• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

भाग १ विधानसभेतील भाषणे-५८

तसा तो सोडविला जाईल असा मला विश्वास आहे. त्या दृष्टीने नवबौध्दांच्या मागणीसंबंधी, सवलतीसंबंधी पुनर्विभाजनानंतर तातडीने विचार करावयाचे ठरविले असून न्याय्य पद्धतीने तो सोडविण्याचा विचार केला आहे. विशेषतः संयुक्त महाराष्ट्र परिषदेने या बाबतीत जो खलिता पाठविला होता त्या खलित्याच्या १४ व्या पॅरिग्राफमध्ये ज्या भावना व्यक्त केल्या होत्या त्या भावना माझ्या विचाराच्या प्रतिनिधीक आहेत अशी चर्चा मी समितीच्या मंडळींशी आणि रिपब्लिकन पक्षाच्या मंडळींशी केली होती. ती भावना खरी आहे असे मी आवर्जून सांगू इच्छितो. मी माझ्या विचारांचे प्रदर्शन एवढयासाठी करतो की, जर चुकून रिपब्लिकन पक्षाच्या आणि नवबौध्दांच्या नेत्यांच्या मनात शंका असेल तर त्यांनी ती काढून टाकावी. मी असे म्हणेन की, संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे या त्यांच्या भावना अन्कंडिशनल होत्या आणि तो झाल्यानंतर त्यांनी आपल्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तो करीत असताना कंडिशन्स घालावयाच्या अशी भूमिका त्यांनी घेऊ नये अशी मी नवबौद्ध कार्यकर्त्यांना विनंती करीन.

त्या त्या गोष्टींचा पुनरुच्चार करू नये अशी माझी इच्छा होती पण एका सन्माननीय सभासदांनी प्रश्न उपस्थित केला म्हणून मला बोलावे लागतेः सन्माननीय सभासद श्री. शिर्के ३२ (टिप पाहण्यासाठी येथे क्लिक करा) हे बोलताना असे म्हणाले की मराठी भाषिक राज्य होणार की मराठा राज्य होणार याची भीती वाटते. अशा प्रकारे बोलून ते स्वतःवर आणि मराठा समाजावर अन्याय करीत आहेत. मी असे सांगू इच्छितो की, तसे होणार नाही आणि आम्ही तसे होऊ देणार नाही. या गोष्टींचा पुनरुच्चार मी टाळीत होतो पण मी जर बोललो नाही तर बाहेर बोलतो आणि येथे बोलत नाही असे म्हटले जाण्याचा संभव आहे. ह्या प्रश्नासंबंधी सर्वसाधारण भूमिका मी सभागृहापुढे ठेवली आहे. मला एक विनंती करावयाची आहे ती ही की, मराठवाडा, विदर्भ आणि महाराष्ट्र यांच्यामध्ये एकभावना निर्माण झाली पाहिजे.

मी असे मानतो की, मराठवाडा, विदर्भ, नवबौद्ध, मध्यमवर्ग ह्या सगळयांच्या अडचणी आपल्याला सोडवावयाच्या आहेत, तेव्हा सगळयांनी महाराष्ट्रामध्ये एकजिनसी समाज निर्माण करण्याचे काम केले पाहिजे. ते जर शक्य झाले तर बाकीचे काम होणार आहे. दुय्यम गोष्टींना प्रमुख स्थान दिले तर आपण काहीतरी चुकीचे करू असे वाटल्यामुळे मी हे बोललो आहे. कोणालाही देताना खळखळ करावी अशी भावना आम्ही ठेवणार नाही. आमच्या विदर्भातील मित्रांनी विदर्भाचे स्वतंत्र राज्य व्हावे अशी मागणी केली होती, पण ज्यावेळी काँग्रेस वर्किंग कमिटीचा निर्णय झाला त्यावेळी अमुक दिले तर राहावयाचे, नाही तर राहावयाचे नाही, अशी भूमिका त्यांनी सोडून दिली आहे. आपण एकत्र राहावयाचे तर तुमचे आमचे एकच भवितव्य आहे ही भावना ठेवली पाहिजे आणि तशी भावना ठेवली तरच आपण ह्या राज्याचा विस्तार करू शकणार आहोत. हे सगळे व्हावयाचे असेल तर सगळयांनी महाराष्ट्राचा उत्कर्ष करणे ही पहिली प्रतिज्ञा मानली पाहिजे. तसे केले तर जे स्वप्न डोळयापुढे ठेवले होते ते पूर्ण झाल्याचा आनंद होईल. नवीन राज्य व्हावे अशी सर्वांची इच्छा होती पण नवीन जन्म झाल्यानंतर पुढील प्रवास खडतर आहे याची जाणीव ठेवून प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. तसे झाले तर एकजिनसी राज्य निर्माण होईल आणि भावी महाराष्ट्राच्या  आशा आकांशा पूर्ण होतील. नवीन गुजरात राज्य निर्माण होणार आहे त्याला मी सदिच्छा व्यक्त करतो. माझे मित्र सन्माननीय सभासद श्री. एस्.एम्. जोशी यांना मी असे सांगत होतो की, द्विभाषिक राज्यातही एकभाषिक राज्याचे फायदे होत होते, आता मी असे म्हणेन की, एकभाषिक राज्य निर्माण झाल्यानंतर त्यात द्विभाषिकाचे फायदे होतील.

तारीख २७ एप्रिलला जर नवीन राज्ये स्थापन करता आली असती तर मला अत्यंत आनंद झाला असता. परंतु तारीख २७ एप्रिलला जर ही राज्ये स्थापन करता आली नाहीत आणि ती जर तारीख १ मेला स्थापन करावी लागली तर मी माझ्या मनाशी अशी समजून करून घेईन की, तारीख १ मेलाच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म झाला आहे. सन्माननीय सभासदांच्या जीवनाशी आणि त्या दृष्टीने जर हा प्रश्न सोडविता येण्याजोगा असला तर तसा प्रयत्न जरूर केला जाईल.
-----------------------------------------------------------------------------------------------------
Discussion Oon Bombay Re-organisation Bill was continued on 17th March 1960. The Chief Minister, Shri Y.B.Chavan, explained to the House why Maharashtra had agreed to give help of ten crores rupees to Gujarat to build its new capital and said that Dang and Umbergaon were made over to Gujarat as the respective District Boards had passed a resolution recommending merger with Gujarat.