• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

इतिहासाचे एक पान. २५१

५ नोव्हेंबरला संध्याकाळी यशवंतराव दिल्लीहून मुंबईस येण्याला निघाले. त्यांना संरक्ष-फंड जमा करायचा होता आणि त्याहीपेक्षा, चीनच्या आक्रमणामुळे हवालदिल बनलेल्या नागरिकांना दिलासा देऊन त्यांची उमेद टिकवून धरण्याचं काम त्यांच्या समोर होतं. मेनन यांनी राजीनामा सादर केला होता आणि त्यानंतर दोन दिवस पंतप्रधानांनी मुख्य मंत्र्यांशी चर्चा करून कानोसा घेतला होता. आता कांही तरी अंतिम निर्णय करण्याची गरज होती. लालबहादूर शास्त्री हे पं. नेहरूंच्या खास विश्र्वासांतले सल्लागार होते. या दोघांनी मग ६ नोव्हेंबरला नव्या संरक्षणमंत्र्यांच्या निवडीबाबत खलबत केलं. देशांतले त्या काळांतले केंद्रीय मंत्रिमंडळांतील मंत्री, निरनिराळ्या राज्यांचे मुख्य मंत्री यांची नामावलि तपासतां तपासतां नेहरू-शास्त्रीजी यशवंतराव चव्हाण यांच्यापर्यंत पोचले आणि तिथेच थांबले. संरक्षणमंत्रिपद चव्हाणांकडे सुपूर्त करण्याबाबत या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांचं एकमत झालं होतं आणि म्हणूनच त्या दिवशी पं. नेहरूंनी तातडीनं मुंबईला फोन करून यशवंतरावांची अनुमति विचारली होती. निश्र्चित निर्णय अजून व्हायचा होता. यशवंतरावांचा होकार किंवा नकार एवढंच पं. नेहरूंना जाणून घ्यायचं होतं.

दरम्यान ६ नोव्हेंबरलाच संसदीय काँग्रेस-पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक दिल्लीला महावीर त्यागी यांच्या निवासस्थानी भरून त्यांनी पं. नेहरूंकडे एक गुप्त खलिता रवाना केला. मेनन यांच्या राजीनाम्याची मागणी करणारं ते पत्र होतं.

गोष्टी आता पुढच्या थराला गेल्या होत्या. दुस-या दिवशी पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक होणार होती. या बैठकीसाठी पं. नेहरूंचं आगमन होईल तेव्हा कोणाहि सभासदानं आदर व्यक्त करण्यासाठी उठून उभं रहायचं नाही, उलट सर्वांनी माना खाली घालून बसून रहायचं आणि पंडितजींनी याबद्दल कांही विचारणा केल्यास महावीर त्यागी यांनीच त्यांना उत्तर द्यायचं, असंहि या मंडळींनी ठरवलं.

दुस-या दिवशी कार्यकारिणीच्या बैठकींत, मेनन यांचा राजीनामा मागणा-या त्या पत्राबद्दल पं. नेहरूंनी तीव्र नापसंती व्यक्त केली. इतकंच नव्हे तर, मेनन यांच्या बाजूचं त्यांनी समर्थन केलं आणि “तुम्हांला माझं नेतृत्व अमान्य असेल, तर हा घ्या माझा राजीनामा” असं ते संतापानं बोलले.

कार्यकारिणीचे सदस्य शांत होते. नेहरूंनी संतापानं राजीनाम्याची तयारी दर्शवलेली पाहून, “काय, मोतीलाल नेहरू यांचाच पुत्र एवढ्या संतापानं बोलतोय कायॽ” असं महावीर त्यागी यांनी नेहरूंकडे पाहून एक वाक्य उच्चारलं. त्यागी यांनी मग पुढे अशीहि पुस्ती जोडली की, भारताच्या पूर्व-सीमेवर अगोदरच बाका प्रसंग निर्माण झालेला आहे, अशा स्थितींत राजीनाम्याची धमकी देऊन देशांतर्गत समस्या तुम्हांला निर्माण करायची आहे काॽ

हे सर्व बोलून झाल्यावर त्यागी यांनी दिलगिरी व्यक्त केली. पं. नेहरू मात्र या बैठकीत  मेनन याचं समर्थनच करत राहिले. मेनन यांचं एकसारखं समर्थन केलं जात आहे असं पाहून कार्यकारिणींतल्या सभासदांमध्ये चुळबुळ सुरू झाली. त्यागी यांचं बोलून झालं होतं. आता दुसरे एक सभासद पुढे सरसावले आणि त्यांनी नेहरूंना परखडपणे ऐकवलं, “ठीक आहे, आज मेननची पाळी आली आहे, उद्या ती तुमच्यावर येईल!”

कार्यकारिणीच्या सभासदांचा हा पवित्रा पाहून पं. नेहरूंना मोठाच धक्का बसला. परिणामी दुस-याच दिवशी मेनन यांचा राजीनामा स्वीकारण्यांत आला असल्याचं नेहरूंनी जाहीर केलं.

दिल्लीत या उलथापालथी घडथ असतांना, इकडे मुंबईत यशवंतराव मात्र मनाच्या द्विधावस्थेत सापडले होते. एक प्रामाणिक काँग्रेस-कार्यकर्ता आणि पं. नेहरूंचा अनुयायी म्हणून त्यांनी सुचवलेल्या कामगिरीचा स्वीकार करण्यास त्यांची तयारी होती. परंतु मुंबईचा त्याग करण्यास त्यांच्या मनाची तयारी होत नव्हती. समर्थ मुख्य मंत्री म्हणून त्यांची प्रतिमा महाराष्ट्रांत निर्माण झालेली होती. उलट दिल्लीतलं राजकीय वातावरण त्यांना नवीन होतं.