• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

विविधांगी व्यक्तिमत्व-९४

सौ.वेणूताई चव्हाण स्मारक भवन

यशवंतरावांचे ज्ञानमंदिर:

सागरेश्वराच्या कुशीत जन्मलेला आणि कर्‍हाडच्या कृष्णा-कोयनेच्या पवित्र संगमावर वाढलेला माणूस अखिल जगतामध्ये कार्यकर्तृत्वाने केवढा मोठा होतो याचे साक्षात रूप म्हणजे 'सौ. वेणूताई चव्हाण स्मारक भवना' तील यशवंतराव चव्हाण यांचा ग्रंथसंग्रह व वस्तुसंग्रहालय हे होय. आणि हे सर्व पाहून डोळे आनंदाश्रूंनी पाणावतात.

यशवंतरावांनी आपली पत्‍नी सौ. वेणूताई हिच्या स्मरणार्थ कर्‍हाड येथे स्मृतिभवन उभारले असून, तेथे त्यांच्या वैयक्तिक संग्रहालयातील सुमारे सात हजार दुर्मिळ व मौलिक ग्रंथ व तीनशेवर जुन्या मासिकांचे बांधीव गठ्ठे, दुर्मिळ फोटोंचे चोरशे अल्बमस् आणि त्यांच्या भाषणाच्या साठ कॅसेटस् आहेत.

आज या संशोधना ग्रंथालयात दहा हजार असून, सतरा दैनिके, पाच साप्ताहिके, दोन पाक्षिके, सतरा मासिके-द्वै व त्र्यैमासिके नियमित घेतली जातात. यांचे दैनंदिन वाचन करण्यासाठी दररोज सवाशे वाचक नियमित येत असतात. तसेच कर्‍हाड शहर व परिसरातील आणि महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून यशवंतप्रेमी अभ्यासक, संशोधक एम्. फील व पी. एच. डी. च्या संशोधनासाठी या संशोधन ग्रंथालयाचा फायदा घेत असतात. आज अखेर या ग्रंथालयामार्फत यशवंतरावांच्या साहित्यावर व त्यांच्या विविध पैलूंवर नऊ अभ्यासकांनी एम्. फील. व पी. एच. डी. च्या पदव्या संपादन केलेल्या आहेत. सध्या पांच अभ्यासक संशोधन करीत आहेत.

याशिवाय या ग्रंथालयात यशवंतरावांच्या चाळीस वर्षाच्या वैयक्तिक पत्र व्यवहाराच्या असंख्य फायली, हजारो हस्तलिखित कागदपत्रे, लेख, भाषणे, मुलाखती, आठवणी, गौरवांक, विशेषांक आदि साहित्य आहे. या सर्व साहित्याचे वर्गिकरण करण्याचे काम पूर्ण होत आले आहे. लवकरच हे सर्व साहित्य अभ्यासकांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच यशवंतरावांना त्यांच्या हयातीत देश परदेशांत मिळालेल्या विविध तर्‍हेच्या भेटवस्तू आहेत. ग्रंथ व वस्तुसंग्रहालय नजरेत भरण्यासारखे आहे. हे स्मारक भवन म्हणजे महाराष्ट्राच्या गेल्या अर्धशतकातील इतिहासाच्या परिवर्तनाचे चालते बोलते दर्शन आहे.

सौ.वेणूताई चव्हाण यांचे निधन, १ जून १९८३ रोजी झाले. त्यानंतर फक्त चारच महिन्यात यशवंतरावांनी आपले इच्छापत्र(वुईल) लिहिले. त्यात यशवंतराव म्हणतात-

''माझी पत्‍नी कै. सौ. वेणूताई हिचे स्मरणार्थ मी एक सार्वजनिक न्यास   (Public Trust) करणार आहे. तिने मला खाजगी व सार्वजनिक जीवनात अमोल साथ दिली आहे. त्यासाठी तिची आठवण जागती ठेवणे हा माझ्या जीवनातील उरलेला एकच आनंद आहे. त्या दृष्टीने माझ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. माझ्या गावी कर्‍हाड येथे एखादी जमीन विकत घेऊन त्यावर एखादी वास्तू बांधावी व अशा वास्तूत माझ्या स्वत:चे ग्रंथालयातील अनमोल ग्रंथ ठेवावेत. तसेच माझ्या जीवनात अनेक व्यक्तींनी व संस्थांनी अनेक वस्तू मला प्रेमाने भेट म्हणून दिल्या आहेत. त्यांचेही संरक्षण व्हावे व वस्तुसंग्रहालयाच्या रूपाने त्यांचे जतन व्हावे, अशी माझी इच्छा आहे. आणि हे ग्रंथालय आणि वस्तुसंग्रहालय माझ्या पत्‍नीची स्मृती म्हणून व त्याच्या दैनंदिन जपणुकीची आणि वाढीची योजना करावी, असा संकल्प आहे.''

यशवंतराव बळवंतराव चव्हाण
७-१०-१९८३

पुढच्या परिच्छेदात ते म्हणतात, ''या स्मृति-मंदिरासाठी जी रक्कम लागेल त्यापैकी शक्य तो भाग मी देणार आहे. देणगी म्हणून माझ्या पत्‍नीचे दागदागिने आहेत. त्यांचे रूपांतर करून जी रक्कम उभी राहील ती सारीच्या सारी या स्मारकास द्यावी. शिवाय मौजे उरळीकांचन येथील बागायत जमीन विकून जी रक्कम येईल ती सारीच्या सारी वरीलप्रमाणे न्यासास द्यावी.''