• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

भाग १ विधानसभेतील भाषणे-३६

अशा रीतीने त्यांना थांबवावे लागले. स्वाभाविकपणे, दोन्ही बाजूची माणसे गरम डोक्याची असल्यामुळे त्यांच्या भावना भडकल्या होत्या. समितीमधीलच माणसे रागावली होती असे नाही तर काँग्रेसपक्षातील माणसेही रागावलेली होती. अशा परिस्थितीमध्ये दोन्ही बाजूंना एकत्र येऊ देण्यामध्ये फार मोठी अडचण निर्माण झाली असती असे मला वाटते. म्हणून निदर्शने करणार्‍याना गैरसोयीच्या ठिकाणी अडवण्यापेक्षा प्रतापगडच्या पायथ्याशी, वाईजवळ असलेल्या एका मैदानाजवळ अडवण्याचे ठरविण्यात आले. त्या ठिकाणी मैदान असल्यामुळे निदर्शकांना बसण्याची सोय होती, जवळच कृष्णा नदी वाहात असल्यामुळे पाण्याच्या गैरसोयीचा प्रश्न नव्हता व इतर अडीअडचणी आल्या नसत्या, या सर्व बाबींचा विचार करून निदर्शकांना वाईजवळ थांबविण्याचा विचार केला. त्यांना थांबवण्यामागे संघर्ष टाळावा असा हेतू होता. घाटात थांबविले असते तर, रस्ते अरुंद असल्यामुळे त्यांना त्रास झाला असता. आमचा समारंभ नीटपणे पार पडावा व निदर्शकांना निदर्शने करता यावीत, पण संघर्ष होऊ नये अशा हेतूने त्यांना थांबविण्यात आले. असे करण्यामागे पक्षपाताचा हेतू नव्हता, तर शांतता राखण्याचा हेतू होता. समारंभ योग्य प्रकारे पार पडावा व निदर्शने करू इच्छिणार्‍यानाही ती निर्धास्तपणे करता यावीत अशी सावधगिरी घेण्यात आली, एवढेच मी सभागृहाच्या निदर्शनास आणू इच्छितो.

अध्यक्ष महाराज, ट्रकसंबंधी जे धोरण मी स्वीकारले, ते धोरण स्वीकारल्यामुळे मी चुकलो असे मला वाटत नाही. शिवाजी स्मारक समितीतर्फे जाणार्‍या मंडळींना जाण्यासाठी ट्रक्सची परवानगी देण्यात आली व निदर्शकांना नेण्यासाठी तशी परवानगी नाकारण्यात आली ही गोष्ट खरी आहे. संघर्षासाठी जाणार्‍या मंडळींना ट्रक्सची परवानगी देऊन मदत करावयाची व नंतर लॉ ऍंड ऑर्डर सांभाळण्याची काळजी वाहावयाची हे मला योग्य वाटले नाही. एका बाजूने अशी थट्टा करण्यात येत होती की, ट्रकमधून जाणारे भाडोत्री आहेत. महाराष्ट्रातून शिवाजी महाराजांना मुजरा करण्यासाठी जाणारी लक्षावधी माणसे भाडोत्री आहेत असे म्हणणारे कोणाचे प्रतिनिधित्व करीत आहेत हे त्यांनी स्वतःला विचारून पाहावे. शिवाजी महाराजांना नमस्कार करणार्‍या माणसांना जे भाडोत्री असा शब्दप्रयोग करीत आहेत त्यांना शिवाजी महाराजांबद्दल किती प्रेम असेल ते दिसून येत आहे. अध्यक्ष महाराज, आम्ही निदर्शकांना ट्रक्सची परवानगी दिली नाही, अशी तक्रार करण्यात आलेली आहे. त्यांना ट्रक्समधून भाडोत्री माणसे न्यावयाची होती काय असा प्रश्न मी त्यांना विचारू इच्छितो. तक्रार करून आम्हाला जाब विचारण्यापूर्वी त्यांनी आपल्या अंतःकरणाला विचारावे.

अध्यक्ष महाराज, ट्रकमधून माणसे नेण्यास निदर्शकांना परवानगी दिलेली नाही, ही गोष्ट खरी आहे. लॉ ऍंड ऑर्डर राखण्याची जबाबदारी माझ्यावर होती, काही बरावाईट प्रसंग ओढवला असता तर त्याची जबाबदारी माझ्यावर होती व ही जबाबदारी पार पाडण्याच्या दृष्टीने मी निदर्शकांना ट्रक्समधून माणसे नेण्याची परवानगी दिली नाही. ट्रकची परवानगी देऊन निदर्शकांची संख्या वाढवू द्यावयाची व पुन्हा निदर्शनाला आळा घालावयाचा असा दुहेरी पेच निर्माण करण्यात अर्थ नव्हता. ट्रकमधून माणसे नेण्यास निदर्शकांना परवानगी देऊन ती माणसे तेथे गेल्यानंतर त्यांना अडवून अडचणीत टाकणे सयुक्तिक नव्हते. त्यामुळे ट्रकमधून माणसे नेण्यास परवानगी नाकारल्यामुळे माझ्या हातून काही अयोग्य घडले आहे असे मला वाटत नाही.

या समारंभाच्या बाबतीत द्विभाषिकाशी संबंध जोडला जाऊ लागला त्यावेळी या समारंभाचा द्विभाषिकाशी संबंध नाही असे स्पष्ट करण्यात आले होते व भारताच्या पंतप्रधानांनीही हे सांगितले होते. मी असेही म्हटले होते की, संयुक्त महाराष्ट्राबद्दल बोलण्याचा किंवा आंदोलन करण्याचा अधिकार समिती पक्षाला आहे, पण तो प्रसंग शिवस्मारकाच्या वेळी नसून इतर अनेक प्रसंगी ते निदर्शने करू शकतील. शिवाजी महाराज हे सगळयांचे मानाचे स्थान आहे, त्यावेळी आपण निदर्शने करणार नाही अशी समितीच्या नेत्यांनी भूमिका घेतली असती तर मी त्यांना निमंत्रण देण्यासाठी त्यांच्याकडे चालत गेलो असतो, पण त्यांनी निदर्शनाचा निर्णय घेतला होता. ही हकीकत मी अशासाठी सांगत आहे की, या प्रकरणी सरकारची पक्षपाताची दृष्टी नव्हती व त्या दृष्टीने ही बाब हाताळलेली नाही. प्रतापगडचा समारंभ झाल्यानंतर समिती विजयी झाली की काँग्रेस विजयी झाली हा माझ्यापुढे प्रश्न नाही. मी एकच गोष्ट सांगू शकेन की, यामध्ये समिती किंवा काँग्रेस विजयी झाली अशी परिस्थिती नसून शिवाजी महाराजांची पुण्याई अजूनही श्रेष्ठ आहे, किंबहुना वाढत आहे असे या प्रसंगी दिसून आले. त्यांच्या पुण्याईमुळे हा प्रसंग यशस्वीपणे पार पडला असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही. शिवाजी महाराजांच्या पुण्याईपेक्षा आपली पुण्याई जास्त आहे असे समजणार्‍याना मात्र राग आलेला आहे. आपण स्वतःला प्रतिशिवाजी म्हणवून घेता असे श्री. अत्रे १७ (टिप पाहण्यासाठी येथे क्लिक करा) आताच म्हणाले.