• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

इतिहासाचे एक पान. ३०७

युरोपच्या दौ-यावरुन परतल्यावर निजलिंगप्पा यांनी १९ जूनला काँग्रेस-कार्यकारिणीची बैठक या प्रश्नाचा निकाललावून घेण्यासाठी आयोजित केली. त्या बैठकीच्या अगोदर दिल्लीतलं राजकीय वातावरण बरंच ढवळलं गेलं होतं. काँग्रेस संसदीय पक्षाचीहि बैठक बोलवायचे मनसुबे तयार झाले होते. निजलिंगप्पा, कामराज, स.का.पाटील आणि त्यांच्या भोवतीच्या कांही काँग्रेस-नेत्यांनी राष्ट्रपतिपदासाठी योग्यायोग्यतेचा निकाल देणा-या, विश्वासू अशाच उमेदवाराची निवड व्हावी यासाठी लटपटी सुरु केल्या होत्या. थोडक्यांत म्हणजे त्यांना सिंडिकेटचा उमेदवार निश्चित करुन हवा होता. त्यांच्या पैकी सर्वांना नसली तरी ब-याच जणांना संजीव रेड्डी यांची उमेदवारी मान्य होती. खरं म्हणजे मोरारजी, निजलिंगप्पा, कामराज हे स्वत:च तें पद मिळवण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून होते. त्यामुळे प्रसंग असा निर्माण झाला होता की, ज्यांनी उमेदवाराची निवड करायची ते स्वत:च उमेदवाराला मिळवून देण्याचं पद स्वत:कडे घेण्याचा विचार सुस्पष्टपणें करत होते.

पंतप्रधानांच्य गोटामध्ये, उमेदवारी कोणाला द्यावी यासंबंधीचा निर्णय निश्चित झाला नव्हता. कामराज यांन आपलं नेहमीचं, 'सर्वांची संमति' अजमावण्याचं तंत्र सुरु केलं होतं. वस्तुत: त्यांनी सर्वांच्या संमतीचा अंदाज घ्यावा असा कुठलाहि अधिकार त्यांना आता उरलेला नव्हता. परंतु तरीहि त्यांनी आपलं तंत्र हाताळण्याला सुरुवात केली. त्याच तंत्राचा अवलंब करून ते १७ जूनला यशवंतरावांच्या निवासस्थानीं दाखल झाले.

या दोघांमध्ये झालेल्या चर्चेंत कुठल्याहि स्थितींत 'गिरी नाही' असं कामराज यांनी यशवंतरावांना सांगितलं. तसं पाहिलं तर, संजीव रेड्डी हे या जागेसाठी योग्य ठरतील, परंतु मी अजून माझा निर्णय पक्का केलेला नाही, अशी पुस्तीहि कामराज यांनी पुढे जोडली.

काँग्रेस-कार्यकारिणीच्या बैठकीच्या अगोदर म्हणजे १७ व १८ जूनला दिल्लीला वरिष्ठ पातळीवर चर्चा आणि खलबतं यांचा सुकाळ झाला होता. ही बैठक १९ जूनला व्हायची होती. त्या अगोदर इंदिरा गांधी व गिरी यांच्यांत चर्चा झाली. या चर्चेंमध्ये गिरी यांनी आपली पूर्वीचीच इच्छा पुन्हा एकदा बोलून दाखवली आणि निजलिंगप्पा यांच्याशीं झालेला संवादहि सांगितला. इंदिरा गांधी यांन मात्र त्यांना वचन दिलं नाही किंवा गिरी यांनी आशेवर रहावं असंहि कांही त्यांच्या बोलण्यांतून ध्वनित झालं नाही. निरनिराळ्या पक्षांच्या मतांचा त्या अंदाज घेत आहेत, एवढंच गिरी यांना उमजलं. सिंडिकेटमधील नेते आणि निरनिराळ्या राज्यांतील काँग्रेसचे मुख्य मंत्री यांच्याशीं त्या चर्चा करत राहिल्या.

पंतप्रधानांनी १८ जूनला संध्याकाळी एक बैठक बोलावली आणि या बैठकीला येण्याविषयी यशवंतरावांना सुचवलं. यशवंतराव पंतप्रधानांच्या निवासस्थानीं त्यानुसार गेले. त्यापूर्वी तिथे जगजीवनराम, स्वर्णसिग आणि फक्रुद्दीन अलि अहमंद पोंचले होते आणि उमेदवारीच्या संदर्भात त्यांची चर्चा सुरू झाली होती. जगजीवनराम यांनी या वेळीं त्यांच्या आणि संजीव रेड्डी यांच्या भेटींतली चर्चा आणि यशवंतरावांपाशीं कामराज यांनी केलेली चर्चा सांगितली. संजीव रेड्डी चर्चा करून गेल्याचंहि त्यांनी पंतप्रधानांपर्यंत पोंचवलं.

पंतप्रधानांचं म्हणणं असं होतं की, माझा स्वत:चा असा कोणताहि उमेदवार नाही, परंतु विरोधी पक्षांनाहि मान्य होईल अशा उमेदवाराची निवड काँग्रेसनं करावी राजकीय हिकमतीनं किंवा उमेदवार-निवडीच्या नेहमीच्या पद्धतीनं आपला उमेदवार निश्चित करणं त्यांना मान्य नव्हतं. अशामुळे विरोधी पक्षांचे संबंध दुरावतील आणि काँग्रेस-अंतर्गत फाटाफुटीला वाव मिळेल. असं त्यांना वाटत होतं.

त्यानंतर इंदिराजी २३ जूनला जपानच्या दौ-यावर रवाना झाल्या. पंतप्रधान परदेशी जातांच सिंडिकेटवाल्यांनी संजीव रेड्डी यांना पाठिंबा मिळवण्याच्या कामाला आवेशानं प्रारंभ केला; दरम्यान इंदिराजींनी ठरल्याप्रमाणे जपानचा दौरा तर पूर्ण केलाच शिवाय इंडोनेशियाची भेट संपवून ३ जुलैला त्या भारतांत परतल्या.