• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

विविधांगी व्यक्तिमत्व-७५

* राजर्षी शाहू छत्रपती गौरव ग्रंथ, सत्यशोधकाचा शोध. प्रमुख संपादक : आमदार पी. बी. साळुंखे. प्रका. १९७६.

इतिहासाला देण देण्याचे सामर्थ्य असलेल्या पुरुषांच्या कार्याचे वास्तव मूल्यमापन व्हावयाचे असेल तर त्याला काही काळ जावा लागतो, असे हा ग्रंथ वाचल्यानंतर मनात येऊन जाते. शाहू महाराजांचा मानवतावाद हा अत्यंत प्रमुख व मौलिक असा पैलू आहे. या थोर माणसाने कधी कोणाचा द्वेष केला हे खरे वाटत नाहीं किंवा नुसते विचार मांडले नाहीत., तर हातात असलेल्या सत्तेचा वापर जाणीवपूर्वक व निर्धाराने सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेसाठी केला. माझ्या मताने ही अतिशय मौलिक व लक्षणीय गोष्ट आहे. भारतात तेव्हाही व्यक्तिशः अनेकांच्या हाती मर्यादित स्वरुपाने का होईना सत्ता होती., परंतु त्या सत्तेचा उपयोग ध्येयवादी दृष्टीने करुन समाजामध्ये मौलिक बदल करण्याचा प्रयत्‍न विसाव्या शतकाच्या प्रारंभी करणारा राजर्षि शाहू महाराज हा एकुलता एक राजा होता.

दलितांना न्याय दिला पाहिजे असे सर्वप्रथम बजावून सांगणारा व त्याची अमंजबजावणी करणारा हा राजकर्ता त्या काळात निघाला हे विशेष महत्त्वाचे आहे. दलितांना न्याय देण्यासाठी उभा राहिलेला, कालसुसंगत, समाजप्रबोधनाचे व्रत  घेतलेला विसाव्या शतकातील मानवतावादी मराठी राजा हे शाहू महाराजांचे चित्र गौरवग्रंथातील अनेकविध लेखांतून उभे राहते व ते चित्र अत्यंत आकर्षक आहे पिढ्यपिढ्यांना मार्गदर्शक आहे.

* युद्धशास्त्र यंत्र व तंत्र, लेखकः प्रा. अ. वि. बेद्रे, प्रका. १९६६.

भारत हा शांतता प्रिय देश आहे, परंतु जोपर्यंत युद्धाची भावना समूळ नष्ट होत नाही तोपर्यंत शांततेच्या पुरस्कर्त्यानाही शांततेच्या रक्षणासाठी आणि आपले स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी व संरक्षणासाठी मनाविरुद्ध लादलेल्या युद्धासाठी निश्चयाने आणि खंबीरपणे उभे रहावे लागेल. आजकालचे युद्ध हे एकाच  जागी किंवा विभागात लढले जात नाही तर त्याचा विस्तार संबंध देशभर झालेला असतो. युद्धाच्या प्रसंगी देशतील प्रत्येक नागरीक हा सैनिकच असतो. रणांगणावर लढणार्‍या सैनिकाला जसा युद्धशास्त्राचा परिचय हवा, तत्परता हवी तशी नागरिकालाही हवी. युद्धशास्त्राचा परिचय असलेले नागरिक अधिक धैर्याने व समयसूचकतेने युद्धाला तोंड देऊ शकतात. हे सत्य या पुस्तकाच्या प्रस्तावनेत यशवंतराव कथन करतात.
भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांची सांगोपांग व सचित्र माहिती, भारतीय सैन्य दलाच्या विविध शिक्षण- प्रशिक्षण संस्था इत्यादिची माहिती लेखकाने या ग्रंथात दिलेली असून त्या माहितीच्या या विषयाच्या अभ्यासकांना व सर्वसाधारण नागरिकांना युद्धाची माहिती होण्याचे दृष्टीने अतिशय उपयोग होईल अशी आशा व्यक्त केली आहे.

* भारताची राज्यघटना, लेखकः त्र्यंबक कृष्ण टोपे, प्रका. १९५९.

भारताच्या राज्य घटनेची माहिती सुलभरीतीने करुन देण्यासाठी सुबोध भाषेमध्ये हे छोटे पुस्तक तयार करण्यात आले आहे. सांगोपांग विवेचन हा पुस्तकाचा उद्धेश नसून सामान्य वाचकास घटनेची मामुली नव्हे पण तपशिलवार माहिती व्हावी या हेतूने ते तयार करण्यात आले आहे. संसदीय लोकशाहीच्या घटनेची पार्श्वभूमी व घटनेतील महत्वाच्या तरतुदी यांचे विवेचन या पुस्तकात केले आहे. याचे प्रांजल स्वागत करतानाच भारतीय संविधानाच्या वाढत्या व्यासंगाची अपेक्षा व्यक्त करताना यशवंतरावांची लोकशाहीवरची निष्ठा प्रगट झालेली दिसते.

* हैद्राबाद स्वातंत्र्य संग्राम, लेखकः वसंत ब, पोतदार, प्रका. १९८४.

हिंदुस्थानचा स्वातंत्र्य संग्राम शंभर वर्षापेक्षा जास्तकाळ चालला. त्याचे जसे विभागीय अलग अलग पैलू आहेत तसेच विचाराची दिशा व कार्यक्रम यांच्याबाबतीत ही विविधता आहे. या सर्वांना एकत्र गुंफण्याचे कार्य भावी इतिहासकाराला करावे लागेल. हैद्राबाद स्वातंत्र्य संग्राम हा अतिशय निश्चयाने व निग्रहाने लढविला गेलेला स्वातंत्र्य संग्राम आहे. भिन्नभाषिक अशा तेथील लोकांमध्ये एकसंघ भावना निर्माण करण्याचे जे अवघड काम संग्रामाच्या नेत्यांनी केले ते निःसंशय प्रशंसनीय आहे. या संग्रामाचे नेते रामानंदतीर्थ यानी त्यागीवृत्तीने पण प्रसन्न चित्तवृत्तीने नेतृत्व केले व नव्यापिढीवर नव्या आदर्शाचा संस्कार केला. या ग्रंथाचे वैशिष्ठ्य असे आहे की, यात हैद्राबाद स्वातंत्र्य संग्रामातील शेकडो कार्यकर्त्यांची तपशीलवार नोंद करण्यात आली आहे, जी स्वातंत्र्य संग्रामाच्या इतर इतिहासाच्या पुस्तकात दिसून येत नाही.