेची झालर जोडली. येथील विधायक आणि एकमुखी नेतृत्वाला खिंडार पाडणे दिल्लीला साधले.

महाराष्ट्रात काँग्रेस छिन्न-विच्छिन्न बनत आहे आणि स्वत:ला नेते समजणारे सत्तास्वार्थाने झपाटलेले आहेत हे पाहून यशवंतराव कष्टी बनले. अस्वस्थ झाले. ही अस्वस्थता त्यांनी स्पष्ट शब्दात नोंदवून ठेवली आहे. ते लिहितात -
------------------------------------------------------------
२ जानेवारी ७४

दिल्लीत आज महाराष्ट्र 'बंद' च्या हकीगती येऊ लागल्या आहेत. मुंबई तुलनेने शांत आहे. पुण्यात गडबड आहे. वणीला गोळीबार झाला. नागपूरला पंतप्रधानांच्या सभेत गोंधळ घालण्यात आला. हे सर्व ऐकून मन विषण्ण झाले.

हा बंदचा वेडा छंद केव्हा कमी होईल कोण जाणे. असंतोष, नाराजी आहे ती मी समजतो. परंतु समाजजीवन व उत्पादन यंत्रणा खिळखिळी करून असंतोषाला कारणीभूत असलेली परिस्थिती कशी बदलणार? ही क्रांतीची चाहूल नव्हे तर अराजकाचा धांगडधिंगा आहे.
------------------------------------------------------------

जानेवारी १९७४

महाराष्ट्रात दुष्काळाने मोठी आपत्ती आणली तरी महाराष्ट्राने यशस्वी तोंड दिले. जनतेनेही धीराने पुष्कळ सहन केले.

सीमाप्रश्नाने पुन्हा एकदा दंगली घडल्या. कोल्हापूर, सांगली, कराड जाळपोळीने बदनाम झालीत.

सातारा जिल्ह्याचे वातावरण कार्यकर्त्यांच्या दुफळीने दूषित झाले आहे. सहकारी निवडणुका म्हणजे राजकीय दृष्ट्या शाप ठरत आहे. दादा-बापूंच्या वादाने कौरव-पांडवांच्या लढाईचे स्वरूप घेतले आहे. हे सर्व पाहून हे वर्ष मी मनाने कष्टी राहिलो.