व्याख्यानमाला-१९७९-१

व्याख्यान पहिले व दुसरे - दिनांक १० व ११ मार्च १९७९

विषय - "महाराष्ट्रातील सामाजिक क्रांतीचे टप्पे"

व्याख्याते - आमदार पी. बी. साळुंखे, कोल्हापूर.

व्याख्याता परिचय -

१९१८ साली पेशवाई बुडाली. इंग्रजांची राजवट सुरु झाली. हिंदुस्थानातील लोकांना पाश्चात्य पद्धतीचे शिक्षण देण्यात येऊ लागले. पाश्चात्य संस्कृतीशी एतद्देशीय लोकांचा संबंध येऊ लागला. पाश्चात्य शिक्षण घेतल्यामुळे आपल्या धर्मातील व चालीरितीतील उणिवा व दोष होते, सामाजिक विषमता होती, वर्णवर्चस्व, अस्पृश्यता, स्त्रीदास्य होते ते नाहीसे करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु झाले. हे प्रयत्न करण्यामध्ये काही विचारवंत होते. काही कर्ते सुधारक होते. काही समाजक्रांतिकारक होते.

गेल्या १५० वर्षांमध्ये ज्या सामाजिक चळवळी झाल्या त्यांचे स्थूलमानाने चार कालखंड पाडता येतील. पहिला कालखंड १८१८ ते १८४८. या कालखंडाचे अध्वर्यू बाळशास्त्री जांभेकर होते. दुसरा १८४८ ते १८९४ या कालखंडाचे प्रणेते म. ज्योतिबा फुले होते. तिसरा कालखंड १८९४ ते १९२५. याचे नेतृत्व राजर्षी शाहू महाराज यांनी केले आणि चौथा कालखंड १९२५ ते १९५६.याचे प्रतिनिधीत्व डॉ. आंबेडकरांनी केले.

सामाजिक क्रांतीची चळवळ कलेकलेने वाढत गेली. या चारही कालखंडांमध्ये काम करणारी जी मंडळी होती त्यांचा पिंड, त्यांनी केलेले कार्य हे विचारात घेता या प्रत्येक कालखंडास अनुक्रमे 'झुळूक', 'झंझावात.' 'वादळ' व 'तुफान' अशी एका एका शब्दात वर्णन करावयाचे झाले तर नावे देता येतील. या दोन व्याख्यानामध्ये महाराष्ट्रातल गेल्या दीडशे वर्षातील हे जे सामाजिक क्रांतीचे चार टप्पे आहेत त्यांचा धावता आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे.

नांव : श्री. पी. बी. साळुंखे

जन्म : १८/२/१९१३

शिक्षण : एल् एल् बी.

व्यवसाय : वकिली

घरची गरिबी, नोकरी करीत करीत शिक्षण.

१९४८ ते १९५२ कोल्हापूर म्युनिसिपल कौन्सिलवर बिनविरोध निवड. स्थायी समितीचे चेअरमन म्हणून काम. स्कूल बोर्डाचे सभासद. म्युनिसिपल प्रजापक्षाचे नेते.
१९५७ ते ६२ कोल्हापूर शहरातून विधानसभेवर निवड
१९६२ ते ६७ डिव्हिजनल सिलेक्शन बोर्डाचे सभासद.
१९६७ ते ७० महाराष्ट्र रेव्हिन्यू ट्रॅब्युनलचे सभासद.
१९७० ते ७९ विधान परिषदेचे सभासद

लेजिस्लेटर या नात्याने एस्टिमेटस् कमेटी, पब्लिक अकौंटस् कमिटी, प्रिव्हिलेजीस कमिटी, अॅश्युअरन्स कमिटी, भाषा सल्लागार समिती इत्यादी समित्यांवर कामे केली आहेत.

सध्या प्रिव्हिलेजीस कमिटीचे अध्यक्ष म्हणून काम पाहातात.

दोन वेळा कोल्हापूर नगरवाचन मंदिराचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड

"राजर्षी शाहू गौरव ग्रंथ" संपादक मंडळाचे अध्यक्ष

६५० पानांचा ग्रंथ महाराष्ट्र शासनातर्फे प्रकाशित. पाच हजार प्रतींची पहिली आवृत्ती पाच महिन्यांत संपून लवकरच दुसरी आवृत्ती प्रसिद्ध होत आहे.

सध्या 'Rajarshi Shahu, A Piller of Social Democracy' या इंग्रजी ग्रंथाचे संपादन करीत आहेत. लवकरच हा ग्रंथ प्रसिद्ध होत आहे.

'राजर्षी शाहू' व 'विठ्ठल रामजी शिंदे' यांच्या जीवनकार्यावर शिवाजी विद्यापीठ व मराठवाडा विद्यापीठ येथे अभ्यासपूर्ण व्याख्याने दिलेली आहेत.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीचे अध्यक्ष ( १९७४ ते १९७९) निष्ठावंत लोकसेवक, व्यासंगी पुरोगामी व समतोल विचारवंत.