• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

व्याख्यानमाला-१९९०-४ (12)

शेवटचा विचार मांडून मी आजचे व्याख्यान लंपविणार आहे. तो म्हणजे भारतीय राजकारणाचे जे विविध संदर्भ आहेत त्यांचा आपण प्रथम अभ्यास करायला हवा. कारण या संदर्भाच्या स्वरूपांच्या ज्ञानामधूनच राजकारणाच्या स्वरूपाचे ज्ञान प्राप्त होऊ शकेल. मी काही वेळापूर्वी आपल्याला सांगितले की कोणतेही राजकारण निर्वात पोकळीमध्ये घडत नाही. त्याला ऐतिहासिक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक संदर्भ असतात. वैचारिक किंवा तात्विक संदर्भही असतात. तत्वज्ञानात्मक संदर्भ, आयडिऑलॉजिकल कॉन्टेक्स्ट असतो. त्या संदर्भाचा उल्लेख करायला हवा. कारण ते लक्षात घेतल्याशिवाय भारतीय राजकारणाचा अभ्यास करता येणार नाही. कोणत्याही देशाच्या राजकारणाचा अभ्यास करण्याची तीच रीत असते. निदान असायला हवी म्हणून भारतीय राजकारणाच्या अभ्यासाची एक दिशा म्हणून, भारतीय समाजाचा आपण आधी अभ्यास करायला पाहिजे. भारतामधल्या धार्मिक परिस्थितीचे स्वरूप प्रादेशिक अहंतेचे स्वरूप, त्याच्या मागची ऐतिहासिक पार्श्वभूमी, या देशाची हजारो वर्षाची संस्कृती, त्या संस्कृतीची परंपरा, हर प्रकारची विविधता, व्यापक दारिद्र्य, सार्वत्रिक अज्ञान या सर्व गोष्टीचे ओझे डोक्यावरती घेऊन हा समाज नवतेकडे किंवा आधुनिकतेकडे जात आहे.

भारतीय समाजाच्या सगळ्या परंपरांच्याकडे जर आपण नीट पाहिले, योग्य दृष्टीने पाहिले तर या परंपरांच्यामधून प्रेरणादेखील मिळू शकेल. पण आपल्याला फारच विचक्षक दृष्टी ठेवली पाहिजे, कारण फार थोड्या परंपरा आजच्या काळाची आणि उद्याच्या प्रश्नांची उत्तरे देण्याच्या दृष्टीने प्रेरक ठरणा-या आहेत. बाकीच्या अनेक परंपरा या ओझ्यामध्ये जमा होतात आणि हे ओझं आपण पाठीवरचे उतरविल्याशिवाय आपल्या चालीला किंवा धावण्याला वेग येणार नाही.

या सर्व प्रकारच्या विविधतेमध्ये पृथगात्मक असलेला हा समाज आधुनिकतेकडे जो प्रवास करतो आहे त्याचा राजकीय संदर्भ आणि राजकारणाला असलेला हा परंपरेचा वारसा असा परस्परांचा अभ्यास एकसमयावच्छेदे केल्याशिवाय राजकारणाचा पृथ्थक अभ्यास चुकीच्या दिशेने घेऊन जाईल. समाजाचा आणि परंपरेचा पृथ्थक अभ्यास देखील चुकीच्या दिशेने घेऊन जाईल. शेवटचा विचार मांडून मी आजची जी तात्विक बैठक आहे तिचा समारोप करतो. म्हणजे मग आज तयार केलेल्या या वैचारिक चौकटीच्या अनुरोधाने भारतीय राजकारणाचा अधिक तपशीलवार अभ्यास आणि विशेषतः भारतीय लोकशाहीला केंद्रस्थानी असलेली निवडणूक आणि पक्षपद्धती या दोन महत्वाच्या राजकीय संस्थांच्या आतापर्यंतच्या प्रगतीचा अभ्यास आणि त्यातून उपस्थित झालेल्या प्रश्नांचा अभ्यास उद्याच्या आणि शेवटच्या व्याख्यानांत आपल्याला करता येईल.