व्याख्यान - दिनांक १३ व १४ मार्च १९९६, वर्ष २४ वे
विषय - " भारतीय लोकशाहीची वाटचाल"
व्याख्याते - प्रा. ग. प्र. प्रधान, पुणे.
व्याख्याता परिचय -
नांव : गणेश प्रभाकर प्रधान
जन्म : २६ ऑगस्ट १९२२
शिक्षण : फर्ग्युसन कॉलेज, बी. ए. (इंग्रजी व ऑनर्स) १९४२, एम. ए. (इंग्रजी व मराठी) १९४५
अध्यापन : १९४५ ते १९६६ फर्ग्युसन कॉलेज, १० वर्षे पदव्युत्तर, पुणे विद्यापीठ. इंग्रजीचे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक. प्रसिद्ध वक्ते व विचारवंत
लेखन : इंग्रजी : लो. टिळक चरित्र , म. गांधी - मुलांसाठी चरित्र (प्रा. अ. के. भागवत यांच्या समवेत.) राम गणेश गडकरी, इंडियाज फ्रीडम स्ट्रगल
लेखन : मराठी : लो. टिळक व्यक्ती व कार्य, हाजीपीर, कांजरकोट, सोनार बंगला, (युद्ध भूमीवरील प्रवास वर्णने) भाकरी आणि स्वातंत्र्य, साता उत्तराची कहाणी, स्वातंत्र्य संग्रामाचे महाभारत, लो. टिळक, (नॅशनल बुक ट्रस्ट) राजकीय बखर.
संपादन : आगरकर लेखसंग्रह, (साहित्य अकादमी) पं. नेहरू, विविध दर्शन.
स्फुट लेखन : साधना, समाज प्रबोधन पत्रिका व अन्य वृत्तपत्रातून.
कार्य : राष्ट्र सेवादल, १९४२ स्वातंत्र्य लढ्यात ११ महिने कारावास, समाजवादी पक्षाचे कार्य, नंतर जनता पक्ष. १९७५ आणीबाणीत १६ महिने कारावास. विधान परिषदेवर पदवीधर मतदार संघातून, (१९६६, १९७२ व १९७८) अशी तीन वेळा निवड, एकूण अठरा वर्षे आमदार. १९८० ते १९८२ विधानपरिषद विरोधी पक्षनेता.
ग्रंथालय चळवळीत काम : दोन वेळा ग्रंथालय परिषदेचे अध्यक्ष. १९८४ पासून साधना साप्ताहिकाचे संपादक, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष.
त्यांच्या 'स्वातंत्र्य संग्रामाचे महाभारत' ह्या पुस्तकास हेंद्रे पारितोषिक.