व्याख्यानमाला१९७३-१३

त्यात सॉक्रेटिस, बुध्द, गांधी ही अशी माणसे आहेत की ते मानवी इतिहासातले उंच सुळके आहेत. गांधीसारखे फार मोठे थोर पुरूष आपल्या देशात झालेले आहेत. मला फार मोठं भाग्य वाटतं या देशाचं. गांधींचे संतती नियमनाबद्दलचे विचार मला मान्य नाहीत. गांधींचा ब्रम्हचर्या विषयीचा जो गाढा विश्वास आहे तो मला मान्य नाही. Familyplanning  साठी गांधीवाद अपुरा पडतो आहे. पण गांधींच्या विचाराचा जो गाभा आहे, त्यांचे शाश्वत विचार आहेत हे फार मोठे वाटतात. ज्याप्रश्नाची उत्तरे मार्क्समध्ये मिळालेली नाहीत, त्याची उत्तरे मला गांधीवादामध्ये मिळालेली आहेत गांधीवादामध्ये मानवत:वादाला आणि माणसामधल्या सत्तप्रवृत्तीला आव्हान करण्याचा जो भाग आहे तो मार्क्समध्ये नाही. मार्कि्सझममध्ये दोन प्रेरणा आहेत. एक नैतिक प्रेरणा आहे. माणसाला आर्थिक न्यायाची एक नैतिक प्रेरणा आहे. पण त्याचबरोबर मार्क्समध्ये माणसामधली जी एक असूया आहे, जो एक हेट्रेड आहे त्यालासुध्दा आव्हान आहे. त्यामुळे मार्क्सवादामध्ये जे आव्हान आहे ते संमिश्र आहे. त्याच्यामधला काही भाग नैतिक प्रेरणेचा आहे. पण त्याचबरोबर त्यांच्या मधला काही जो भाग तो आहे. माणसामधली असूया. माणसामधला व्देष, माणसामधला काही विध्वंसक भाग आहे यालाही त्याच्यामध्ये आव्हान आहे. म्हणूनच या प्रेरणा संमिश्र आहेत. गांधीवादाच्या प्रेरणा अत्यंत थोर, विशुध्द अशा नैतिक स्वरूपाच्या मानवी प्रेमाच्या आहेत. अत्यंत थोर अशा नैतिक प्रेरणा आहेत. आणि मला गांधीवाद आणि गांधी मार्क्सपेक्षा मोठे वाटतात, येशूख्रिस्तापेक्षा सुध्दा गांधींचा वेगळेपणा आहे येशूख्रिस्ताच्या सर्व तत्त्वज्ञानांचा पाया जर काय असेल तर  Man is essentially Sinful.  माणूस हा मूलत:च पापी आहे. आणि मग त्याच्यावर सारखे संस्कार केले पाहिजेत, नाही. तर तो सारखा पापाकडे धावेल हा येशूच्या तत्त्वज्ञानाचा पाया आहे-गाभा आहे गांधींच्या तत्त्वज्ञानाचा गाभा बरोबर उलटा आहे. माणूस हा मूलत: सतप्रवृत्ती आहे. माणूस हा मूलत: ईश्वराचा अंश आहे. त्याच्या सतप्रवृत्तीला नुसते आव्हान करा, त्याच्यातील परमेश्वर झटकन जागा:  होईल. म्हणजे गांधीजींची भूमिका येशूख्रिस्तांच्या भूमिकेच्या बरोबर उलटी आहे. अगदी वेगळी आहे आणि त्यामुळे येशूख्रिस्ताचे तत्त्वज्ञा मला वेगळं वाटतं आणि समाजवादाचा उद्य ज्यावेळी या देशात झाला होता त्याचवेळी गांधीवादाचा प्रवाह या देशात झाला शिगेला पोहचलेला होता. गांधीवादाच्या प्रेरणांची मी तुम्हाला सांगतो, ब्रिटीश साम्राज्यशाहीविरूध्द झुंजा घेतली, देशातील लाखो लोकांना साम्राज्यशाहीविरूध्द झुंज घ्यायला लावली. गांधींच्या सर्व चळवळीतलं जर कोणतं सूत्र असेल तर ब्रिटीश साम्राज्यशाहीविरूध्दची आपली झुंज हे आहे ब्रिटिश माणसांच्या विरूध्द नाही. गांधी नेहमी असं म्हणत असत की “ We should not hate the