व्याख्यानमाला-१९७५-१२

श्री. खंडकर, माझे मित्र श्री. शंकरराव करंबेळकर आणि मित्रहो,

या व्याख्यानमालेसाठी मी येथे येण्याचे कबूल केले त्याला अनेक कारणांपैकी एक कारण असे आहे की ४-५ महिन्यांपूर्वी कराडला दुस-या एका कामाकरता मी येण्याचे कबूल करूनसुद्धा येऊ शकलो नाही आणि म्हणून दिलेलं वचन पाळण्याचा योग आला. मी हे निमंत्रण स्वीकारले आहे.

यशवंतरावजींना ज्या विषयांसंबंधी आत्मीयता आहे त्यांपैकी सामाजिक सुधारणा हा त्यांचा आवडता विषय आहे. आणि म्हणून ज्यावेळेस या व्याख्यानाचा विषय मी सुचवावा असे मला सांगण्यात आले त्यावेळेस या व्याख्यानाचा विषय सुचवावा असे मला सांगण्यात आले. त्यावेळेस मी हा विषय सुचविला आहे- “सामाजिक सुधारणेच्या समस्या” हा विषय मी घेतला याचे कारण आजची सगळ्यात महत्त्वाची समस्या कोणती असेल तर ती आर्थिक समस्या. आपल्या समाजसुधारणेची समस्या आहे असे मला वाटते, आणि जरी आपल्या आर्थिक समस्या व ही समस्या तशीच राहिली तर समाजाचे भवितव्य फारसे उज्ज्वल आहे असे मला वाटत नाही.

समाज सुधारणा म्हटल्यानंतर जोपर्यंत समाज अस्तित्वात आहे. तोपर्यंत सुधारला पाहिजे असल्या प्रकारचा दावा नेहमी मांडण्यात येतो. समाज हा गतिमान असला पाहिजे व तो गतिमान नसला आणि स्थितप्रज्ञ असला तर ज्याप्रमाणे बंदिस्त असलेले पाणी हे शुद्ध नसते, त्यात किडे पडतात पण वाहत्या पाण्यामध्ये मात्र जीवन असते त्याप्रमाणे स्थितप्रज्ञ असलेला समाज हा शेवटी विनाशाला जातो परंतु ज्या समाजामध्ये वाहण्याची शक्ती आहे, नवीन प्रवाह आतमध्ये सामावून घेण्याची शक्ती आहे असा समाजच जगू शकतो, टिकू शकतो. जगाचा इतिहास आपल्याला या गोष्टी स्पष्ट करून सांगतो आहे. मानवी इतिहासामध्ये अनेक समाज उदयाला आले. अनेक संस्कृती उदयाला आल्या. त्यातल्या पुष्कळशा नष्ट झाल्या आहेत. फक्त काही समाजच हे सतत चालू राहिलेले आहेत. अशापैकी भारतीय समाज आहे ही मोठी समाधानाची गोष्ट आहे. गरीब देशातली संस्कृती, तो समाज इटालीमधील संस्कृती, तो समाज, इजिप्तमधील संस्कृती तो समाज असे कितीतरी समाज उदायाला आलेले समाज असे आहेत की ज्या समाजामध्ये गतिमानता नव्हती ते समाज नष्ट झाले. इतिहासामध्ये संपूर्णपणे ते दाखल होऊन गेलेले आहेत.

आपल्या समाजामध्ये ही गतीमानता होती याचे कारण नवीन विचार ग्रहण करण्याचे, नवीन विचार सामावून घेण्याची ताकत या समाजामध्ये होती. ती ताकत जर नसती तर हा समाज आज ज्या परिस्थितीत आपण पहातो त्या परिस्थितीत नसता. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या या समाजाला फार मोठे समाजसुधारक मिळालेले आहेत. ज्या ज्या वेळी या समाजावर इतर विचारांचे अनिष्ट असे आक्रमण व्हावयास लागले त्या त्या वेळेला या समाजातील धुरीणांनी नवीन विचार स्वीकारला व हा समाज गतिमान ठेवला आहे. मी फार पूर्वीच्या काळात जाणार नाही. हा विचार अत्यंत महत्त्वाचा असला तरी पण ब्रिटिशांचा अमंल सुरू झाल्यापासून जर आपण आपल्या समाजाचा विचार केलात तर समाज असे धुळीला गेलेले आहेत की ज्यांनी नवीन कल्पना स्विकारल्या आहेत. समाजाला नवीन जीवन दिलेले आहे आणि समाज हा पुढे चालू ठेवला आहे. ब्रिटिशांचे राज्य आल्यानंतर ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणारे धर्मगुरू येथे आले आणि त्या धर्मगुरुंच्या शिकवणुकीचा परिणाम ख्रिस्त धर्माचा जो एक महत्त्वाचा गुण आहे की भक्ती आणि दया- शिकवणुकीचा परिणाम होऊन पुष्कळसे लोक हिंदू समाज सोडून त्या धर्माकडे आर्कर्षित झाले आणि आपली कल्पना असेल की फक्त अशिक्षित लोकच तिकडे गेले आहेत तर ती चुकीची आहे.