• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

इतिहासाचे एक पान. ७१

काँग्रेसचा पुढारी बनणं म्हणजे सत्ता, संपत्ति, प्रतिष्ठा यांसाठी सुवर्णसंधि होय, असा काळ काँग्रेसच्या वाटचालींत पुढे निर्माण झाल्यानंतर या काळाला अनुलक्षून यशवंतरावांना तसल्या त्या तथाकथित पुढा-यांच्या रांगेत उभे करण्याचा प्रयत्न कांही बुद्धिवादी म्हणवणा-यांनी केला. त्यांतून जरी प्रगट होत असला, तरी यशवंतरावांच्या जीवन-इतिहासाशी मात्र तें सुसंगत नव्हतं. ही विसंगती ऐकूनहि स्वतः यशवंतराव मात्र त्या बाबतीत नेहमी अबोलच राहिले. महाराष्टाच्या मनोवृत्तीशीं अर्थातच हें साजेसं नव्हे असं कोणी म्हणतील. कारण जो तो बुद्धीच सांगे ही वस्तुतः महाराष्टाची परंपरा, पण आश्र्चर्य हें आहे की, महाराष्टात जन्म घेऊनहि यशवंतरावांमध्ये मध्ये महाराष्टाचे ते उपजत गुण संवर्धित झालेले आढळत नाहीत. महाराष्टांतील अव्वल दर्जाच्या बुद्धिमंतांच्या आणि कर्तृत्ववान पुरुषांच्या वैचारिक संगतीतच यशवंतरावांचा वैचारीक पिंड बनला आहे. हंसक्षीर-न्याय त्यांनी आत्मसात केला.

स्वातंत्र्याच्या चळवळींत काम करतांना, स्वातंत्र्य कशासाठी याचा अभ्यास, तुरुंगवासाच्या काळांत मोठमोठ्या पुढा-यांच्या संगतीत त्येना करतां आला. याचा परिणाम असा झाला की, स्वातंत्र्यपूर्व काळांत चळवळीत असतांना किंवा स्वातंत्र्योत्तर काळांत सत्ता- संपादनानंतरहि स्वातंत्र्य कशासाठी, यासंबंधीचं त्यांचं अवधान कधी सुटलं नाही. त्यांनी आपला असा स्वतंत्र ‘इझम’ वगैरे देशासमोर ठेवला काय, यापेक्षा त्यांनी आपल्या जीवनांत पवित्र राष्टीय विचाराचं जें मूलभूत मूल्य जोपासलं तें सर्वश्रेषेठ असंच ठरल. नेतृत्व संपन्न बनायचं आणि याचा लाभ राष्ट्राला व्हायचा, तर या रायाभूत मूल्याचं महत्व अधिक आहे. वैयक्तिक जीवनांत जेव्हा संकट उभं रहातं आणि निर्णय करण्याचा प्रसंग येतो त्या वेळीं आशा नेत्याकडून केले जाणारे निर्णय हे स्वतःला आणि राष्ट्राला तारुन नेणारेच ठरतात. यशवंतरावांच्या जीवनांत असे व्यक्तिगत आणि राष्ट्राच्या जीवनासंबंधीचे निर्णय करण्याचे प्रसंग पुढच्या काळांत सततच येत राहिले. त्यांनी तसे निर्णय अनेक प्रसंगीं केले आणि केलेले निर्णयच योग्य होते, अशी इतिहासाची साक्ष नोंदली गेली आहे.

बाळासाहेब खेरांच्या राजवटीतच यशवंतरावांची कसोटी या दृष्टीनं प्रथम लागली. समाजांतील आर्थिक विषमता नाहीशी करुन व बहुजन-समाजाचं आर्थि शोषण ज्या परिस्थितीमुळे होत आहे ती बदलून सामाजिक स्वास्थ निर्माण करणं व देश सर्वार्थानं संपन्न बनविणं हें स्वराज्याचं ध्येय होतं. लोकमान्य टिळक, गांधीजी, नेहरु यांनी ही प्रतिज्ञाच उच्चारली होता. पं. नेहरुनी समाजवादाच्या ध्येयाचा पुकारा करुन काँग्रेसचं ध्येय धोरणहि सांगितलं होतं. काँग्रेसप्रणीत समाजवादाचे यशवंतराव हे तर पुरस्कर्तेच होते. सत्ता मिळवण्यासाठी संघर्ष आणि समाजवादासाठी सत्ता वापरण्याचा संघर्ष त्यांना अभिप्रेत होताच. स्वतः असेब्लीची निवडणूक लढवतांना त्यांच्यासमोर हेंच ध्येय होतं. परंतु निवडणुकीनंतर बाळासाहेब खेर यांच्या एकूण धोरणामुळे त्यांना त्यांच्या ध्येयपूर्तीचा मार्ग मुक्त करुन मिळत नाही, आसं अनुभवास येऊं लागलं. खेर हे संकुचित जातीय द्दष्टिकोन बाळगणारे नेते नव्हते हें खरं, परंतु त्यांची जवळीक शहरी बुद्धिजीवी वर्गाशीं अधिक होती. ते स्वतःहि त्याच वर्गांतले होते. मोरारजी देसाई, जिवराज मेहता आदि त्यांचे प्रमुख सहकारीहि त्याच वर्गाचे प्रतिनिधि. सातारा जिल्ह्यासाठी मंत्रिमंडळांत जें प्रतिनिधित्व दिलं तें फलटणचे मालोजीराजे निंबाळकर आणि दुसरे गणपतराव तपासे या दोघांना ! मालोजीराजे यांनी मंत्रिमंडळांत आणि बाहहेरहि जें प्रतिनिधित्व केलं तें फक्त मोरारजी देसाई यांच्यापुरतं मर्यादित होतं. मोरारजी हेच त्यांचे नेते आणि तेच त्यांचं सर्वस्व. गणपतराव तपासे हे समाजांतल्या खालचे थरांतले होते, परंतु ते सातारा जिल्ह्याचे मान्य नेते नव्हते. मंत्रिमंडळांतील त्यांची तरतूद ही एक तडजोड होती. खेर यांनी मंत्रिमंडळांत, बहुजन-समाजांतील कर्तबगार आणि ख-या अर्थानं बुद्धिवादी अशा नेत्यांचा समावेश केलाच नव्हता. शंकरराव मोरे, केशवराव जेधे यांच्यासारखे नेते दूर ठेवण्यांत आले आणि ल.मा. पाटील, गोविंदराव वर्तक (हरिभाऊ वर्तक यांचे वडील), बी. डी. देशमुख, तपासे यांचा प्रांतिक-काँग्रेसनं यशवंतरावांसाठी जोरदार शिफारस केलेली असूनहि त्यांना मंत्रिमंडळापासून दूर ठेवण्यांत आलं आणि पार्लमेंटरी सेक्रेटरीपदाची जागा देण्यांत आली. खेर यांच्या या निर्णयानं बहुजन-समाजांतील मोरे, जेधे, काकासाहेब वाघ आदि नेते अस्वस्थ बनले.