व्याख्यानमाला-१९८९-४०

लोकल फंडातून पैसा जमा होतो तो शेतक-यांच्या, शेतमजुरांच्या मुलांच्या शाळांवर खर्च झाला पाहिजे. लोकशाही समाजवादी प्रणालीतसुद्धा हंटर कमिशनला जे निवेदन दिले जोतिराव फुल्यांनी, त्या मधल्या मूल्याचं प्रतिबिब आज महाराष्ट्रातील शिक्षण जेव्हा पाहतो त्यावेळी, परवा-शरदराव बोलले की, महाराष्ट्रामध्ये एस.एस. सी. पातळीवर ८४% मुले गळतात. माध्यमिक पातळीवर ५५% गळतात. मुख्यमंत्रीच बोललण्यामुळे सरकारी आकडेवारी प्रमाण मानायला हरकत नाही. चौथीपर्यंत जी मुलं जातात त्यांच्यापैकी ८o% गळतात आणि १५% मुलांपैकी ३% मुले महाविद्यालयात येतात. ज्ञानाची लोकशाही निर्माण केल्याशिवाय भारतीय लोकशाही यशस्वी होणार नाही. जोतिराव फुले यांच्या शिक्षणासंबंधीच्या विचारांचा हा आजचा सामाजिक संदर्भ नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी फार सुंदर विचार मांडला. लोकशाही म्हणजे काय? लोकशाही म्हणजे सामाजिक समता. सामाजिक समता ही स्वातंत्र्याची पहिली पायरी आहे. ती स्वतंत्र लोकशाही समाजाची कोनशीला आहे या पातळीवर आपण विचार केला पाहिजे.

१९८६ साली भारत सरकारचे New perspective of Educaiton जाहिर झालं. भारतामध्ये आज १५० च्या जवळपास विद्यापीठे आहेत. बारा हजार ते साडे बारा हजार पर्यत महाविद्यालये, सिनियर कॉलेजेस आहेत. अडीच लाख सिनियर कॉलेजेसचे प्रोफेसर्स आहेत. यांना आपण विचारलं की  तुमच्यापैकी किती लोकांनी न्यू परस्पेक्टीव्ह ऑफ एज्यूकेशन वाचलंय? फार कशाला आपल्या पार्लमेंटात ५५० खासदार आहेत. त्यांना विचारा तुम्ही New Perspecive of Education वाचलं का हो. मी औरंगाबादच्या खासदारांना विचारलं की मला New Perspective of Education ची कॉपी द्या. ते म्हणाले जेव्हा ते पास झाले तेव्हा मी होतो. आमच्या प्रतोदाने सांगितले हात वर करा. आम्ही हात वर केला. ही पॉलिसी काहीही न वाचता हात वर करणे. This is Education Policy, no Policy that is new Education Policy। कुणीच वाचली नाही. त्यात M.A., M. Com. ला जाणा-या मुलांना आता Interance Examination आहे. करता काय?

महाराष्ट्रामध्ये आता नुकतांच ३७ दिवसांचा संप पार पाडला. त्यावेळी मोर्चा निघाला कॉलेजेस सुरु करावी म्हणून ? कुणी पत्रक काढलं? कुठंतरी निषेध झाला? नाही. परमिट रुमची दुकाने बंद झाली तर मोर्चे निघतील. का? राष्ट्र मजबूत होते. प्राध्यापकांना शिकवायचे नाही याला म्हणतात New Education Policy.  मॉडेल स्कूल्स, काळा, गुबगुबीत तुकतुकींत इंग्रज निर्माण करण्यासाठी चौथीच्या पाचवीच्या परीक्षेनंतर त्यांच्यातलं मेरीट पहा. कुठं असते मेरीट? जांभळाच्या झाडावर चढून जांभळं तोडण्यात आहे. मे महिन्याच्या भर उन्हाळ्यात गाडी वाटेने जो धरुळा (फुफाटा) असतो, तो नागव्या पायांनी चालून परीक्षा देणारी जी मुलं असतात तेथे  असते मेरीट. प्राध्यापकांची मुलं आमची पाचशे रुपये, हजार रुपये देऊन ट्यूशन लावतात. एक्स्ट्रॉ कोचिंग खरेदी करतात. त्याला आम्ही मेरीट म्हणायचं. तीन टक्के मुलांबद्दल मला बोलायचं नाही. हा बदल आहे. पण ही मॉडेल स्कूल्स काढलीत. आमची New Edcuation Policy जोतिराव फुल्यांच्या संबंध शैक्षणिक तत्वज्ञानाचा संकोच आहे. काही मुलांसाठी चांगली शाळा आणि अनेक मुलांसाठी शाळाच नाही.

उच्च शिक्षण

सरकार उच्च शिक्षणासाठी सढळपणे तरतूद करीत असले, तरी त्यानी बहुजन समाजाच्या शि७णाची हेडसांड चालविली आहे, अशी हाकाटी गेले काही दिवस सर्व देशभर चालू आहे. उच्च शिक्षण पदरात पडल्याने ज्या वर्गाचा प्रत्यक्ष फायदा झालेला आहे, अशा वर्गातील लोकांनी ही हाकाटी मान्य केली नाही, तरी ती काही अंशी न्याय्यच म्हणावी लागेल. असे असले तरी सध्याच्या परिस्थितीत उच्च शिक्षणासाठी करीत असलेली मदत सरकारने तोडावी, असे कोणीही देशहितच्छू म्हणणार नाही. त्याची एवढीच इच्छा असणार की, प्रजाशासनाखालील एक वर्गच्या वर्ग संपूर्णपणे दुर्लक्षिला जात असल्याने, अन्य प्रगत वर्गाबरोबरच, या उपेक्षित वर्गाच्याही प्रगतीही तितकीच आस्था सरकारने दर्शविली पाहिजे हिंदुस्थानातील शिक्षण अद्यापि बाल्यावस्थेत आहे. उच्च शिक्षणार्थ दिले जाणारे अनुदान थांबविल्यास, तेही एकंदर शिक्षणप्रसाराच्या दृष्टीने विद्यातकच ठरेल.