• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

इतिहासाचे एक पान. २१५

शिवनेरी हा जुन्नरच्या परिसरांतला किल्ला. खुद्द जुन्नर या गावालाहि ऐतिहासिक महत्व आहे. जुन्नर ही प्राचीन महाराष्ट्र राज्याची राजधानी होती. भीमाशंकरच्या लेण्यांत याचा उलगडा करणारा लेख खोदलेला आहे. जुन्नरभोवतालच्या डोंगरांत सुमारे दीडशे लेणी आहेत. या लेण्यांमध्ये जे लेख खोदलेले आहेत त्यांवरून जुन्नर शहराचं प्राचीन महत्व समजू शकतं. नव्या महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई शहर हे असून संयुक्त महाराष्ट्राची घोषणा करण्यासाठी जुन्नर-शिवनेरीची निवड निश्र्चित व्हावी, यामागे ऐतिहासिक सुप्त शक्तींचा कांही धागा असला पाहिजे. राज्यकर्त्यांना या शक्तीनंच इथे खेचून आणलं असलं पाहिजे !

मानवमात्राच्या शक्तीला अखेर मर्यादा या असतातच. शास्त्राच्या साहाय्यानं दृश्य जगावर आणि निसर्गावर प्रसंगी तो जय मिळवताना दिसतो. निसर्गाच्या शक्तीचं संवर्धन आणि परिवर्तन करूं शकतो. परंतु अदृश्य जगांतली शक्ति ताब्यांत ठेवून त्यांना राबवण्याची शक्ति संपादन करणं हे त्याला दुरापास्त ठरलं आहे. अदृष्टांतली शक्ति मात्र, मानवमात्राला, त्याचं भवितव्य घडवण्यासाठी राबवून घेत असतात. सह्याद्रीच्या प्रचंड ढालीवर स्थायिक झालेला सर्वांना अपरान्तापासून (कोकण) विदर्भ-मराठवाड्यापर्यंत सर्व लोकांना शिवनेरीवर या अदृश्य शक्तीनं पाचारण केलं याचा हेतु स्पष्ट होता.

महाराष्ट्रातल्या कांही रहिवाश्यांना उच्च-गंडानं पछाडलेलं असतं, तर काहींना न्यूनगंडानं ! आपसामध्ये क्षुल्लक संघर्ष आणि भेदभाव करण्यांतच कांहीची शक्ति खर्च होत असते. सह्याद्रि हा महाराष्ट्राच्या ऐक्याचा सूत्रधार असल्यामुळे संयुक्त महाराष्ट्र निर्माण होत असतांना सामान्य, क्षुद्र विकल्प दूर करून महाराष्ट्राच्या नैसर्गिक ऐक्याला मूर्त व संघटित स्वरूप प्राप्त करून देण्यासाठीच सह्याद्रीच्या अदृश्य शक्तीनं, सारा महाराष्ट्र एकजीव करण्यासाठी, त्याला शिवनेरीवर पाचारण केलं असलं पाहिजे. शिवनेरीवर जन्मलेल्या शिवाजीनं, हिंदवी स्वराज्याचा – स्वातंत्र्याचा संकल्प सोडला तेव्हा सह्याद्रीनं हा चमत्कार घडवला होता. शिवाजीचा तोच महाराष्ट्र आता स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वात येत होता.
आता ऐक्याची जरुरी होती. विकासाचा किल्ला लढवायचा होता.

शिवनेरीवर शिवाई – पार्वती – होतीच. सह्याद्रीचा स्वामी शंकर, कडेपठारांचा स्वामी खंडोबा, गंगथडीची महिषासुरमर्दिनी, भीमथडीची तुळजाभवानी, कृष्णथडीची कोल्हापूरची महालक्ष्मी, अपरान्ताचा परशुराम, देश-भागाचा विठोबा आदि सर्व शक्तींचा समन्वय जणू आता शिवनेरीवर झालेला होता. शिंग, तुता-या यांच्या ललका-या अस्मानाला भिडत राहिल्या. हलगी, ढोल, लेजीम यांच्या नादानं दुमदुमलेलं वातावरण गुलालानं माखून निघालं.

या आनंदोत्सवाचे प्रमुख होते मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण. मुंबईतून ‘सह्याद्रि’- मधूनच ते शिवनेरीला पोचले. मुंबईत प्रमुख अशा निरनिराळ्या धर्मगुरूंचा आशीर्वाद त्यांनी अगोदर घेतला होता. शिवनेरीवर येताच बालशिवाजी आणि मातोश्री जिजाबाईंच त्यांनी दर्शन घेतलं, त्यांच्या प्रतिमांचं उद्घाटन केलं आणि श्रीशिवछत्रपतींना मुजरा करून मगच नव्या महाराष्ट्र राज्याची घोषणा करण्यासाठी ते सिध्द झाले.

शिवजन्मानं महाराष्ट्राच्या इतिहासाची जिथे सुरुवात झाली त्याच पवित्र ठिकाणी विसाव्या शतकांत नव्या शतकांत नव्या महाराष्ट्र राज्याच्या इतिहासाची सुरुवात व्हावी, हा प्रसंग पवित्र आणि अपूर्व होता. या सुवर्ण-दिवशी नव्या राज्याचे प्रमुख या नात्यानं महाराष्ट्राच्या परमेश्र्वराला प्रणाम करण्याची आणि श्रीशिवप्रभूंचे आशीर्वाद मिळविण्याची संधि यशवंतरावांना लाभली, हा त्यांच्या जीवनांतला मोठाच योगायोग ! अनेक भावनांनी त्या दिवशी त्यांचं मन भारावून गेलं होतं. याच भावना शिवनेरीवर जमलेल्या अथांग लोकसागराला, किंबहुना सा-या महाराष्ट्राला त्यांनी बोलून दाखवल्या. त्यांच्या प्रत्येक शब्दांतून नव्या राज्याच्या महत्वाकांक्षा आणि समृध्दीची तळमळ व्यक्त होत राहिली. त्यांनी सांगितलं-