• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

विविधांगी व्यक्तिमत्व-८९

यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन (भवन)

नाटय-कला व साहित्य

कृष्णा-कोयनेच्या प्रीतिसंगमावर करहाटक (कर्‍हाड) हे अतिप्राचीन शहर, महाक्षेत्र स्थान म्हणून ओळखले जाते. अनेक युगांचे प्राचीन अवशेष पोटात घालून हे शहर पूर्वी वैभवसंपन्न शहर असल्याची ग्वाही देते. कर्‍हाड हे त्या कालापासून व्यापारउदिमाचे व विद्याभ्यासाचे आणि राजकीय उलाढालीचे एक प्रमुख केंद्र आहे. आधुनिक काळामध्येही कर्‍हाडने आपला हा परंपरागत लौकीक समर्थपणे टिकविलेला व वृद्धिंगत केलेला आहे, आणि मा. यशवंतरावजी चव्हाण यांच्या रूपाने त्यावर कळस चढविलेला आहे. एकेकाळी वैभवाच्या व संपन्नतेच्या शिखरावर आरूढ झालेल्या कर्‍हाड शहरास पुन्हा विकिसत वैभव व संपन्नता प्राप्त करून देण्यामध्ये कर्‍हाड शहराचे लोकप्रिय नगराध्यक्ष पी. डी. पाटील यांनी सतत घेतलेल्या अडतीस-चाळीस वर्षांच्या अविरत कार्याचा, रचनात्मक विकास कामाचा नवा-आदर्श घालून दिला आहे. त्याचेच आजचे कर्‍हाड शहर हे दृश्यस्वरूप आहे.

येथे राजकारण आणि समाजकारण यांचा प्रीतिसंगम कित्येक दशकांपूर्वीच झाला आहे. आगरकरांच्या सामजिक सुधारणावादापासून ते कर्मवीर भाऊराव पाटलांनी बहुजनांच्या शिक्षणासाठी केलेल्या तपश्चर्येपर्यंत सर्व परंपरा या गावाने पेलेल्या आहेत. तो एक सामाजिकतेचा अखंड मंगल प्रवाह आहे. राष्ट्रीय चळवळीतील त्या मंतरलेल्या दिवासांचे स्मरण करणारी मंडळी आजही येथे सापडतात.

कर्‍हाडचा परिसर हा महाराष्ट्राचं एक लाडकं व्यक्तिमत्त्व. ज्याच्याबद्दल अवघ्या महाराष्ट्राला आदर आणि प्रेम आहे. असा यशवंतरावांचा परिसर आणि त्या रसिकराज यशवंतररावांचं स्मारक म्हणून आज जे 'यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन' उभं आहे ते अतिशय परिपूर्ण कलात्मक असं आहे. हे या कर्‍हाड नगरीचं एक वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं. यशवंतराव धुरंधर राजकारणी होते, उत्तम वक्ते होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आपल्याला माहीत आहेत. परंतु या सर्वांमध्ये त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला एक महत्त्वपूर्ण अशी जी नक्षीदार किनार होती ती म्हणजे 'रसिकराज यशवंतराव' _ ती मला अतिशय महत्त्वाची वाटते. कारण यशवंतराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, देशाचे उपपंतप्रधान होते. या सर्वांचा पाया त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता. आजही लोकमानसामध्ये जे आदराचं स्थान आहे ते म्हणजे मराठी साहित्य, महाराष्ट्रातील कला, कलावंत यांच्याबद्दल त्यांच्या मनात असलेला आदर. म्हणून एक रसिकराज यशवंतराव हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पैलू मला अतिशय महत्त्वाचा वाटतो. किंबहुना त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा पाया हा या पैलूमुळे शोभून दिसणारा होता. कर्‍हाड नगरपालिकेने त्यांचं अतिशय यथार्थ असं स्मारक उभारलं आहे. केवळ यशवंतरावांच्या राजकारणाचाच वारसा कर्‍हाड नगरपालिका चालवत नाही, तर यशवंतरावांचे जे संस्कार होते, ते साहित्याचे संस्कार होते, कलेचे संस्कार होते. या संस्कारांचा वारसाही या स्मृतिभवनाच्या निमित्ताने, वाचनालयाच्या निमित्ताने कर्‍हाड नगरपालिका अतिशय यथार्थपणे चालवीत आहे. नगरपालिकेच्या प्राथमिक कर्तव्यात कुठलीही कसूर न ठेवता गावाचे गावपण टिकवून ठेवतानाच गावची अभिरुची कशी संपन्न होईल आणि गावाचा सर्वांगसुंदर विकास कसा होईल याचे दूरदृष्टीने नियोजन माजी नगराध्यक्ष पी. डी. पाटील यांनी केले आहे.

शहरामध्ये एक मध्यवर्ती सांस्कृतिक केंद्र असावे म्हणून नगरपालिकेने एक भव्य वास्तू १९७४ साली बांधण्याचा कार्यक्रम हाती घेतला. तिच्या तळमजल्यावर १०७ बाय ५७ फूट या मापाचा ग्रंथालय हॉल बांधलेला आहे. त्यामध्ये सुमारे दोन लाख पुस्तके ठेवता येतील आणि अभ्यासकांसाठी केबिन्सचीही सोय आहे. या ग्रंथालय विभागास जोडूनच मागील बाजूस २५ बाय १७ फूट या मापाची चार दालने आहेत. त्या प्रत्येक दालनामध्ये दैनिके, साप्ताहिके-मासिके, विभाग व बाल विभाग असे निरनिराळे विभाग आहेत. त्यांच्या मागील बाजूस प्रशस्त अशा दोन गेस्ट रूम आहेत.

आज या ग्रंथालयात ऐंशी हजाराच्या आसपास पुस्तके असून त्यात विविध ज्ञानशाखेतील ग्रंथ, संदर्भ ग्रंथ, विज्ञान-कला, शेती-बागबगीचा, इतिहास, तंत्र विज्ञान इ. मौल्यवान ग्रंथ तर आहेतच, शिवाय २८० च्या वर नियतकालिके नियमित येत असतात. आणि याचा फायदा कर्‍हाड व परिसरातील पाच हजाराच्यावर वर्गणीदार व एक हजाराच्यावर मोफत वाचक नियमित घेत आहेत. तसेच या ग्रंथालयामार्फत सांस्कृतिक-वाङ्‌मयीन चळवळीसाठी प्रतिवर्षी काही उपक्रमांचे नियोजनही अत्यंत दूरदृष्टीने केले जाते. १९३२ सालापासून अखंडपणे प्रतिवर्षी नवरात्रामध्ये चालू असलेली व महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेली कर्‍हाडची शारदीय व्याख्यानमाला, सन १९७२ पासून केवळ लहान मुलांसाठी सुरू असलेली 'सानेगुरुजी कथामाला' त्याचप्रमाणे मा. यशवंतराव यांनी केलेले समाजप्रबोधनाचे व परिवर्तनाचे कार्य सतत तेवत रहावे या जाणिवेने १२ मार्च १९७३ पासून सुरू केलेली 'यशवंतराव चव्हाण वैचारिक व्याख्यानमाला’ प्रतिवर्षी मार्चमध्ये आयोजित करण्यात येते. या वैचारिक, व्याख्यानमालेत जे जे विचारमंथन होईल ते ते त्याच विचारवंतांचे विचार प्रतिवर्षी पुस्तकरूपाने प्रसिद्ध केले जातात.