• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

विविधांगी व्यक्तिमत्व-९६

या वस्तूंचा दैनंदिन वापर व्हावा म्हणून ग्रंथालयास लागूनच वाचनालयाचे २० बाय ३२ फुटांचे दालन आहे. त्यामध्ये चाळीस व्यक्तींची बसून वाचण्याची सोय आहे(टेबल-खर्च्या).

या ग्रंथसंग्रहातील ग्रंथ चाळताना यशवंतरावांच्या वाङ्‌मयीन  अभिरुचीचे, त्यांच्या अभ्यासूवृत्तीचे स्तीमित करणारे दर्शन घडते. या ग्रंथसंग्रहातील बहुतेक सर्व पुस्तके त्यांनी वाचलेली आहेत. सुमारे ४० टक्के पुस्तके त्यांनी अभ्यासल्याचे दिसून येते. कारण त्यांनी अभ्यासलेल्या पुस्तकांवर केलेल्या टीका-टिप्पणी किंवा महत्त्वाच्या ओळीखाली केलेले अधोरेखांकन, परिच्छेदांना केलेल्या चौकटी यांचे निर्देश आहेत. यातील बहुतांशी पुस्तके त्यांनी स्वत: खरेदी केलेली अशी आहेत. त्यात अनेक दुर्मिळ ग्रंथांचा समावेश आहे. ग्रंथांवर विकत घेतल्याची तारीख, ठिकाण याची नोंद करून त्यावर त्यांनी आपली स्वाक्षरीही केलेली आहे. अनेकविध विषयांवरील मौल्यवान ग्रंथ या संग्रहात आहेत. यशवंतरावांच्या या ग्रंथसंग्रहालयात काम करत असताना असे आढळते की 'नवा करार' या नावाचे मराठी भाषेतील एक बायबल त्यांच्या संग्रहात आहे. कातडी बाइंडिंग केलेले सोनेरी अक्षरातील हे मराठी पुस्तक जर्मनीत छापलेले आहे. हे सोनेरी पुस्तक आपल्या पुस्तके पाहण्याच्या संधीचे सुद्धा सोने करून जाते. माधवराव बागल यांचे सर्व साहित्य या संग्रहालयात आहे. स्वत: बागल यांनी त्या पुस्तकांना उत्कृष्ट बाइंडिंग करून ते साहित्य यशवंतरावांना व वेणूताईंना भेट दिलेले आहे. ग्रंथसंग्रहातील चरित्राचा विभाग सर्वात समृद्ध आहे. यात साहित्यिक, चित्रकार, इतिहासतज्ज्ञ, राजकारणी, समाजसुधारक आदींची चरित्रे आहेत. मोठया ग्रंथालयात सुद्धा हा विभाग समृद्ध नसेल असा संग्रह आहे. इंग्रजी वाङ्‌मयात आयर्विगवॅलेस, मॉरियर, ग्रे, ग्रॅहम ग्रीन, माळगावकर अशा लेखकांच्या कादंबर्‍या, गाजलेली इंग्रजी नाटके, बर्ट्रांड रसेल यांची सर्व पुस्तके, अर्थशास्त्रावरील महत्त्वाचे ग्रंथ, लेटर्स अ‍ॅण्ड डॉक्युमेंटस् ऑफ नेपोलियन, श्री. मुजुमदार यांचे मराठी सुप्रिमसी, ट्रान्सफर ऑफ पॉवरचे दहा खंड, हिस्ट्री ऑफ इंग्लिश स्पीकिंग पीपल हे विन्स्टन चर्चिलचे दुर्मिळ पुस्तक. सेकंड वर्ल्ड वॉर, हिस्ट्री ऑफ मॅनकाइंड, सोशल सायन्सेस, इंटरनॅशनल एन्सायक्लोपिडियाज, वुईल डुरंट यांचे स्टोरी ऑफ सिव्हिलायझेशन, चौदा खंडातील हिस्ट्री ऑफ सोव्हिएत रशिया, एन्सायक्लोपिडिया ऑफ वर्ल्ड आर्टस् हे मायग्राईल पब्लिकेशनचे पंधरा खंड, टॉयनबी यांचे स्टडी ऑफ हिस्ट्रीचे दहा खंड, जागतिक कीर्तीचे लेखक जॉन गंथर यांचे ग्रंथ, ग्रेट मास्टर्स ऑफ पेटिंग्ज इन दी म्युझियम ऑफ रुमानिया, लॉरेन्स एन्सायक्लोपिडिया ऑफ मॉयथॉलाजी हे दुर्मिळ पुस्तक, टॉलस्टॉय यांचे अ‍ॅडपीस अशी असंख्य इंग्रजी पुस्तके या संग्रहालयात आहेत.

