भाग १ विधानसभेतील भाषणे-६२

विरोधी बाजूला जे गुजराती मित्र बसले आहेत त्यांचा आवाज ऐकावयास मिळणार नाही म्हणून दुःख वाटते. श्री. खोडाभाई पटेल ३५ (टिप पाहण्यासाठी येथे क्लिक करा) यांच्यासारखे सोज्वळ वक्ते, आपल्याला अलंकारिक भाषणात चिमटे घेणारे श्री. जयंतीलाल दलाल (टिप पाहण्यासाठी येथे क्लिक करा), चढाई करणारे परंतु खेळकर वृत्तीचे मुद्दे मांडणारे श्री. गंगाराम रावळ ३७ (टिप पाहण्यासाठी येथे क्लिक करा) आणि सुवर्णपद्धतीने हसत हसत हृदयाचा ठाव घेणारे महाकुशल श्री.जसवंतराव मेहता यांच्यासारखी माणसे सापडणार नाहीत आणि त्यांची भाषणे ऐकावयास मिळणार नाहीत म्हणून मला दुःख वाटते. त्याचप्रमाणे आमच्या बाजूला बसलेले श्री. माधवलाल शहा ३८ (टिप पाहण्यासाठी येथे क्लिक करा) यांच्यासारखे अनेक प्रश्न विचारणारे सभासद मिळणार नाहीत. प्रत्येक प्रश्नावर आग्रहाने मत प्रतिपादन करणारे श्री. लल्लुभाई पटेल  अशा कितीतरी मंडळींची आठवण आमच्या मनात राहील. त्यांची आठवण सभागृहाच्या दप्तरात नमूद आहेच, परंतु या सभागृहात गेली चौदा, पंधरा वर्षे काम केलेल्या माणसांच्या मनातही ती आठवण नोंदली गेली आहे असे मी श्रध्दापूर्वक, मैत्रीच्या आणि सहकार्याच्या भावनेने सांगू इच्छितो.

अध्यक्ष महाराज, महत्त्वाची गोष्ट म्हणजे सभागृहातर्फे मी आपले आभार मानू इच्छितो. तुफानामध्ये ज्याप्रमाणे कौशल्याने नौका चालवावी त्याप्रमाणे आपण गेल्या तीन वर्षांत या सभागृहरूपी नौकेची कर्णधारी केली आहे. सभागृहाच्या कामकाजात आपण समतोलपणाने आणि मोठया संयमाने काम केले. त्याचप्रमाणे आवश्यक वेळी कठोरपणे काम करण्याचे आपणांवर प्रसंग आले. या राज्याची आणि सभागृहाची प्रतिष्ठा राहील या सदभावनेनेच आपण हे काम केले म्हणून मी आपले पुन्हा आभार मानतो. जय हिंद.
-----------------------------------------------------------------
On 25th March, 1960, the last day of the Legislative Assembly Session of the Bilingual Bombay State, Shri Y.B.Chavan, Chief Minister, made a touching farewell speech stating that he as the man at the helm of affairs of the Bilingual Bombay State would always carry with him the sweet memories of stalwarts like Dr. Jivraj Mehta, who though a renoweed physician by profession, handled the finance portfolio like a financial wizard. Likewise he said, he had nothing but praise for other Gujarati legislators for their studiousness, alertness and party discipline. He also paid glowing tributes to the Speaker for conducting the business of the House in an atmosphere of camaraderie and bonhomie.