• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

इतिहासाचे एक पान. ११४

१३
----------------

लोकसभेनं व्दैभाषिक मान्य करतांच गुजरातमध्ये मात्र त्याची अतिशय तीव्र प्रतिक्रिया उमटली. महागुजरात समितीनं तिथे प्रचंड आंदोलनं सुरु केलं. अहमदाबाद शहरांत सर्वांत अधिक दंगल उसळली. गुजरात मधील नेत्यांचा सल्लान घेतां निर्णय केला गेला याचा त्यांना रागहोता. मोरारजींनी दंगलखोरांना नेहमीच्या पद्धतीनुसार दटावतांच परिस्थिति अधिकच चिघळली. निदर्शकांना रोखण्यासाठी मग गोळीबार केले आणि त्यांत २४ लोक ठार झाले. शेकडो जखमी झाले. ८ आँगस्ट ते १४ आँगस्ट हा संपूर्ण आठवडा अहमदाबादमध्ये संचारबंदी लागू करण्यांत येऊनहि दंगल आटोक्यांत आली नाही. विद्यार्थ्यानी पुढाकार घेऊन हरताळ पुकारला. त्यांनी काँग्रेस पुढा-यांविरुद्ध निदर्शनं करतांच त्याच्यावर गोळ्या झाडण्यांत आल्या. त्यांत सहाजण ठार झाले.विद्यार्थ्यांनी मोरारजींच्या प्रतिमेची होळी तर केलीच, शिवाय गांधी-टोपी घालणारा कुणीहि दिसला तरी विद्यार्थी त्यांच्यावर तुटून पडूं लागले, गांधी-टोप्यांची होळी करणं किंवा साबरमतीनदीमध्ये त्या फेकून देणं असा प्रकार सुरु राहिला. मुंबईचीच आवृत्ति आता अहमदाबादमध्ये घडूं लागली. गांधींचा आश्रम जाळण्याचा प्रयत्न केवळ पोलिसांच्या दक्षतेमुळे टळला.

१९ आँगस्टला गुजरात प्रदेश काँग्रेसची बैठक झाली त्या वेळीअहमदाबाद शांत झालेलं नव्हत.तरी पण याच बैठकींत गुजरात काँग्रेसनं व्दैभाषिकाला मान्यता दिली. वातावरण कांहीसं निवळल्याचा फायदा घेऊन मोरारजींनी जाहीर सभेचा घाट घातला, परंतु विद्यार्थी कृति-समितीनं या सभेवर बहिष्कार घालून ‘जनता कर्फ्यू’ पुकारण्याचा आदेश दिला. त्याचबरोबर अहमदाबाद शहरांत संपूर्ण हरताळ पाडण्याचं फर्मानहि काढलं. याचा परिणाम असा झाला की, मोरारजींच्या सभेला फक्त तीनशे लोक जमले. त्यामध्येहि स्वयंसेवक आणि पोलीस याचाच भरणा होता. मोरारजींचं भाषण दुस-यांनं वाचून दाखवलं आणि ही सभा गुंडाळण्यांत आली.

एवढं होतांच जाहीर सभा होऊन लोकांनी शांतपणे भाषण ऐकून घ्यावं म्हणून मोरारजींनी उपोषण जाहीर केलं. दरम्यान विद्यार्थ्यांनी जाहीर सभेचा पुकारा करतांच त्यांच्या सभेला दोन लाख लोकांनी गर्दी केली. मोरारजींनी उपोषण सुरु करणं नेहरूंना पसंत नव्हतं. अखेर महागुजरात समितीचे अध्यक्ष हर्षदभाई शुक्ला यांनी मोरारजींसाठी सभा आयोजित करण्यांचं ठरवून, लोकांनी शांतपणे ऐकून घ्यावं असं आवाहन केलं. २६ आँगस्ट या दिवशीस मग मोरारजी सभेच्या स्थानी उपस्थित झाले. परंतु लोक त्यांचं भाषण ऐकून घेण्याच्या मनःस्थितींत अजूनहि नव्हते. सभेंत बरीच गडबड निर्माण झाली आणि दगडफेकहि झाली. मोरारजीचं उपोषण म्हणजे एक राजकीय स्टंट आहे, अशी गुजराती जनतेनं टिंगल केली. सभेंत गोंधळ वाढतांच गोळीबार झाला आणि त्यांत एकजण ठार झाला, शंभरावर जखमी झाले. त्यानंतरहि पुढे कांही दिवस अहमदाबादमध्ये दंगली घडत राहिल्या.

सर्वत्र निर्माण झालेल्या असंतोषाला, योग्य वाट करून देण्यासाठी, त्यानंतर इंदुलाल याज्ञिक यांच्या अध्यक्षतेखाली ९ सप्टेंबरला महागुजरात जनतापरिषद स्थापन करण्यांत आली. तरीहि दंगल चालूच होती. शेवटी पं. नेहरूंनी आपली वैयक्तिक प्रतिष्ठा पणाला लावून अहमदाबादला सभा घेण्यासाठी ते आँक्टोबरच्या २ तारखेला आले. त्यांच्या सभेला सुमारे एक लाख लोक जमा झाले, पण त्याच वेळीं जनता परिषदेनं आयोजित केलेल्या सभेला तीन लाखांवर समाज उपस्थित राहिला. गुजरात विद्यापीठांतील सभेच्या वेळीं मात्र विद्यार्थ्यानी नेहरूंच्या सभेंत गोंधळ माजवला. महागुजरातच्या बाजूनं सभेंत एकसारख्या घोषणा होत राहिल्या. त्याबरोबर पं.नेहरू संतापले आणि मुंबईतल्याप्रमाणे गुजरातच्या जनतेलाहि ते टोचून बोलले.

गुजरातमध्ये सुरु झालेल्या चळवळींत, गोळीबारामुळे जे ठार झाले त्यांच्याबद्दल महाराष्ट्राच्या वतीनं दुखः व सहानूभूति व्यक्त करण्यांत आली. मोरारजी देसाई हे गुजरातचे राजे समजले जात. पण दुजरातनंच त्यांचं राजेपण आता फेकून दिलं होतं. महाराष्ट्रांतील जनतेला मोरारजी आणि पं.नेहरु यांनी माथेफिरू म्हणून दोष दिला होता. पण अहमदाबादच्या दंगलींत गुजराती जनतेनं महाराष्ट्राच्या  माथेफिरूपणावरहि ताण केली होती. इथून-तिथून माणसं सारखीचं. आपल्यावर अन्याय होत असल्याचं त्यांच्या लक्षांत येतांच, त्यांची रागाची प्रतिक्रिया सर्वत्र सारखीच उमटते, हा बोध या चळवळीपासून राज्यकर्त्यांना मिळाला.