sinner, we must hate the sin”  म्हणजे पापाचा तिरस्कार तुम्ही करा, परंतु पापी माणसाचा तिरस्कार करू नका. त्या प्रमाणात ब्रिटीश Emperialism  आणि Britishman  यांच्या गांधींनी फरक केला. आणि त्यामुळे ब्रिटीशदेशाल आमच्या चळवळी मध्ये कुठेही स्थान नव्हतं. इतकंच नव्हेतर ब्रिटीश साम्राज्य नष्ट झाल्यानंतरचा पहिला गव्हर्नर जनरल जो आम्ही निवडला तो  ‘माऊंट बॅटन’ ब्रिटीश माणूस होता. जगातल्या इतिहासातील हा एक चमत्कार आहे त्याचं कारण गांधींचं नेतृत्व आम्हाला लाभल होतं. त्यामध्ये असूयेला, व्देषाला, विध्वंसक प्रवृत्तीला अजिबात स्थान नव्हते. गांधीवादाच्या प्रभावाच्या छायेखाली हे समाजवादाचं रोपट वाढत होतं आणि आश्चर्य असं की गांधींच्या मृत्यूनंतर गांधीवादाचा प्रभाव समाजावादावर अधिक पडत चालला. त्याची दोन तीन उदाहरणं मी आपवल्याला देतो. पहिली गोष्ट अशी आहे की या देशातल्या समाजवाद्याचा लोहियांनी एक सिध्दांत मांडला होता. पंचमढीला त्यांनी सांगितलं की जगामधल्या सगळ्या समाजवाद्यांचा आग्रह काय असेल तर Heavy  Industrialization,  महायंत्रोत्पादनावर त्यांचा भर आहे. प्रचंड स्वरूपाची यंत्रे उभी करा. महायंत्रोत्पादन हे समाजावादाचं एक सूत्र आहे. असा त्यांचा आग्रह आहे. इथे समाजवाद्यांचा आग्रह आहे की छोट्या छोट्या प्रकारची यंत्रं तुंम्ही निर्माण करा. औद्योगिक क्रांतीसाठी Small  Scale  Indutries   वर त्यांचा भर आहे. छोट्या छोट्या प्रकारची यंत्रं तुम्ही निर्माण करा जी दोन माणसं चार माणसं चालवू शकतील.  आशाप्रकारचा आग्रह आहे तो गांधीवादातून आलेला आहे. जगातल्या कोणत्याही समाजवादामध्ये तुम्हाला अशा त-हेची भूमिका सापडणार नाही. हा गांधीवादाचा प्रभाव आहे, दुसरा गांधीवादाचा प्रभाव विकेंद्रीकरणाचा आहे, समाजवादाची मूळप्रवृत्ती जी आहे ती सगळ्या जगभर सत्ता केंद्रीकरणाकडे आहे राज्यसरकारच्या हातामध्ये सगळी सत्ता केंद्रित करायची आणि आर्थिक व राजकीय सत्ता केंद्रित झाल्या की सर्व सत्तांचे केंद्रीकरण होतं. किंबहुना आर्थिक सत्ता हे सगळ्या सतेंचं मूळ आहे. मार्क्सने जे म्हटलेलं आहे, ते काही बाबतीत खरं आहे ‘ आर्थिक सत्तेवरचं नियंत्रण हे मानवी जीवनावरच नियंत्रण असतं, पैशाच्या थैलीवरचं नियंत्रण हे जवळ जवळ सगळ्या जीवनावरचं नियंत्रण असतं हे पुष्कळसं खरं आहे. ते जगातल्या इतर देशातील राजकारणातसुध्दा आपल्याला दिसेल United Nation  वर जगातल्या बड्या राष्ट्रांचा प्रभाव आहे, राष्ट्रामध्ये सुध्दा भांडवलवाल्याचा प्रभाव असतो, तो मुख्यत: पैशाच्याव्दारे असतो. आणि त्याच्या जोडीला राजकीय सत्ता गेली की त्या दोन्हीं सत्तांचं केंद्रीकरण विलक्षण होतं परंतु जगातल्या सरळ्या समाजवाद्यांच्यामध्ये मूळ आग्रह जो आहे तो सत्ता केंद्रित करण्याचा. गांधीच्या प्रभावामुळे भारतीय समाजवादामधला जो आग्रह आहे हा सत्ताविकेंद्रीकणाचा आहे.