व्याख्यानमाला-१९७६-३६

लो. टिळक म्हणत ‘ह्या वर्गांनी (महार-मांग) स्वातंत्र्य मिळविले तर मी त्यांच्या पंक्तीला बसेन.’ टिळक हे आशियातील त्या काळचे महान पुढारी ब्रिटिश साम्राज्याबरोबर टक्कर देणारे भारतातील महापुरुष. ह्या आपल्या धर्मबांधवांची बंधुता, माणुसकी टिळकांनी मानली नाही. त्यांचे मानवी हक्क, स्वातंत्र्य व प्रतिष्ठा त्यांनी नाकारली. शिवाजीसंगे टिळकांचे नाव घेतले जाते. त्यांच्या एवढे चारित्र्यसंपन्न व त्यागी पुरुष थोडेच झाले असतील. पण त्यांची सामाजिक दृष्टी अशी होती.

शाहूंचे नवभारत उभारणीचे काम कसे होते ते पाहा. त्यांनी महार, मांग, मुसलमान ह्यांना मराठा वसतिगृहामध्ये आश्रय दिला त्यांनी अनेक वसतिगृहे काढून काढून कनिष्ठ वर्गाला शिक्षणाची संधी दिली. त्यांच्या मते एलिव्हेशन ऑफ दी मेजॉरिटी म्हणजे बहुसंख्य लोकांचे उन्नतीचे कार्य आणि ते त्यानी मोठ्या तळमळीने केले. आपल्या राष्ट्रात बहुजन समाज मागासलेला असून दारिद्र्यात पिचत आहे. तो विद्या, वस्त्र व वित्त यांना मुकलेला आहे. शाहूंनी म्हटले की, मी त्यांना विद्या, वस्त्र व वित्त मिळविण्यास समर्थ करणार. त्यांना मानवी प्रतिष्ठा, मानवी हक्क मानवी स्वातंत्र्य मिळवून देणारच. त्यांनी आपले हे बोल, आपल्या राज्यात त्यांना तसे संपूर्ण मानवी हक्क देऊन खरे केले. असे होते हे नवभारताचे घोषणा करणारे छत्रपती शाहू !

टिळक म्हणत, जातिभेद जरी मोडला नाही तरी जातिद्वेष मोडणे इष्ट आहे. शाहूंचे म्हणणे खोटे आहे. जातिभेदाचे असू दया, जातिद्वेष नको हे म्हणणे खोटे आहे. जातिभेदाचे कार्य जातिद्वेष आहे. कार्य नाहीसे करावयाचे असेल तर कारणही काढून टाकले पाहिजे. शाहू म्हणत : ‘जातिभेद पाळणे पाप आहे. देशोभक्तीच्या मार्गात हा अडथळा आहे. हिंदुस्तानच्या गुलामगिरीस जातिभेद कारणीभूत आहे. आम्हालाही स्वराज्य पाहिजे आहे व त्यामुळे आमच्यात चैतन्य निर्माण होईल. पण मूठभर लोकांच्या हाती सत्ता जाऊ नये म्हणून जातवार मतदानाचा हक्क द्यावा. कित्येक म्हणतात की राजकारणाचा व स्पृश्यास्पृश्यतेचा काय संबंध आहे ? पण मी म्हणतो अस्पृश्यांना मनुष्याप्रमाणे वागविल्याशिवाय राजकारण कसे होणार ? ज्यांना राजकारण करावयाचे आहे, त्यांनी मनुष्याला मनुष्याप्रमाणे म्हणजे इतर देशात वागवितात त्याप्रमाणे वागविले पाहिजे. आम्हाला तोंडाने बडबडणा ------- कोत वृत्तीने जातिभेद मोडून आम्हास मनुष्याप्रमाणे वागवतील असे पुढारी पाहिजेत.’

शाहूंची धार्मिक रुढीसंबंधीची मते जहाल होती. राष्ट्र संकटात असात अन्नाच्या अभावी हिंदूंनी गायसुध्दा कापून खावी असे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हटले तेव्हा महाराष्ट्रात व इतर ठिकाणीही मोठी खळबळ उडाली. पण त्यापूर्वी म्हणजे पहिल्या महायुध्दाच्या वेळी मराठा पलटण कूट-एल-आमारा येथे अन्नाचा पुरवठा होत नसल्यामुळे उपाशी मरत असता छत्रपतींनी त्या सैनिकांना निरोप पाठविला की ‘जातीच्या निर्बंधानुसार कोणते खादृय व कोणते अखाद्य ठरवित न बसता घोड्याच्या मांसाचा उपयोग कारवा. जातिनिर्बंध मोडल्याबद्दल तुम्हास यत्किंचितही दूषण लागणार नाही. तुम्ही परत आल्यावर तुमच्या लग्नकार्यात व इतर समारंभात तुम्हांला गैरसोय भोगावी लागणार नाही असे मी देवाला स्मरून वचन देतो.’ अशा ह्या समाजक्रांतिकारकाच्या मृत्यूनंतर त्यांच्या तत्त्वाप्रमाणे त्यांचे अंत्यसंस्कार ब्राह्मणाने न करता ब्राह्मणेतर पुरोहिताने केले ही लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे.

१९१९ साली शाहू छत्रपतींनी महारांची गुलामगिरी कायद्याने नष्ट केली. त्यांची वतनाची जागा व जमीन त्यांच्या नावावर करून दिली. ती वेठबिगाराची जुलमी गुलामगिरी नष्ट करून टाकली. ती गुलामगिरी तुम्ही स्वतंत्र भारतात १९७४ साली नष्ट केली. कुलकर्णी वतने नष्ट केली ती तुम्ही स्वातंत्र्याच्या काळात महाराष्ट्राच्या इतर भागातून नष्ट केली. ग्रामीण विभागातील ही कुलकर्णी वतने म्हणजे ----- शाहीचा किल्ला ! कुलकर्ण्यांची ती सत्ता ------ गरीब आणि अज्ञान लोकांना फसविण्यात होई.