प्रस्थापित समाजाचा त्यांना विरोध होणार होताच. ज्ञानाच्या किल्या ब्राह्मणांच्या कंबरेला होत्या. त्या कशा हाती यायच्या? त्या तयार करण्याचा स्वतंत्र प्रयत्न करणे हाच एकमेव मार्ग त्यांच्या समोर होता. आणि म्हणून त्यांनी त्या दिशेत वाटचाल आरंभिली. १८४८ साली मुलींची व १८५२ साली अस्पृश्यांची शाळा त्यांनी काढली. मुलींच्या शाळेत शिकवायला शिक्षिका मिळत नव्हत्या. महात्मा फुल्यांनी आपल्या पत्नी सावित्रीबी फुले यांना शिक्षण दिले. सावित्रीबाईंनी मुलींना शिकविण्याचे पवित्र कार्य हाती घेतले. त्यांचा खूप छळ झाला. पण या क्रांतीकारक बाईने हाती घेतलेले कार्य सोडले नाही. फुल्यांनी शिक्षण प्रसाराच् कार्याला हात घातला नसता तर महाराष्ट्रातील बहुजन समजा जागा होऊ शकला नसता.
अज्ञानाच्या अंधारातून त्याला बाहेर काढण्याचे काम फुल्यांनी केले. शिक्षणाचा लाभ समाजाच्या सर्वच थरातील सर्वच लोकांना मिळाला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. शिक्षण प्रथम वरच्या वर्गाला मिळाले पाहिजे; तरच ते झिरपत झिरपत खालच्या वर्गांपर्यत जाऊन पोहोचेल, असा कावेबाज युक्तीवाद पुढे आला. हा युक्तीवाद Theory of Filteration या युक्तीवादावर घणाघाती हल्ला केला. आमच्या भारतीय समाजातल्या खालच्या वर्गातील लोकांना वरिष्ठ वर्गातील लोकांपासून काहीही मिळाले नाही याची जाणीव त्यांनी इंग्रज सरकारला करून दिली. तळागळातील लोकांना शिक्षण मिळालेच पाहिजे असा त्यांनी आग्रह धरला. हंटर कमिशनला त्यांनी जे निवेदन सादर केले होते ते अतिश महत्वाचे आहे.
म. फुले हे सामाजिक असंतोषाचे जनक होते. त्यांनी आपले कार्य शिक्षणापर्यंतच मर्यादित ठेवले नाही. लोकांना विद्या देऊन त्यांची गेलेली मति परत मिळवून देणे आवश्यक होते; नीतिबरोबर गति मिळणार हे जरी खरे असले तरी त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक होते; आणि समाजाला गति मिळाल्याशिवाय त्याच्या हाती वित्त येणे शक्य नव्हते. “खचलेल्या” बहुजनांना, दलितांना व शोषितांना जीवनात उभे करणे आवश्यक होते. आणि त्यासाठी समाजाचे समग्र परिवर्तन करणे अनिवार्य होते. फुल्यांना या गोष्टीची जाणीव होती. ती जाणीव बहुजन समाजाला करून देण्याचा त्यांनी प्रकर्षाने प्रयत्न केला. समाज परिवर्तनासाठी आवश्यक असणा-या सुधारणांचा महात्मा फुल्यांनी पाठपुरावा केला. आणि म्हणूनच ते महाराष्ट्रातील सामाजिक क्रांतीचे अग्रणी होऊ शकले. मानवतावादाने प्रेरित झालेल्या या महापुरुषाने “बालहत्या प्रतिबंध गृह” या नावाची संस्था काढली. वाट चुकलेल्या विधवा स्त्रीयांना त्यांनी आधार दिला आणि त्यांच्या अर्भकांना या जगात जन्मण्याचा अधिकार प्राप्त करून दिला. केशवपनाच्या जाचातून अनेक ब्राह्मण विधवांना त्यांनी सोडविले. सावकरी पाशात सापडलेल्या शेतक-यांच्या दुःखाला त्यांनी मुखरित केले. शेतक-यांच्या आणि कामगारांच्या चळवळी त्यांनी उभ्या केल्या. त्यांच्या संघटना बांधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. महाराणी व्हिक्टोरियाचा पुत्र ड्यूक ऑफ कॅनॉट हा पुण्याला आला तेव्हां त्याच्या समोर शेतक-यांच्या दुःखांची माहिती फुल्यांनी दिली. खरा भारत हा खेड्यात आहे हे त्यांनी इंग्रज सरकारला निक्षू सांगितले. खेडी सुधारल्याशिवाय, शेती सुधारल्याशिवाय हिंदुस्थानला भवितव्य नाही हा विचार त्यांनी मांडला.
महात्मा फुले हे कृतीशील तत्वचिंतक होते. त्यांच्या जीवितकार्यामागील सर्व प्रेरणा ह्या मानवी स्वातंत्र्याच्या, समतेच्या बंधुत्वाच्या प्रेरणा होत्या. मानवी स्वातंत्र्यासाठी, समतेसाठी न्याय आणि बंधुत्वासाठी त्यांनी समर्पित भावनेने प्रतिकूल परिस्थितीशी आणि प्रस्थापित वर्गाशी अव्याहतपणे लढा दिला. टॉमस पेन या महान अमेरिकन बंडखोर विचारवंताच्या “मानवतेचे अधिकार” (Rights of Man) या ग्रंथाचा त्यांच्या मनावर फार मोठा प्रभाव पडला होता. त्यांनी आपले ध्येयस्वप्न विचारवंत आणि समाजसुधार वरिष्ठ वर्गात जन्मले होते. त्यांनी आपल्या वरिष्ठ समाजातील प्रश्नांनाच केवळ हात घातला. एका विशिष्ट मर्यादेपलिकडे त्यांच्या दृष्टीला झेप घेता आली नाही. खालच्या समाजातील लोकांच्या सुखदुःखांना ते वाचा फोडून शकले नाहीत. एका मर्यादित वर्तूळाच्या बाहेर त्यांचे कार्या जाऊ शकले नाही. बौद्धिक प्रबोधनाची ज्योत त्यांनी पेटविली आणि तेवत ठेवली यात शंका नाही. पण समाज क्रांतीची मशाल पेटविण्याची हिम्मत त्यांच्या अंतःकरणात नव्हती, आणि ती जळती मशाल हातात धरून पुढे चालण्याचे बळही त्यांच्या अंगात नव्हते. फुल्यांच्या क्रांतीकारी विचारांनी वणव्याचे रूप घेतले. त्या वणव्यात येथील पोथी-पुराणे, प्रथा-परंपरा, चातुर्वर्ण्य व जातीभेद यासारख्या गोष्टी सापडल्या व होरपळल्या. त्यांनी पेटविलेली समाजक्रांतीची मशाल महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात जावी म्हणून त्यांनी १८७३ साली “सत्यशोधक समाजाची” स्थापना केली. सत्यान्वेषी प्रज्ञेच्या व क्रांतीप्रवण प्रतिभेच्या या महापुरुषाने दलित व पददलितांसाठी एक संघर्षशील तत्वज्ञान व व्यासपीठ निर्माण करून दिले. समाज्चाय खालच्या थरातील लोकांसाठी ज्या प्रखरतेने त्यांनी लढा दिला त्याच प्रखरतेने त्यांनी स्त्रियांच्या अधिकारांसाठी देखील संघर्ष केला.