व्याख्यानमाला-१९७५-२१

भारत सर्वकष असा राहूच शकणार नाही. भारतामध्ये लोकशाही नांदेल असे कधीही कोणाला वाटले नाही. ज्या वेळेला आपल्याला स्वातंत्र्य मिळाले त्या वेळेला परदेशातील अनेक राजकीय पंडितांनी भारताबद्दल असे निराशाजनक भाकीत केले. त्यां असे भय वाटले की भारत एकसंघ राहू शकेल कां? भारतामध्ये लोकशाही टिकेल का? आणि या दोन्ही प्रश्नावर अनेक पंडितांची भविष्ये चुकलेली आहेत. मला असं वाटतं की सद्यःस्थिती फारच चांगली आहे असे सत्तारूढ पक्षाचे लोकही म्हणत नाहीत, विचारवंतही म्हणत नाहीत सद्यःस्थितीमध्ये फार अडचणी आहेत. पण आपल्या पाठीमागची जी ऐतिहासिक पार्श्वभूमि आहे ती आपण विचारात घ्यायला पाहिजे. आणि मला असे वाटले की ती जर विचारात घेतली तर आपल्याला असे दिसेल की वास्तविक पहाता संकटाचे अनेक डोंगर आपल्याला ओलांडावे लागले. अनेक प्रकारच्या अडचणी आल्या. आणि आपल्या राष्ट्राच्या आयुष्यात कित्येक वेळेला असे प्रसंग आले की ज्या वेळेला राष्ट्र निरनिराळ्या त-हेला बळी पडले असते. आपले राष्ट्र सुरुवातीला अमेरिकेच्या कच्छपी लागलं असतं तरी आपण त्या बळी पडलो असतो.

संपूर्णतः साम्यवादी देशाच्या अंकित झालो असतो. तरीदेखील आपल्या राष्ट्रामध्ये लोकशाही टिकली नसती. कुठल्याही राष्ट्राशी आपण तुलना करून पहा. चीनमध्ये फार मोठी क्रांती झाली असे आपण मान्य करतो. ज्या वेळेला आपल्याला स्वातंत्र्य मिळाले त्याच वेळेला चीनमध्ये कम्युनिझम आला आमि असं सांगितलं जातं की चीनमध्ये आर्थिक क्रांती झालेली आहे. खरी माहिती संपूर्ण बाहेर येत नाही. पण चीनमध्ये क्रांती झाली हे क्षणभर मान्य करू, परंतु विचार स्वातंत्र्य, उच्चार स्वातंत्र्या, आचार स्वातंत्र्य, मुद्रण स्वातंत्र्य, शिक्षण स्वातंत्र्य अशा अनेक आघाड्यांवर आम्ही स्वातंत्र्य जपलेले आहे. विरोधकांना स्वातंत्र्य दिलेले आहे. टीकाकारांना दिलेले आहे. कोणीही यावे, कोणीही बोलावे, काहीही छापावे हे स्वातंत्र्य आबाधित ठेवून आम्ही आमचे राष्ट्र एकसंघ ठेवलं आहे. हे स्वातंत्र्य चीनला मिळालेलं नाही. एका बाजूला अमेरिकेला लोकशाही आहे. त्याच्या खालोखाल सर्वात मोठी लोकशाही ह्या देशामध्ये आहे हे विसरून चालणार नाही. मला हे मान्य आहे की २५ वर्षांमध्ये आपण काही स्वप्ने बाळगून राष्ट्राची वाटचाल सुरू केली आहे. एकप्रकारे सुंदर आर्थिक वैभवाची स्वप्ने आपण जवळ बाळगली होती. पण आपल्या आर्थिक अडचणीचे मोजमाप आपल्याला नीट करता आलेले नाही. राष्ट्राच्या जीवनात किती अडचणी येऊ शकतात याची कल्पना आपल्याला आली नाही. आपली जिद्द पुष्कळ होती व आहे पण आपली ताकद आपण पुरेशी पणाला लावली नाहीं आणि म्हणूनच आपण आज इंग्रजीमध्ये ज्याला Crossroad म्हणतात अशा एका चौकामध्ये उभे राहिलो आहोत. आपल्याला कळेनासे झाले आहे की कोणत्या रस्त्याने आपण जावे. पण एक मात्र खरे की काही रस्त्याने जाऊ नये हे आपण निश्चित केले आहे. आपल्या देशामध्ये सुशिक्षीत किंवा साक्षर लोक फार आहेत अशातला भाग नाही. पण तरी कांही रस्त्याने आपण जाऊ नये असे निश्चितच आपल्या देशातील नागरिकांना वाटत आले आहे. ज्या रस्त्याने गेलो तर हुकुमशाही येईल, लष्करशाही येईल, विचारस्वातंत्र्याला बाधा येईल आचारस्वातंत्र्याला बाधा येईल हे आमच्याकडील निराधार असलेल्या नागरिकांनीदेखील दाखून दिले आहे. मला वाटते हे सुद्धा आपले मोठे वैभव आहे की आम्ही कोणाच्या आहारी गेलो नाही. कोणाचं अंधानुकरण केलं नाही अमुक एक राष्ट्र पुढे गेले आहे. त्यांनी आपण दिपून गेलो आहे असे झाले नाही. आम्ही कोणाचा द्वेषही केलेला नाही. अंधानुकरण रशियाचेही केले नाही आणि अमेरिकेचेही नाही. कारण आम्हाला हे समजून चुकले आहे की जरी तेथे आर्थिक समृद्धी असली तरी तेथे अनंत असे सामाजिक प्रश्न उपस्थित झाले आहेत. की ज्यामुळे तिथली कुटुंबे सुखी नाहीत. तेथील लोक सुखी नाहीत. अर्थात ते सुखी आहेत किंवा नाही याची तुलना किंवा शहानिशा आपल्याला करीत बसावयचे नाही. आपण आज कुठे उभे आहोत आणि आपल्याला कोणत्या मर्गांने जाणे शक्य आहे. आपले भवितव्य काय आहे याचे आपल्या मनामध्ये नानात-हेचे विचारतरंग उठत असतात. प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. प्रत्येकाच्या व्यथा वेगळ्या असतात. ज्या वेळेला मी या सद्यः परिस्थितीचा विचार करतो त्या वेळेला मला असे दिसते की, सध्याची कठीण आर्थिक परिस्थिती हे आपल्या पुढील मोठे आव्हान आहे त्यामध्ये दुमत नाही राज्यकर्ते कांही असं म्हणत नाही की आजची आर्थिक स्थिती चांगली आहे. आजच्या कठीण स्थितीला आपली आर्थिक दुर्भिक्षता व आर्थिक दारिद्र्य हे कारणीभूत आहे. राजकीय कारणे असतीलही सामाजिक कारणे असतीलही परंतु आर्थिक दारिद्र्याची रेषा आपण ओलांडू शकलो नाही. आपण दारिद्र्या रेषेच्या वार येण्यासाठी जुन्या आर्थिक संस्था नष्ट करण्याचा चांगला प्रयत्न केला. नव्या आर्थिक संस्था निर्माण केल्या.