व्याख्यानमाला-१९७५-१५

नवीन जीवनाला आम्ही ५० सालापासून सुरुवात केली. त्या जीवनामध्ये त्या गोष्टीनी आम्ही जीवनाकडे पहावयास पाहिजे होते ते जर पाहिले असते तर या समस्या आमच्यात निर्माण झाल्या नसत्या आणि आंबेडकरांचाच पुढचा वारसा पाहिला. अस्पृश्यता कायद्याने नष्ट झालेली आहे. संविधानामध्ये १७ वे कलम आहे. ५५ साली आपण कायदा केला होता पण ती जीवनातून नष्ट झाली आहे का? आपण आपल्या मनाला विचारूया आणि याचे उत्तर कोण ‘हो’ म्हणून देत असेल तर मला फार आनंद वाटेल आणि आता जो प्रश्न यापुढे आपल्यापुढे उभा रहाणार आहे तो राजकीय हक्कापुरता मर्यादित नाही तर आर्थिक समतेशी निगडित झाला आहे आणि तो आपणापुढे फार फार मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. राजकीय दृष्ट्या जरी अस्पृश्यता नष्ट झाली असली, जीवनातून ती नष्ट झाली की नाही प्रश्न नाही पण जोपर्यंत आर्थिक समता निर्माण होत नाही तोपर्यंत खरी समाजसुधारणा झाली असे मी केव्हाही मानायला तयार नाही. आम्ही पुष्कळ प्रकारचे कायदे केले आहेत. कायद्यांनी समाज सुधारणा व्हावी असा प्रयत्न आहे. पुष्कळ प्रकारचे कायदे झाले आहेत. पुष्कळ प्रकारच्या दुरुस्त्या झाल्या आहेत. अकबराने सतीला बंदी करावी असा कायदा त्यांनी त्या काळी केला होता, दुसरा, विवाहाचे वय, मुलीचे किमान १४ असावे लहान विवाहास प्रतिबंधक असा कायदा केला होता. हे ऐने अकबरीत होतं. अकबराने त्यावेळी असल्याप्रकारचे कायदे केले होते, नियम केले होते. आज आम्ही ५६ साली हिंदू विधवा पुनर्विवाहाचा कायदा केला. १९२९ साली बालविवाह प्रतिबंधक कायदा केला. हिंदू कायद्यात पुष्कळ प्रकारचे बदल करून घेतले. ५५ साली हिंदू विवाह कायदा करून घेतला. एक पत्निव्रत स्वीकारल. हुंडा प्रतिबंधक कायदा केला. पण याने काही समाजसुधारणा झाली नाही, आज समाजसुधारणा ही केवळ सामाजिकदृष्ट्या समजून घ्यायला पाहिजे अशी महत्त्वाची समस्या आहे. आणि आर्थिक दृष्ट्या आर्थिक समता आली नाही तर सर्व मानव समान आहेत, सर्वांना सारखेच राजकीय हक्क आहेत, मानव मानवासारखाच आहे. याला काही एक अर्थ नाही. संविधानामध्ये ज्या काही गोष्टी त्यांनी अंतर्भूत केल्या होत्या त्या भारतीय समाजाच्या संपूर्ण समस्या आकलन करून भारतीय समाजाला उपयोगी पडेल असल्याप्रकारचे संविधान आपल्याला करायचे आहे ही भावना त्यांनी मनामध्ये संपूर्णपणे ठेवली नव्हती ही दुःखाची गोष्ट आहे. गेल्या २५ वर्षांमध्ये जे आपल्याला पुष्कळ फायदे मिळालेले दिसतात. मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक चर्चा झालेली दिसते त्याचे खरे कारण असे आहे की आपल्या समाजाचे वर्गात समाची शक्ती समाजाची पुढील वाट आहे आमच्या व्यापारातील दोष सर्व गोष्टींचा विचार करून संविधान तयार करायला हवे होते तसल्या प्रकारचे संविधान दुदैवाने झाले नाही. आर्थिक विषमता आणि समाजाची घडी विस्कळीत होण्याची आज पाळी आली आहे ती आर्थिक विषमता असल्यामुळे सामाजिक सुधारणेच्या समस्याचा विचार करताना १९७५ साली आर्थिक समता आल्याशिवाय काही होणार नाही ही गोष्ट आपणास मान्य करावयास पाहिजे. आर्थिक समतेची सुधारणा ही सामाजिक क्रांतीशिवाय होणार नाही. तात्पुरती उपाययोजना करून, तात्पुरते उद्योग निर्माण करून आर्थिक समतेच्या आजच्या समस्या सुटणार नाहीत. त्याला समाजसुधारणा पु-या पडणार नाहीत. त्याल पाहिजे सामाजिक क्रांती.

