व्याख्यानमाला-१९७९

Vyakhyanmala 1979
यशवंतराव चव्हाण

व्याख्यानमाला

वर्ष सातवे १९७९

नगरपालिका नगरवाचनालय, क-हाड
--------------------------------

pdf inmg Ebook साठी येथे क्लिक करा 

मनोगत - पी. डी. पाटील, नगराध्यक्ष

'यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला' ही १९७३ साली सुरु झाली. १९७९ सालातील यशवंतरावांच्या वाढदिवशी ज्या थोर विचारवंतांची व्याख्याने झाली. त्यांची ही मुद्रित प्रत वाचकांच्या हाती देताना मनाला एक समाधान वाटते.

साहित्य, संगीत, क्रीडा, करमणूक या समाज जीवनाला स्पर्श करणा-या व सामर्थ्य देणा-या गोष्टी आहेत. शारदीय व्याख्यानमालेच्या निमित्ताने कराड नगरपालिकेने या संदर्भात स्थानिक जनतेत साहित्य, कला आणि क्रीडा या विषयाबद्दल एक वैशिष्टयपूर्ण अभिरुची निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.

कराडचे एक थोर सुपुत्र, महाराष्ट्राचे नेते, अखिल भारतयी कीर्तीचे राजकारणी व विचारवंत यांचे विचार, कार्य आणि कर्तृत्व समाज परिवर्तनाला उपकारक ठरले आहे. या निमित्ताने त्यांचा वाढदिवस आम्ही नगरपालिकेतर्फे महाराष्ट्रांतील थोर व विद्वान विचारवंतांची मुख्यत: समाजकारण व अर्थकारण या विषयावर व्याख्याने आयोजित करुन यशवंतरावजींच्या नावे गेल्या सात वर्षांपासून 'यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला' या नावाने सुरु केलेली आहे.  महाराष्ट्रामध्ये ब्रिटीश अमदानीपासून राजकारण आणि समाजकारण यांचे दोन वेगवेगळे प्रवाह चालत आलेले आहेत. हे दोन्ही प्रवाह कधी एकमेकांच्या जवळ आलेले आहेत तर कधी दूर गेलेले आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर या दोन्ही प्रवाहांना एकत्रित आणण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्यात मा. यशवंतरावजींना फार मोठे प्राधान्य द्यावे लागेल.

आमच्या निमंत्रणाला मान देऊन मा. आमदार पी. बी. साळुंखे, कोल्हापूर व प्राचार्य सत्यरंजन साठे, पुणे या दोन थोर विचार वंतानी या मालेत व्याख्यान दिली. त्याबद्दल त्यांचे कुतज्ञतापूर्वक या मालेत व्याख्याने दिली. त्याबद्दल त्यांचे कुतज्ञता पूर्व आभार मानणे आमचे कर्तव्य आहे.

व्हिज्युअल डिझाईन रिसर्च युनिट, कोल्हापूरचे डिझाईन आर्टिस्ट श्री. भूपाल मांगोरे यांनी सदर पुस्तिकेचे बाह्यांग आकर्षित व मनोवेधक करण्यासाठी जे परिश्रम घेतले. तसेच हे 'शब्दांकित' स्वरुप प्रकट होताना प्रा. वि. पु. गोखले यांनी जे परिश्रम घेतले आहेत त्यांचे आणि कराड मुद्रणालयाचे नि कामगार यांनी ही पुस्तिका वेळेवर व सुबक छापून दिली त्याबद्ल आम्ही त्यांचे आभारी आहोत.

या व्याख्यानमालेत जे जे विचारमंथन, चिंतन होईल ते ते त्याच विचारवंतांच्या भाषेत 'शब्दांकित' करण्याच्या हेतूने प्रतिवर्षी व्याख्यानांची पुस्तिका प्रसिद्ध केली जावी हा ही हेतू आहे. ही पुस्तिका समाज पुरुषाच्या हाती देताना एकच प्रार्थना -

मा. यशवंतरावजींना राष्ट्रसेवेसाठी उदंड आयुरारोग्य लाभो ! त्यांच्या जीवनाचा आदर्श नव्या पिढीला जीवनाची विधायक दृष्टी देणारा ठरो !