अभिनंदन ग्रंथ - (इंग्रजी लेख)-६

IN THE FIRST PLACE I send my good wishes for the effort you are making. Shri Yeshwantrao Chavan has already made a mark upon the poli­tical  life of the country. Though young in age, he has shown that he has a fund of wisdom.

U. N.  DHEHAR
--------------------------------------------------------
I AM VERY HAPPY to know that the 48th birth­day of Shri Yeshwantrao Chavan, Chief Minister of Maharashtra, will be celebrated at Nagpur on 12th March and that a Souvenir will also appear to mark the celebrations. Shri Chavan's services to the country are well-known and need no ela­boration. At a comparatively young age he has carried very heavy burdens and has endeared himself to all those who have come into contact with him. I have great pleasure in sending him my felicitations on his 48th birthday and wish him many many happy returns of the day.

JAGJIVAN RAM,
Minister for Railways,
India.
--------------------------------------------------------

श्री आद्य शंकराचार्यांनीं विश्वसंस्कृतीचे दर्शन घडविलें म्हणून प्राचीन काळीं भारताचें ऐक्य धर्म व संस्कृति यांच्या अधिष्ठानावर उत्पन्न झालें. आद्य शंकराचार्यांचा संदेश भारतांतील विचारप्रवर्तकांनी व सर्व प्रांतांनी मान्य केला होता. म्हणून हे ऐक्य निर्माण होऊं शकलें. त्यामध्ये पुन्हा खंड पडला. संत महंतांनी श्री शंकराचार्यांच्या बौद्धिक कार्यांचे रहस्य आत्मसात केलें, त्याला भक्तिभावाची जोड दिली व पुन्हा त्या ऐक्याचें पुनरुज्जीवन केले. लाहान थोर ‘भलते याती नारी नर’ या भक्ति भावनेच्या झेंड्याखाली एकत्र गोळा झाले. हा गोपाळकालाच राष्ट्रीय ऐक्याचें बीज बनतें. हें बीज फोफावलें व त्यांत शिवाजी महाराजांच्या कार्यांचा विस्तार झाला.

महाराष्ट्र संतांची ऐक्यभावना केवळ भारतापुरती मर्यादित नव्हती. त्यांनी विश्वात्मक देवाची आराधना केली, व “भूता परस्परें जडो मैत्र जिवाचें” असा हव्यास धरला. आकुंचित मतांवर, रुढींवर व संप्रदायांवर त्यांनी हल्ला केला. जातिवादाचें विष त्यांनी उतरविलें. एकनाथांनी हरिजनांना पितर म्हणून आवाहन करून श्राद्धसमयीं भोजन केलें. तुकाराम महाराजांनी “ब्राम्हण तो एक | चोखा मेळा महार” असें जाहीर केलें. संतांची वाणी मराठी बोलणा-या प्रत्येक माणसाच्या  घरांत व मनांत पोचली आहे. ज्ञानोबा व तुकोबा यांची वाणी आम्हा घरांघरांतून बोलतों. विदर्भांत पैदा झालेला संत गुलाबराव महाराज होय. स्वत:ला ज्ञानोबांची कन्या समजून ते स्वत:ला धन्य मानीत होते.

राज्य मिळालें आणि सत्ता मिळाली म्हणून विकास होतो असें नाही. आमच्या देशाच्या हातांत राज्य हजारों वर्षे होतें. परंतु विकास थांबला. त्यामुळे राज्य गेलें. देशाचें ऐक्य आपण राखूं शकलों नाहीं. सर्व जाती, जमाती व संप्रदाय यांना एकजीव करणारे ऐक्य नांदले पाहिजे. असें ऐक्य नांदविण्यासाठी आपल्या शासनाला यशवंतरावांसारखे नेते लाभले आहेत हें महाराष्ट्राचें भाग्यच समजलें पाहिजे, श्री यशवंतराव चव्हाण यांना जवळून पाहण्याचा योग मला आला आहे. त्यांची समाज व संत यांच्यावर नितांत निष्ठा आहे. राष्ट्रपुरुषांचें स्मरण केल्याशिवाय त्यांचें एकहि भाषण होत नाही. महामानव निर्माण करणें, समता निर्माण करणें, हें त्यांचे ध्येय आहे. महारष्ट्रांतील थोरामोठ्यांचे विचार व आशीर्वाद घेण्याची सुंदर संधि त्यांना प्राप्त झाली आहे. त्यांच्यांत देश, धर्म व संस्कृति यांची भक्ति भरलेली आहे. भाषा, प्रांत, पंथ व जाती यांच्याबद्दलच्या सहकारी भावना विकोपाला जाऊं न दिल्या तरच देश समृद्ध होणार आहे. प्रस्तुत अभिनंदन ग्रंथ ज्यांना भेट करण्यांत येत आहे, त्यांना उदंड आयुष्य लाभो, हीच गुरुदेवाला प्रार्थना आहे.

- संत तुकडोजी महाराज