भारतीय समाजविज्ञान कोश, मराठी विश्वकोश, भारतीय संस्कृती कोश, इन सायक्लोपिडिया ब्रिटानिका, भारतवर्षीय प्राचीन चरित्रे कोश, दाते मराठी ग्रंथसूची, महाराष्ट्रीय शब्दकोश, मराठी ज्ञानकोश ( पहिली आवृत्ती ), जिल्हा गॅझेटिअर्स, वर्ल्ड अ‍ॅटलास, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समग्र वाङ्‌मय या व इतर मौलिक ग्रंथांची गेल्या एक दोन वर्षात भर पडलेली आहे. 

इंग्रजी, मराठी, हिंदी असे सर्व प्रकारचे शब्दकोश, स्थापत्य-शिल्पकोश, शब्दरलाकर, सरस्वती शब्दकोश, हिंदी शब्दरचना, डॉ. रघुवीर यांचे इंग्लिश-हिंदी शब्दकोश, रानडे यांचे इंग्रजी-मराठी दुर्मिळ शब्दकोश, विविध प्रकाशनांच्या इंग्रजीमधील शब्दकोश, प्रसिद्ध रँडम हाऊसची डिक्शनरी, मराठी नियतकालिकांची सूची, दे. द. वाडेकर यांचे मराठी तत्त्वज्ञानकोशांचे खंड आहेत. पठ्ठे बापूराव यांच्या लावण्यांची पुस्तके, ज्योतिषशास्त्रावरील ग्रंथ, आयुर्वेद व होमिओपॅथीवरील ग्रंथ तसेच बेकरी-चर्मोद्योग, मल्लविधा यावरील पुस्तकेही आहेत. 'केशभूषाशास्त्र आणि तंत्र' म्हणजे केस कसे कापावेत, दाढीसाठी साबण कसा लावावा, ब्लेड कसे वापरावे या शास्त्रावरही पुस्तक आहे.

साहेबांच्या या संग्रहात चक्रधर, नामदेव, तुकाराम, रामदास, विवेकानंद, परमहंस, सत्यसाईबाबा यांचे ग्रंथ तर आहेतच., पण संशोधनग्रंथही आहेत. तसेच माधव ज्युलियन, कवी यशवंत, वा. सी. बेंद्रे, सेतुमाधवराव पगडी, स्वातंत्र्यवीर सावरकर, केशवसुत, कुसुमाग्रज, शं. दा. पेंडसे, गं. बा. सरदार, सिद्धेश्वरशास्त्री चित्राव, रा. श्री. जोग, श्री. के. श्रीरसागर, कुसुमावती देशपांडे, पां. वा. गाडगीळ, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, डॉ. राममनोहर लोहिया यांचीही पुस्तके आहेत. शिवाय लोकसाहित्यावरील पुस्तकेही आहेत. महानुभव पंथ, एकनाथी भागवत, नामदेव गाथा, तुकाराम गाथा, दासबोध, भावार्थ रामायण, कहाणीसंग्रह, उपासना, हरिपाठ, भजनमाला, भगवदगीता, पुराणे-पां.वा. काणे यांचे 'हिंदू धर्मशास्त्राचा इतिहास' अशी अनेक धार्मिक पुस्तके या ग्रंथसंग्रहात आहेत.