आपल्यापैकी जे माझ्या बरोबरीचे असतील किंवा माझ्या अगोदरचे असतील त्यांची ३० व ४२ साल पाहिलेली आहेत. स्वातंत्र्यपूर्व भारत पाहिलेला आहे. आणि स्वातंत्र्यानंतरचा भारत २५ वर्ष पाहिलेला आहे, त्यांना एक गोष्ट खटकत असेल ती अशी की आपली जीवनमूल्ये काय आहेत? ही जीवनमूल्ये तीच चालू होती जी ४२ साली ४७ साली होती ती समाजाने मागितलेली जीवनमूल्ये होती. त्यामुळे समाज हा बलवान होता, प्रबळ अशा शक्तीशी सामना करण्याची हिंमत त्य समाजामध्ये होती. अर्थात गांधीसारखा फार मोठा नेता त्यावेळी होता हे भाग्याचे लक्षण आहे यात दुमत होणार नाही. अर्थात ती जी सामाजिक मूल्ये आधी पत्करली होती ती समाजामध्ये आज आहेत का? आज सगळ्याच देशात सगळ्या समाजात, वेगळ्याप्रकारचे जीवनमूल्ये झालेली आहेत आणि कोणताही समाज त्याच्या फायद्याकरिता जीवनमूल्ये लागतात त्यापेक्षा प्रकारची जीवनमूल्ये झालेली आहेत असे आपणास दिसून येईल, ही शिस्त जीवनात कोणत्याप्रकारे निर्माण झालेली आहे. कोणताही समाज शिस्तीशिवाय जगू शकेल काय? सामाजिक जीवन शिस्तीशिवाय होऊ शकणार नाही आणि बेशिस्त बेबंदपणा आणि गरीब रहात असून देखील त्या श्रीमंत राजासारखी असण्याचा दावा धरणे हे गांधीजींनी कधीही आम्हाला शिकविले नाही. अर्थात गांधीजींनी आम्हाला शिकविले, गांधीजींचा समाजसुधारक म्हणून आम्ही उलेख करतो की सामाजिक क्रांती टाळावयाची असेल आणि आमचा समाज थोड्या जुन्या वळणावर आणावयाचा असेल तर गांधीजींच्या मार्गाने जाण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. जर गांधीजींनी सांगितलेल्या मार्गाने गेला नाहीत तर सामाजिक क्रांती अटळ आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे, गांधीजींच्या विचारसरणीला प्रतिगामी म्हणणारे काही आहेत, त्यांच्याबद्दल मला काही म्हणावयाचे नाही. विशेषतः गांधीजींनी जी काही विशिष्ट मूल्ये दिली होती, समाजाला पाळण्याकरीता तो त्याचा फार मोठा प्रयोग होता. समाज सुधारावयाचा असेल तर त्यांनी सांगितले खूप काम करा, मेहनत करा, कष्ट करा हा संदेश दिला होता. आणि जीवन जे जगावयाचे आर्थिक जीवन जे जगावयाचे, गरजा वाढवू नका गरजा कमी करा, थोडी असलेली संपत्ती या देशाच्या सर्वं लोकांना पुरवावयाची असल्यास अपरिग्रह वृत्ती हीच ठेवली पाहिजे त्या शिवाय तरणोपाय नाही, गांधीजींनी हे शिकविले होते.