व्याख्यानमाला-१९८०-१३

इंग्रज राजवटीने महाराष्ट्रात अधिक शिक्षणप्रसार करावा आणि लोकोपयोगी कायदे पास करावेत असा त्यांचा आग्रह होत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे लोकहितवादींनी भारतीयांसाठी वेगळ्या संसदेची मागणी केली होती. इंग्रजी सत्तेला त्यांनी असे आवाहन केले होते की बारतीयांसठा आवस्यक असणारे कायदे हे इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये पास न करता ते येथे पास करावेत. भारतासाठी वेगळी संसद असावी आमि त्या संसदेत भारतीय जनतेचं प्रतिनिधित्व भारतीयांनीच करावं, हा भविष्याचा वेध घेणारा विचार त्यांनी निर्बपणे मांडला. वसतुतः या विचारामागे त्यांची दूरदृष्टी तर होती; पँ तो व्यक्त करणे त्याकाळी धाडसाचेही होते. सर्वजाती-धर्मातील सुशिक्षित आणि चारित्र्यसंपन्न व्यक्तींना भारताच्या पार्लमेंटमध्ये जाण्याची संधी मिळाली पाहिजे असे त्यांना वाटत होते.

लोकहितवादींनी महाराष्ट्रात एक वैचारिक जागर घातला. येथील सामाजिक रोगांचे अचूक निदान त्यांनी केलं. त्या व्याधींवर त्यांनी उपचार सुचविले. सामाजिक आणि वैचारिक क्षेत्रातले ते एक लोकविलक्षण धन्वंतरी होते. जातिभेदावर तर त्यांनी मूर्तिभंजकाच्या अभिनिवेशाने आक्रमण केले. हिंदुसमाजाच्या अवनतीला व विघटनाला सामाजिक विषमतेवर पोसलेला जातिभेद आणि त्या जातिभेदाला आचार-विचारांचे खतपाणी घालणारा ब्राह्मणवर्ग हा प्रामुख्याने जबाबदार आहे असे त्यांचे प्रामाणिक मत होते. आणि हे कटु सत्य त्यांनी निर्भिडपणे व कठोरपणे मांडले. त्यांच्या विवेचक बुद्धीला जे पटले ते त्यांनी असंदिग्ध शब्दात सांगितले. ब्राह्मण्याला आरोपीच्या पिंज-यात उभे करून रामशास्त्रीबाण्याने त्यांनी त्याची समिक्षा केली. ब्राह्मण्य गुन्हेगार साबीत होणे अटळ होते.

महाराष्ट्रात सामाजिक इतिहासात सर्वात अधिक उत्तुंग व्यक्तिमत्व महात्मा जोतिराव फुल्यांच्या रूपाने आपल्या समोर उभे राहते. फुल्यांचं सबंध जीवन हे समाजक्रांतीचं प्रतीक किंवा रूपक आहे असं मी म्हणालो तर त्यात कसलीच अतिशयोक्ती होणार नाही. Mahatma Phule’s life is a metaphor of social revolution. अलबर्ट कामूने वैचारिक बंडखोरीची जेवढी कांही ठळक लक्षणे किंवा वैशिष्ट्ये सांगितली आहेत ती सर्व फुल्यांच्या व्यक्तिमत्वात, विचारसरणीत आणि कार्यप्रणालीत उत्कटतेने आविष्कृत झालेली आपल्याला दिसतील. The Rebel  या त्याच्या ग्रंथात कामूने ध्येयवेड्या बंडखोराची जी व्याख्या केली आहे तिच्यात महात्मा फुले हे तंतोतंत बसतात. ज्या मूल्यांसाठी जगणे आवश्यक असते त्याच मूल्यांसाठी विशिष्ट अवस्थेत मरणेही आवश्यक असते, हे विचारसूत्र फुल्यांनी आपल्या मनात हयातभर सातत्याने बाळगले असले पाहिजे. आणि म्हणूनच त्यांनी आपल्या कृती आणि उक्तीमध्ये थोडी देखील विसंगती निर्माण होऊ दिली नाही. प्रतिकूल परिस्थितीशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. His life was an absolute affirmation of what he thought just and right. कुठलीही प्रतिकूल परिस्थिती त्यांच्यावर आपल्या अटी लादू शकली नाही. अतिशय गुंतागुंतीच्या व प्रतिकूल प्रसंगांना अनेकदा तोंड देण्याची पाळी त्यांच्यावर आली. पण त्यांच्याशी त्यांनी कसलाही तह केला नाही. प्रतिकूल परिस्थितीने त्यांच्या समोर ठेवलेल्या कोणत्याही तहनाम्यावर त्यांनी स्वाक्षरी केली नाही. राजर्षी शाहू छत्रपती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपवाद सोडला तर फुल्यांएवढा बंडखोर व विद्रोही माणूस महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात सापडणे शक्य नाही.

महात्मा फुल्यांची तुलना कधी कधी बूकर टी. वॉशिंग्टनशी केली जाते. पण ती चुकीची तुलना आहे. बूकर टी. वॉशिंग्टनने तडजोडीचे धोरण व अनुनयाचे मार्ग स्वीकारले होते. श्वेत अमेरिकन समाजाशी व त्याने निर्माण केलेल्या प्रतिकूल परिस्थितीशी तडजोड करून आपल्या नीग्रो समाजाची प्रगती साधण्याचा बूकर टी. वॉशिंग्टनने प्रयत्न केला. गो-या अमेरिकन समाजाविरुद्ध त्याला आक्रमक भूमिका घेता आली नाही. उलट फुले हे बंडखोर होते. येथील शूद्र आणि अतिशूद्रांना लाचारीची, अनुनयाची व तडजोडीची भूमिका घेण्याची त्यांनी सल्ला दिला नाही. बूकर टी. वॉशिंग्टनेने आपल्या नीग्रो समाजाला असा सल्ला दिलाः “Cast your bucket where you are.” उलट फुल्यांचं म्हणणं होतं “Hitch your cart to the stars.” इमर्सनचं हे वाक्य मी मुद्दाम फुल्यांच्या तोंडी ठेवतो आहे. फुल्यांच्या धगधगत्या ध्येयवादाच्या व विचारसरणीचा अर्थ आणि आशय या शब्दात व्यक्त होऊ शकतो.