• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

इतिहासाचे एक पान. १६५

राज्य-पुनर्रचनेचं मंथन एकदा झालं आहे आणि ते आता पुन्हा होणार  नाही असं बिंबवण्याचा त्यांचा हा प्रयत्न होता. चांदा, भंडारा, नागपूर हे जिल्हे वेगळे निघणार आहेत अशी एक आवई त्या वेळीं उठली होती. अन्य कांही कामं नसणारांनी निष्कारण कांही तरी उद्योग किंवा विरोध करत रहाण्यासाठी या अफवा उठवण्याचं काम सुरू केलं होतं.

मुंबई राज्यांत आलेले हे जिल्हे परत जाण्यासाठी आलेले नाहीत हें या मंडळींना माहिती होतं. राज्याची राजधानीहि निश्चित झाली होंती आणि त्यांत बदलहि अशक्य होता. नागपूरला पूर्वी मंत्री नि राज्यपाल रहात होते. हायकोर्ट होतं. विधिमंडळांचं अधिवेशन भरत होतं. वकीलपेशांतलीं कर्तृत्ववान, बुद्धिमन् माणसं या शहरांत वास्तव्य करून होतीं. त्यांना या शहरांत राहून आपला धंदा करतां यावा अशी स्वाभाविक अपेक्षा असणारच. मुंबई राज्य नव्यानं अस्तित्वांत आल्यापासून लोकांकडून या भावना व्यक्त होत राहिल्यानं यशवंतरावांनी म्हणजेच मुंबई सरकारनं अर्थातच याचाहि विचार केला होता. नागपूरचं महत्त्व कमी होणार नाही, यासाठी त्यांतल्या त्यांत कोणत्या गोष्टी करतां  येणं शक्य आहे याचा विचार सुरू झालेलाच होता. हायकोर्ट बेंच नागपूरला कायम ठेवायचं असा निर्णयहि सरकारनं केला होता. यशवंतरावांनी या सभेची संधि साधून लोकांना तें सर्व सांगितलं.

सर्वजण एका मोठ्या राज्यांत एकत्र आले ही वस्तुस्थिति घाबरून जावं अशी नव्हती. पण घाबरून सोडणारे होते. त्यांतून लोकांना सावरणं जरूर होतं. एखादी गोष्ट पटवायची तर ज्याला ती पटवायची त्याच्या काळजाला हात घालावा लागतो. त्याच्या अंतःकरणापर्यंत तो विचार पोंचवावा लागतो. यशवंतरावांच्या ठिकाणचं हें सामर्थ्य तर मोठं होतं. जाहीर रीतीनं फड जिंकीतच या जागेपर्यंत ते आता पोंचले होते. गुजराती आणि मराठी या भावांनी एकत्र रहावं असा निर्णय लोकसभेनं केला. हा निर्णय चुकीचा नाही असं लोकांना अजून पूर्णपणानं पटलेलं नव्हतं. त्यामुळे या दोघा भावांत भांडण उकरून काढण्यासाठीच कांही जणांची बुद्धि खर्च होत राहिली. देशाचं ऐक्य कायम राहिलं पाहिजे, भारताच्या हितामध्येच महाराष्ट्राचं हित सामावलेलं आहे असं यशवंतरावांनी आजवर अनेकदा सांगितलं होतं. नागपूरकर मंडळींना हाच विचार पण एका लोककथेच्या संदर्भांत त्यांनी पुन्हा सांगितला.

“एकत्र रहाणारे दोन भाऊ भांडायला लागले. प्रेमानं एकत्र रहात होते, परंतु घरमालकिणीचं जमेना आणि त्यांतून वाद सुरू झाला. अखेर जें होतं त्याच्या वांटण्या करण्यापर्यंत पाळी आली. जमीन, घर, भांडीकुंडी, जनावरं, कर्ज सर्व वांटून झालं. एकाच्या दोन चौकटी झाल्या. गाय एकाकडे तर वासरू दुस-याकडे अशी फारकत झाली. हें सर्व आपसांत झालं. पण दोघांनाहि असं वाटलं कीं, हें सर्व आईला सांगावं. तिच्यासमोरच कागदावर सह्या करायच्या आणि वेगळं व्हायचं. वांटणी पुरी करण्यासाठी दोघेहि मग आईकडे गेले. आई मोठी शहाणी होती.

‘काय, झाल्या वांटण्या?’ आईनं विचारलं.
‘हो, सर्व वांटण्या पु-या झाल्या.’ – मुलं.
‘सगळी मालमत्ता वांटून झाली?’ – आई.
‘हो. सगळी झाली’ – मुलं.
‘अरे, सगळं वांटलं खरं, पण मी तुमच्या दोघांची आई आहे. माझं काय केलंत? आईचेहि दोन तुकडे करा ना?’ –आई

आईचे हे शब्द ऐकतांच मात्र दोघांहि भावांच्या डोळ्यांत पाणी आलं. जगामध्ये सर्व गोष्टींचे तुकडे करतां येतात, पण आई ही वस्तु अशी आहे की, आईच्या प्रेमाचे तुकडे करणं आजवर कुणालाहि शक्य झालेलं नाही. अर्थांतच दोघां भावांनी वांटणीचा बेत रद्द केला.”