प्रतिशिवाजी म्हणवून घेण्याइतका मी मूर्ख किंवा अहंकारी नाही. अनेक तपे तपश्चर्या करूनही ती योग्यता कोणाला प्राप्त होणार नाही. माझ्यावर करण्यात येणार्या टीकेविषयी एवढेच म्हणावेसे वाटते की, या टीकेमुळे किंवा शिव्यांमुळे मी दुबळा होणार नाही. सरकारवर टीका करण्याचा विरोधकांना अधिकार आहे आणि त्यांनी टीका करीत राहावे, पण या प्रकरणी सरकारने पक्षपाती दृष्टी दाखविली ही टीका बरोबर नाही, एवढे म्हणावेसे मला वाटते. प्रस्तुत प्रकरणी पक्षीय वृत्ती मी डोळयासमोर ठेवलेली नव्हती, व इतरांनीही कृपा करून असल्या प्रसंगी पक्षीय राजकारण खेळू नये असे मला सूचवावेसे वाटते.
अध्यक्ष महाराज, जातीयवादी प्रचारासंबंधी मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. मी नम्रपणे म्हणू इच्छितो की, जातीयवाद विषासारखा आहे आणि तो पसरू नये या दृष्टीने सर्वांनी सावधगिरी घेतली पाहिजे. ज्यामुळे जातीयवादला पोषक होईल अशी चूक होणार नाही, लोकांना शंकास्पद वाटेल असे कृत्य आपल्या हातून घडणार नाही, हे पाहाण्याची जबाबदारी सर्वांवर आहे. केवळ दुसरे लोक जातीयवादी प्रचार करतात, अमुक गृहस्थ करतात, तमुक गृहस्थ करतात, असे म्हणून भागणार नाही. या बाबतीतील आपली जबाबदारी प्रत्येकाने पार पाडली पाहिजे. जातीय पत्रके वाटण्यात आलेली आहेत ही गोष्ट खरी आहे, पण ती पब्लिसिटी व्हॅन्समधून वाटलेली आहेत की काय याविषयी मी चौकशी केली असताना अद्यापपर्यंत तसा निश्चित पुरावा हाती आलेला नाही, असे मी सांगू इच्छितो. पण हाती असलेल्या पुराव्यावरून ती पत्रके सरकारी मोटारीतून वाटलेली नाहीत असे म्हणण्यास हरक
आतापर्यंत जी वस्तुस्थिती आहे ती मी सभागृहासमोर ठेवलेली आहे आणि मी आता सभागृहाला अशी विनंती करीन की, प्रतापगडाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचा राष्ट्राकडून गौरव झालेला आहे, तेव्हा कृपा करून या प्रकरणी निर्माण झालेला राग व इतर भावना विसरून जाऊन शिवाजी महाराजांविषयी आदर आणि त्यांची स्तुती, तेवढयाच गोष्टी मनामध्ये ठेवाव्या.
-------------------------------------------------------------------
On 23rd December 1956, Shri Y.B.Chavan, Chief Minister said that Samyukta Maharashtra Samiti made two mistakes the first one being to protest against the Pratapgad celebrations and the second being to discuss it in the House. He mentioned that the Opposition Members’ charge that the Government remembered Shivaji Maharaj all of a sudden was not true. The decision to install the statue of Shivaji Maharaj on Pratapgad was made after the meeting between Shri Mehatab and Shri Naik-Nimbalkar. He said that the Congress Party and the Government remembered Shivaji Maharaj at the most opportune time.
He added that it was no use ranking up old grievances and we should correct our mistakes. In the course of his speech he said that all the arrangements for the ceremony on Pratapgad could have been made with the consent of all. Of course, it did not strike him that this should be an all party function. If the Samiti had expressed its desire to participate in the function, he would have been glad to invite them; but all the while they followed the policy of non-co-operation and confrontation. He admitted that there was an element of communalism in the propaganda. He admitted that there was an element of communalism in the propaganda. He also stressed that the spread of poison of communalism would not be stopped simply by making speeches; efforts in that direction should be made by all. He observed that the common man feels it proper that a popularly respected Prime Minister like Pandit Nehru should pay tribute to Shivaji, who is respected by the people even after 300 years. Then he maintained that he was justified in allowing the Congress workers to travel in trucks on that day and not giving the same facility to the Samiti followers. He further said that he did not wish that they should demonstrate on Pratapgad that day. He added that the demonstrators were obstructed under section 36, at a convenient place. He further pointed out that this function had in no way any connection with the bilingual State.
He acknowledged the right of the Opposition to criticise the Government but it was not fair to say that the Government was partial in the matter.