• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

इतिहासाचे एक पान. ९६

फलटणच्या सभेंत चव्हाण यांनी प्रामुख्यानं देव याच्या नेतृत्वाबद्दल नाराजी व्यक्त केली. हिरे आणि देव हातांत हात घालून, संयुक्त महाराष्ट्राच्. प्रश्नाबद्दल पावलं टाकत होते, तरी चव्हाण यांनी हिरे यांच्या नांवाचा सभेंत उघडपणें उल्लेख केला नाही. असं असलं तरी हिरे यांना परस्पर उत्तर मिळणारच होतं. राजीनामे गोळा करणं, उपोषण करणं या देव आणि हिरे यांच्या हालचाली सरळ सरळ काँग्रेस पक्षाच्या शिस्तीला बाध आणणा-या आहेत, काँग्रेस पक्षाचा अधिकृत आदेश नसतांना, प्रदेश काँग्रेसनं आमदारांकडून राजीनामे घेण्याचा विचार करणं हें अयोग्य आहे, असं चव्हाणांनी या सभेंत कार्यकर्त्यांना सांगितलं. राजीनामे, संप, उपोषण असल्या दबावाच्या राजकारणाला चव्हाणांचा विरोध होता.

शंकरराव देव हे त्या वेळीं काँग्रेसचे सभासदहि नव्हते. तरीहि ते काँग्रेस आमदारांना राजीनाम्याचा सल्ला देऊन, राजीनाम्याला अनुकूल वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीनं स्वतः उपोषणाला बसले. देव हे पूर्वीचे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष. अखिल भारतीय काँग्रेसचे ते चिटणीसहि होते आणि आता संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे अध्यक्ष झाले होते. संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नाबद्दलची त्यांची तळमळ निर्विवाद होती. पं.नेहरु, पंत यांच्या मनांत देव यांच्याबद्दल आदर होता. त्यामुळे दिल्लीस ते ज्या वेळीं चर्चेसाठी जात असत त्या प्रत्येक वेळीं त्यांचा युक्तिवाद श्रेष्ठांनी समजून घेतला, त्यांना सन्मानानं वागवलं. परंतु त्यांची ही प्रतिष्ठा जमेस धरुनहि महाराष्ट्रांत त्यांच्याकडून दिला जाणारा सल्ला आणि ते करत असलेली कृति एक दिवस महाराष्ट्र काँग्रेसच्या मुळावरच घाव घालण्यास कारणीभूत ठरण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसमधील त्यांचं नेतृत्व झुगारून देणं यशवंतरावांनी काँग्रेस पक्षाच्या द्ष्टीनं व्यवहार्य मानलं असावं. मोठ्या धिटाईनं फलटणच्या सभेंत त्यांनी तें झुगारुन दिल्याचं जाहीर केलं. आपल्या या भूमिकेचा गैरफायदा विरोधी पक्ष घेतील आणि महाराष्ट्रांत वैयक्तिक दृष्ट्या त्याचे परिणाम सहन करावे लागतील याची कल्पना असूनहि त्यांनी हें केलं. देव यांचं नेतृत्व झुगारून देतांना संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नाबद्दलची आपली भूमिकाहि या सभेंत त्यांनी स्पष्ट केली. आपल्याला मंत्रिपदाची आसक्ति नाही हेंहि त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं. देव हे काँग्रेसचे सभासद राहिलेले नसल्यानं, काँग्रेस पक्षाची कसलीहि जबाबदारी त्यांच्यावर उरलेली नव्हती. या संदर्भात यशवंतरावांनी देव यांना एका पत्राव्दारे अगोदरच कळवलं होतं की, उपोषण, निदर्शनं, राजीनामे वगैरै भाषा तुम्ही बोलणार असाल, तर कृपया काँग्रेसच्या नांवाखाली ती भाषा तुम्ही बोलूं नये.

देव हे वाटाघाटीसाठी म्हणून दिल्लीला हिरे यांच्यासमवेत गेले असतांना, मागे महाराष्ट्रांत यशवंतराव यांनी फलटणच्या सभेंत त्यांचं नेतृत्व झुगारून दिल्याचं जाहीर होतांच, महाराष्ट्रांत त्यांच्यावर फितुरीचे, विश्वासघाताचे आरोप लुरु झाले. फलटणच्या सभेंपूर्वी घडलेल्या घटना लक्षांत घेतां यसवंतरावांचे बोलणं हें विश्वासघाताचं, फितुरीचं ठरण्याचं वस्तुतः कारण नव्हतं. देव, हिरे यांना अगोदर एक आटवडा त्यांनी आपले विचार पत्रानं कळविले होते. त्या दोघांनाहि त्याची कल्पना होती आणि तरीहि कोणत्याहि प्रकारचं निराकरण न करतं ते दोघे दिल्लीला गेले होते. अर्थातच विरोधकांनी या परिस्थितीचा लाभ उठवणं त्या काळांत स्वभाविकच होतं. संयुक्त महाराष्ट्राचा न्याय न देणा-या काँग्रेसविरुद्ध लोकमत तयार होण्यालाठी त्याचा उपयोग होता आणि त्याप्रमाणे त्यांनी तो करून घेतला.

या सभेंतील यशवंतरावांच्या आणखी एका विधानानं त्या काळांत महाराष्ट्रांत खळखळ उडवली. “संयुक्त महाराष्ट्र आणि पं.नेहरू असा पेंच माझ्यापुढे आला, तर मी नेहरूंचाच कौल देईन” असं तें विधान होतं. अर्थात हें ठाम विधान करण्यापूर्वी एकूण परिस्थितीचं विश्लेषणहि त्यांनी केलं होतं आणि त्या विवेचनाचा निष्कर्ष म्हणून कार्यकर्त्यांना त्यांनी ही भूमिका सांगितली होती; परंतु मागचा-पुढचा संदर्भ सोडून देऊन एवढं एकच विधान कुणी उगाळत बसायचं ठरवलं, तर महाराष्ट्रापेक्षा नेहरू श्रेष्ठ म्हणणा-या यशवंतरावांना दोष चिकटवणं सुलभ ठरतं. वस्तुत: १९५६ मध्येहि त्यांनी पूर्वी एका संदर्भात ही आपली भूमिका व्यक्त केलेलीच होती; परंतु फलटणच्या सभेचा संदर्भ वेगळा होता. परिषदेचे अध्यक्ष शंकरराव देव यांचं नेतृत्व त्यांनी झुगारून दिलं होतं, आणि नेहरूंचा मोठेपणाहि याच सभेंत सांगितला होता. विरोधकांनी ‘अधिकस्य अधिकं फलम्’ या न्यायानं या दोन्ही गोष्टी एकत्र करून प्रखर विरोधाची हवा निर्माण केली नसती तरच नवल!