मागण्यांची आधीच तरतूद असलेलं हे तंत्रज्ञान असल्यामुळे वितरण ह तिथं अत्यंत सुलभ होऊ शकेल. फार लांबून गोष्टी आणायची गरज नाही. मग त्याबाबतींत जर्मनीमधून मागणी करा, विमानाने ते पाठवा, लाईफ-सेव्हींग ड्रग्ज आणण्यासाठी लाइटनिंग कॉल करा, विमानाने औषधं आणी अशा पद्धतीने वाहतूक दळणवळण याच्यावरती होणारा प्रचंड खर्च व मनुष्यशक्तीचा अपव्यय हासुद्धा अनुरूप तंत्रज्ञानामध्ये वाचतो. अनुरूप तंत्रज्ञानाची भलावण मी करतो आहे ती या दृष्टीने की कामा आणि श्रम या गोष्टी प्रत्येकाला करायला लावणारं हे तंत्रज्ञान राहील. त्या दृष्टीनं गांधी असं म्हणत होते की अनुरूप तंत्रज्ञान ही काय फक्त मागासलेल्या देशांची गरज आहे असं नाही. मागासलेल्या देशांना तथाकथित आधुनिक तंत्रज्ञान परवडत नाही. म्हणून अनुरूप तंत्रज्ञान घ्यावे असेही नाही. इथं परवडण्याचा प्रश्नच येत नाही. आज जगातील प्रत्येक राष्ट्राला सर्वात प्रगत व सधन राष्ट्रांनासुद्धा अनुरूप तंत्रज्ञानाची गरज भासू लागली आहे. अमेरिकेसारख्या राष्ट्रात जिथे प्रत्येक गोष्टीचे वैपुल्य आहे पण हे सगळं असूनहा समाजजीवनात एक पोकळी आहे. तिथेही आज हे जाणवू लागलंय की आपलं हे तंत्रज्ञान अनुरूप नाही. हे तंत्रज्ञान वैपुल्य निर्माण करतं. पण समादान देऊ शकत नाही. हे तंत्रज्ञान नवीन नवीन गरजा निर्माण करायला भाग पाडतं पण वाढत्या गरजा कधीच पूर्म होत नाहीत. ‘इट क्रिएटस् अनसॅटियेबल डिमांडस्!’ तुप्त न होऊ शकणारी तृष्णा निर्माण करणं हे या उत्पादनतंत्राचं, या विकासतंत्राचं मुळात गृहीतच आहे. तेव्हा ते तसंच राहणं अटळ आहे. तेव्हा लोकांच्या सर्व किमान गरजा चांगल्यारीते पूर्ण होणं, सर्वाना पोटभर व सकस अन्न मिळणं, आरोग्याला हानिकारण ठरणार नाहीत अशी औषधं मिळणं ही या तंत्रज्ञानाची उद्दिष्टंच नव्हेत. साध्या डोकेदुखीवर आपण गोळी घेतो ती गरजेपेक्षा अकारणच शंभरपट अधिक स्ट्राँग असते. अंतिमतः ती शरीराला अपायकारक असली तरी त्वरित आराम देण्याच्या स्पर्धेपायी कंपन्या तसं करतात. आपल्याला पर्याय नसतो. या वस्तुस्थितीची जाणीवही नसते. अनेक अँलोपॅथिक औषधांचे असे विलक्षण हानिकारण परिणाम आज पुढे आले आहेत. नैसर्गिक पद्धते संयत जिणं जगल्यास ते टाळता येतात असं गांधी म्हणाले होते. आरोग्यालाबद्दलचा त्यांचा दृष्टीकोनच असा होता की मोठमोठाली इस्पितळं काढणं ही काही आरोग्याची हमी असू शकत नाही. उलट इस्पितळं वाढणं हे वाढत्या अनारोग्याचं लक्षण आहे. समाजामध्ये जास्तीत जास्त दवाखान्यांची मागणी निर्माण होते याचा अर्थच तिथं आरोग्याची हेळसांड होते. तेव्हा शक्यतो अनारोग्य होऊ नये असं सकस अन्न प्रत्येकाला मिळालं पाहिजे. ते अनुरूप तंत्रज्ञानातून होऊ शकेल. अनुरूप तंत्रज्ञानामधून लोकांच्या गरजा भागतील. गरजा म्हणजे ख-या अर्थाने असलेल्या गरजा भागतील. प्रत्येकाला पूर्ण रोजगार मिळेल, प्रत्येकाला पुरेसा कपडा मिळेल, निवारा मिळेल, आणि माणसासारकं अर्थपूर्ण जीवन जगता येईल. आणखी काय पाहिजे?