• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

व्याख्यानमाला-१९९५-९६-५४

आज कराडात येऊन कराडची प्रगती पाहण्याची संधी मिळाली. जवळ जवळ ४० वर्षापूर्वी माझा काराडशी संबंध आला. १९५७ ते १९६० अशी तीन साडेतीन वर्षे कोल्हापूरला कलेक्टर होतो. कोल्हापूरला जायचे कराडमार्गे. त्यावेळचे कराड लहान खेडेगाव होते. मी ते खेडेगांव यशवंतरावांच्या बरोबर पाहिले आहे. आज कराड, शहर झाले आहे आणि उत्कृष्टपणे विकासाच्या मार्गाला लागले आहे. त्याचे श्रेय एका माणसाला आहे, अशी माझी भावना आहे. ते आहेत पी. डी. साहेब.

पी. डी. पाटलांचे आणि साहेबांचे संबंधाविषयी मी काही बोलण्याची आवश्यकता नाही. दोघांशी एकाच गोष्टीवर प्रेम केले. ते म्हणजे ‘कराड’. यशवंतरावांनी दुरून प्रेम केले. तर पी. डी. नी येथे राहून. यशवंतराव १९४६ साली कराडबाहेर गेले. पण त्यांचे मन व तन सदैव कराडात गुंतलेले असायचे. ते या शहरावर अमाप प्रेम करीत. त्यांच्या कराड प्रेमाचे उदाहरण म्हणून एक गोष्ट सांगतो.

१९६१ साली यशवंतराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, तेव्हा ते रहात, ‘सह्याद्री’ मध्ये. सह्याद्री हे त्यांच्या मुंबईच्या बंगल्याचे नाव. शरीर मुंबईत, पण मन कराडमध्ये अशी त्यांची अवस्था होती. कराड आणि कराडची प्रगती, कराडमध्ये काहीतरी झाले पाहिजे, ही भावना सतत त्यांचे मनात असे. त्याचे प्रतीक म्हणून १६ मे १९६१ रोजी यशवंतरावांनी त्यावेळी नगराध्यक्ष असलेले पी. डी. पाटील यांना जे पत्र लिहिले त्याचा काही भाग मी वाचून दाखविणार आहे. कराडवरचे त्यांचे प्रेम आणि पी. डी. पाटील यांचे कार्य यांचा संगम कसा झाला हे त्यावरून आपणास कळेल.

यशवंतरावांनी लिहिलेः “मध्यंतरी एक दिवस सवड मिळाली म्हणून ब-याच वर्षांनी क-हाडच्या प्रीती संगमावर मी फिरण्यासाठी गेलो. जुन्या आठवणी नेहमीच हृद्य असतात. तेच अनुभव या प्रसंगीही आले. परंतु वैयक्तिक अनुभवाखेरीज इतर जे विचार याप्रसंगी मनांत आले ते नगाराध्यक्ष या नात्याने तुम्हास कळविण्याचे मी मनात योजले होते. आज ते विचार कागदावर उतरवीत आहे.

क-हाडला शहर या दृष्टीने जे नैसर्गिक फायदे आहेत, त्या सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे हे शहरदोन महत्वाच्या नद्यांच्या काठी वसले आहे. शहर एका नदीच्या काठावर असणे म्हणजे भाग्याचे मानले जाते. तर आपल्या शहराला हे दुहेरी भाग्य आहे. शहर सुधारण्याच्या प्रयत्नात या नैसर्गिक फायद्याचा योग्य तो उपयोग करण्याची फारच शक्यता आहे. आधुनिक नगररचनेत अशा नद्यांच्या किना-यांची योजनापूर्वक बांधणी करून आकर्षक बगीचातून फिरण्याची सोय करण्याच्या कल्पनेस महत्वाचे स्थान दिले आहे. काही काही शहरांतून सुंदर छोटी छोटी उपहारगृहे बांधून उत्पन्नाचीही सोय केली जाते. श्रीनगर, अहमदाबाद या ठिकाणी असे झालेले प्रयत्न मी पाहिलेले आहेत. अर्थात ही दोन्ही शहरे राज्यांच्या राजधानीची शहरे आहेत. त्यामुळे त्यांना साधनांची विपुलता अधिक. परंतु आपल्या साधनांच्या मर्यादेत आपणही अशा योजनापूर्ण रचनेचा प्रयत्न करून नये असे काही म्हणता येणार नाही.

कोयनाकाठी – पुलाच्या दोन्ही बाजूस किंवा इन्स्पेक्शन बंगल्याचे नजीक, पाटण कॉलनीचे नजीक, दाभोळ दरवाजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी, बाग किंवा इतर कांही प्रयत्न करणे शक्य आहे.

कृष्णाकाठी – स्वामींची बाग, इतर घाट, मंगळवार पेठेतून नदीकडे जाणा-या घाटाचे आसपासही अशी काही उद्याने वा इतर रचना आकर्षक पद्धतीने करणे शक्य आहे. कोयना योजनेच्या पूर्णतेनंतर प्रवाहाचे आजचे वळण बदलण्याची शक्यता आहे. प्रवाहांची स्वच्छता व पोहण्याची अधिक उत्तम सोयही करणे शक्य होईल. नदीकाठी सकाळी वा संध्याकाळी सहल करणे ही या शहरातील जुनी सामुदायीक सवय होती. ती एक महत्वाची संस्था होती असे मी मानतो. ही संस्था आता जवळ बंद झाल्यासारखे वाटते. पूर्वी सूर्यास्ताचे वेळी कृष्णेच्या वाळवंटात खेळणा-यांची व फिरणा-यांची काही शर्यतच असे. आज तशी परिस्थिती दिसत नाही. उलट परवा तर मी एक प्रकारचा शुकशुकाटच पाहिला व मन उदास झाले. याचे कारण समजण्यासारखे आहे. शहराच्या इतर भागांत नवी आकर्षणे निर्माण झाली आहेत. तर नदीकाठ व वाळवंट उलट अधिक निस्तेज बनली आहेत. आपण ही परिस्थिती प्रयत्नपूर्वक बदलली पाहिजे.